Lokmat Sakhi >Social Viral > फरशीवरील सिलेंडरचे हट्टी डाग निघत नाही? ४ सोपे उपाय, डाग होतील गायब - फरशी दिसेल चकाचक

फरशीवरील सिलेंडरचे हट्टी डाग निघत नाही? ४ सोपे उपाय, डाग होतील गायब - फरशी दिसेल चकाचक

4 Tips To Remove Rust Cylinder Stains From Tiles फरशीवरील गंजाचे हट्टी डाग काढण्यासाठी ४ घरगुती उपाय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2023 08:08 PM2023-02-26T20:08:59+5:302023-02-26T20:10:20+5:30

4 Tips To Remove Rust Cylinder Stains From Tiles फरशीवरील गंजाचे हट्टी डाग काढण्यासाठी ४ घरगुती उपाय..

4 Easy Remedies To Remove Rust Cylinder Stains From Tiles | फरशीवरील सिलेंडरचे हट्टी डाग निघत नाही? ४ सोपे उपाय, डाग होतील गायब - फरशी दिसेल चकाचक

फरशीवरील सिलेंडरचे हट्टी डाग निघत नाही? ४ सोपे उपाय, डाग होतील गायब - फरशी दिसेल चकाचक

प्रत्येक घरात सिलेंडरचा वापर जेवण बनवण्यासाठी होतो. बहुतांश घरात शेगडी जवळ सिलेंडर ठेवण्यात येते. हे सिलेंडर कडक लोखंडापडून तयार केले जातात. ज्यामुळे ते वजनाला फार जड असतात. स्वयंपाकघरात सिलेंडर जिथे ठेवले जाते, त्या ठिकाणी घाणेरडे गंजाचे डाग तयार होतात.

सिलिंडरच्या डागामुळे स्वयंपाकघरातील फरशी अस्वच्छ दिसते. मात्र, हे डाग साफ करणे कोणत्या मोठ्या टास्कपेक्षा कमी नाही. फरशी पुसल्यानंतरही हे डाग सहसा निघत नाही. पांढऱ्या फरशीवर ते लगेच उठून दिसतात. हे डाग काढण्यासाठी काही घरगुती उपाय करून पाहा. काही ट्रिक्सच्या मदतीने गंजाचे डाग सहज निघून जातील.

रॉकेल

जमिनीवरील सिलिंडरचे डाग काढण्यासाठी रॉकेलचा वापर करा. यासाठी १ कप पाण्यात २ ते ३ चमचे रॉकेल मिसळून मिश्रण तयार करा. आता  हे मिश्रण डागांवर लावा, ५ ते १० मिनिटे हे मिश्रण डागांवर तसेच ठेवा. यानंतर, स्क्रबरच्या मदतीने फरशी स्वच्छ करा.

लिंबू आणि बेकिंग सोडा

हट्टी सिलेंडरचे डाग काढण्यासाठी बेकिंग सोडा आणि लिंबाच्या रसाचा वापर करा. यासाठी १ कप पाण्यात, २ चमचे बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस मिक्स करा. आता हे मिश्रण टाइल्सवर टाका आणि स्क्रबरच्या मदतीने घासून घ्या. काही वेळात फरशी पूर्णपणे स्वच्छ होईल.

मीठ आणि व्हिनेगर

व्हिनेगरच्या मदतीने फरशीवरील सिलेंडरचे डाग साफ करता येईल. यासाठी एक कप व्हिनेगरमध्ये एक चमचा मीठ घालून मिश्रण तयार करा. आता हे मिश्रण फरशीवर टाका, स्क्रबरच्या मदतीने फरशी घासून घ्या. सिलेंडरचे डाग निघून जातील.

टूथपेस्ट

सिलेंडरचे डाग अथवा इतर डाग काढण्यासाठी टूथपेस्ट मदत करेल. यासाठी फरशीवरील डागांवर पेस्ट लावा. स्क्रबरच्या मदतीने डाग घासून काढा. या नंतर फरशी पाण्याने धुवा. फरशी स्वच्छ होईल.

Web Title: 4 Easy Remedies To Remove Rust Cylinder Stains From Tiles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.