Join us  

वॉशिंग मशीन वापरताना ४ चुका टाळा, महागडे मशीन होईल खराब - वीजबिलही येईल जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2024 7:37 PM

4 common washing machine mistakes you must avoid : वॉशिंग मशीन वापरणे खूप सोपे आहे, पण वापरताना ४ चुका अवश्य टाळा..

वॉशिंग मशीनमुळे जीवन अगदी सोपे होते (Washing Machine). आजकाल बहुतांश घरांमध्ये वॉशिंग मशीन आढळतेच (Mistakes). यात कपडे धुतल्याने आपलं भरभर काम होतं (Cleaning Tips). वॉशिंग मशीनमध्ये जड, घाणेरडे कपडे धुणे सोपे होते. वॉशिंग मशीनमुळे मेहनत आणि वेळेचीही बचत होते. पण नकळत घडणाऱ्या काही चुकांमुळे वॉशिंग मशीन लवकर खराब होते. महागडे घेतलेली मशीन लवकर खराब होऊ नये म्हणून काही टिप्स फॉलो करणं गरजेचं आहे.

जर वॉशिंग मशीन अधिक वर्ष टिकावे, यासह कपडे धुताना लोड येऊन वॉशिंग मशीन लवकर खराब होऊ नये असे वाटत असेल तर, काही टिप्स फॉलो करून पाहा. वॉशिंग मशीन वापरताना या चुका टाळल्याने अधिक वर्ष आरामात वॉशिंग मशीन टिकेल. शिवाय लवकर खराबही होणार नाही(4 common washing machine mistakes you must avoid).

वॉशिंग मशीन वापरताना कोणत्या चुका टाळाव्या?

एकाच वेळी कपडे धुणे टाळा

काहींसाठी एकाच वेळी कपडे धुणे सोयीचे वाटते. पण एकाच वेळी वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुणे योग्य नाही. कारण यामुळे वॉशिंग मशीनमध्ये लोड येऊ शकते. वॉशिंग मशीनची देखील एक क्षमता असते. एकाच वेळी जास्त कपडे वॉशिंग मशीनमध्ये टाकल्याने मशीनमध्ये भार पडतो. ज्यामुळे त्याचे पार्ट्स खराब होऊ शकतात. त्यामुळे एकाच वेळी जास्त कपडे धुणे टाळा.

फराळ खाल्ले नी वजन वाढले? करा ५ सोप्या गोष्टी; पचनक्रिया होईल सुरळीत - वजन घटेल

पृष्ठभागावर मशीन ठेवणं टाळा

काही लोक वॉशिंग मशीन खडबडीत पृष्ठभागावर ठेवतात. ज्यामुळे मशीनवर जास्त लोड येतो. त्यावर अतिरिक्त दबाव पडतो. ज्यामुळे वॉशिंग मशीनच्या बॉडी पार्ट्सचे नुकसान होते. याशिवाय काही लोकांना ओले कपडे धुतल्यानंतर मशीनमध्येच ठेवण्याची सवय असते. यामुळे वॉशिंग मशीन लवकर खराब होते.

अधिक डिटर्जंट वापरणे

वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना त्यात जास्त प्रमाणात डिटर्जंट टाकणे टाळा. डिटर्जंटचा जास्त प्रमाणात वापर केल्याने फेस तयार होतो. ज्यामुळे वॉशिंग मशीनच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. शिवाय पाईप आणि ड्रमही खराब होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे वॉशिंग मशीनमध्ये जास्त प्रमाणात  डिटर्जंट घालणं टाळा.

थुलथुलीत पोट होईल सपाट - बॅड कोलेस्टेरॉलही येईल नियंत्रणात; फक्त रोज चमचाभर 'ही' चटणी खा

कपडे न तपासता मशीनमध्ये टाकू नका

बऱ्याचदा न तपासता आपण मशीनमध्ये कपडे टाकतो. कपड्यामध्ये नाणे, किंवा कागदपत्रे असतात. ज्यामुळे वॉशिंग मशीन लवकर खराब होऊ शकते. त्यामुळे वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकण्यापूर्वी खिसे तपासून घ्या.

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल व्हायरल