Join us  

४ चुकांमुळे घरातला फ्रिज हमखास बिघडतो! फ्रिज वापरताना नेमकं काय चुकतं? काय काळजी घ्याल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2022 6:16 PM

How To Take Care of Your Fridge: फ्रिज ही आपल्या रोजच्या वापरातली गोष्ट.. पण तरीही ती हाताळताना काही चुका होतातच. नेमक्या याच चुकांमुळे मग फ्रिज लवकर खराब होतो.

ठळक मुद्दे ४- ५ वर्षांतच फ्रिजच्या वेगवेगळ्या तक्रारी सुरू होतात. असं होण्याचं कारण म्हणजे फ्रिज वापरताना आपल्याकडून होणाऱ्या काही चुका...

आजकाल जवळपास प्रत्येक घरात फ्रिज असतंच. त्याचे उपयोगच एवढे आहेत की घरातली ती एक अत्यावश्यक वस्तू झाली आहे. फ्रिजशिवाय २ दिवसही काढणं कठीण होतं कारण लगेचच वेगवेगळे पदार्थ फ्रिजशिवाय बाहेर कसे ठेवायचे, असा प्रश्न पडतो. सामान्यपणे फ्रिजचं आयुष्य हे ७ ते १० वर्षे असं सांगण्यात येतं. ज्यांचा वापर अगदीच चांगला असतो त्यांचं फ्रिज वर्षानुवर्षे टिकतं. पण काही घरांमध्ये मात्र ४- ५ वर्षांतच फ्रिजच्या वेगवेगळ्या तक्रारी सुरू होतात. असं होण्याचं कारण म्हणजे फ्रिज वापरताना आपल्याकडून होणाऱ्या काही चुका (4 Common mistakes while using fridge). म्हणूनच फ्रिज वापरताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि कोणत्या गोष्टी कराव्यात, हे पाहूया.(How To Take Care of Your Fridge)

 

फ्रिज खराब होऊ नये म्हणून..१. वारंवार उघडू नकाज्या घरात लहान मुलं असतात आणि जेव्हा त्यांच्या आवडीचे पदार्थ फ्रिजमध्ये ठेवलेले असतात, तेव्हा मुलं सारखी फ्रिजची उघडझाक करतात. किंवा अनेकदा मोठ्या माणसांकडूनही असं केलं जातं. यामुळे फ्रिजमधली तापमान सेट करण्याची यंत्रणा बिघडून फ्रिज लवकर खराब होऊ शकतं.

 

२. फ्रिजचा दरवाजा जोरात लावणेही सवयही अनेक जणांना असते. ते फ्रिजचा दरवाजा लावत नाहीत, तर जोरात ढकलून देतात. यामुळे फ्रिजच्या दारावर जे शॉक ॲबसॉर्ब करणारे रबर असते ते खराब होते आणि त्यामुळे मग फ्रिज थंड होण्यात अडथळा येऊ लागतो.

Google Search: २०२२ मध्ये भारतीयांनी गुगलवर सर्वात जास्त शोधलेल्या ८ रेसिपी पाहा नेमक्या कोणत्या

३. फ्रिज बंद करू नकाकाही जण ८- १० दिवसांसाठी गावाला जाताना फ्रिजचा मुख्य स्विच बंद करून जातात. वीज वाचवणे हा त्यामागचा उद्देश असतो. पण त्यामुळे फ्रिजचे मात्र मोठे नुकसान होते. यामुळे फ्रिजची कुलिंग यंत्रणा खराब होऊन त्यामुळे फ्रिजमध्ये वेगवेगळे गॅसेस तयार होतात आणि ते खराब होऊ शकते.

 

४. फ्रिजमध्ये खूप जास्त सामान ठेवणेज्याप्रमाणे मोठ्या खोलीमध्ये कमी पॉवरचा एसी चालू शकत नाही, त्याचप्रमाणे फ्रिजचंही असतं.

डोरेमोनचा आवाज ऐकून चक्क पोटातल्या बाळानेही मारली किक...पाहा व्हायरल व्हिडिओ

जर तुम्ही फ्रिजमध्ये गरजेपेक्षा जास्त वस्तू कोंबून ठेवल्या तर फ्रिजच्या कुलिंग यंत्रणेवर ताण येतो. त्यामुळे फ्रिजमध्ये नेहमी मोजक्याच वस्तू ठेवा.  

 

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सकिचन टिप्स