मोबाईल ही रोजच्या वापरातील एक आवश्यक गोष्ट झाली आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण मोबाईलचा वापर सतत करत असतो. सध्या बदलत्या काळानुसार महागडे आणि ब्रँडेड फोन विकत घ्यायची फॅशनच सुरु आहे. एकदा मोबाईल खरेदी केला की तो अगदी पुढच्या महिन्यात आउटडेटेड होऊन जातो. आपण फक्त महागडे मोबाईल घेऊनच थांबत नाही, तर नकळतपणे मोबाईलचे नुकसान होऊ नये म्हणून आपण त्याला साजेसे असे महागडे कव्हर देखील विकत घेतो. हे मोबाईल कव्हर नवीन असताना छान, स्वच्छ व आकर्षक दिसत, परंतु काही दिवसांच्या वापरानंतर हे कव्हर त्याचा मूळ रंग सोडून पिवळं पडू लागत किंवा खराब होत.
सध्या बरेचजण मोबाईलसाठी वेगवेगळ्या प्रकारची आणि रंगांची आकर्षक दिसणारी मोबाईल फोन कव्हर घेत असतात. परंतु काही वापरानंतर हे मोबाईल फोन कव्हर खराब होतात. हे खराब झालेले मोबाईल कव्हर आपण लगेच फेकून देऊ शकत नाही. काहीवेळा आपण ते मोबाईल कव्हर तसेच कळकट, मळकट स्थितीत वापरतो. परंतु या खराब झालेल्या कव्हरची थोडी काळजी घेतल्यास आपण ते नव्यासारखे स्वच्छ करु शकतो(4 Easy Ways to Keep a Clear Case from Turning Yellow).
मोबाईल कव्हर घाण का होते? सर्वप्रथम, हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे की कोणत्या कारणामुळे फोन कव्हर घाण होते. वास्तविक, फोनच्या उष्णतेमुळे फोनच्या कव्हरचा रंग पिवळा होतो, जो साफ केल्यानंतरही काहीवेळा पिवळाच दिसतो. अशा परिस्थितीत तुम्ही फोनचे कव्हर बदलणे गरजेचे असते.
१) डिशवॉशिंग लिक्विडने स्वच्छ करा :- मोबाइल कव्हर स्वच्छ करण्यासाठी, तुम्ही प्रथम डिशवॉशिंग लिक्विडचे काही थेंब स्क्रबवर टाका आणि नंतर फोन कव्हर स्क्रब करा. यानंतर मोबाईलचे कव्हर पाण्याने स्वच्छ करा आणि कपड्याने पुसून टाका. या स्टेप्स फॉलो करून तुम्ही काही मिनिटांत मोबाईल कव्हर सहज साफ करू शकता.
२) टूथब्रशने स्वच्छ करा :- टूथब्रशने फोनचे कव्हर स्वच्छ करण्यासाठी प्रथम मोबाईल कव्हर एका भांड्यात पाणी घेऊन त्यात भिजवावे. यानंतर, टूथब्रशने फोन कव्हरची घाण साफ करावी. जर फोन कव्हर जास्त खराब झाले असेल तर डिटर्जंट सोल्युशन बनवा आणि त्यात फोन कव्हर भिजवा आणि नंतर जेव्हा तुम्ही सोल्युशनमधून फोन कव्हर धुवून बाहेर काढाल तेव्हा तुम्हाला फोन कव्हर अगदी स्वच्छ झालेले दिसेल.
पाणी पिण्याच्या बाटल्यांना कुबट वास येतोय? १ सोपा उपाय, बाटली होईल स्वच्छ-निर्जंतूक...
३) पिवळे डाग अशा प्रकारे स्वच्छ करा :- तुम्ही बेकिंग सोडा वापरून तुमच्या फोनचे कव्हर स्वच्छ करू शकता. कव्हर साफ करण्यासाठी एका बाऊलमध्ये दोन चमचे बेकिंग सोडा घ्यावा, नंतर ब्रशच्या मदतीने फोन कव्हरवरील पिवळे डाग घासून घ्या. अशा प्रकारे तुम्ही मोबाईल कव्हर सहज स्वच्छ करू शकाल.
उन्हाळ्यात एसीचा वापर वाढल्याने वीज बिल खूप येते? ३ टिप्स, बिल होईल कमी...
४) रबींग अल्कहोलचा वापर करा :- मोबाईल कव्हर स्वच्छ करण्यासाठी तुम्ही रबींग अल्कहोलचा देखील वापर करु शकता. मायक्रो फायबर पासून तयार झालेला एखादा कपडा घेऊन थोड्याशा रबींग अल्कहोल मध्ये बुडवून घ्या. मोबाईल कव्हरवर ज्या ठिकाणी गडद पिवळा रंग दिसत आहे त्या डागांवर हे रबींग अल्कहोल लावावे व हलक्या हाताने घासावे. यामुळे हे पिवळे हट्टी डाग निघून जाण्यास मदत होते.