Lokmat Sakhi >Social Viral > पावसाळ्यात नळाला गढूळ पाणी येते? अस्वच्छ पाण्याने आंघोळ करू नका, ४ उपाय - पाणी होईल स्वच्छ

पावसाळ्यात नळाला गढूळ पाणी येते? अस्वच्छ पाण्याने आंघोळ करू नका, ४ उपाय - पाणी होईल स्वच्छ

4 Easy Ways to Purify Muddy Water पिण्याचे पाणी उकळून घेतो, पण वापरायचे पाणी गढूळ असेल तरी त्रास होवू शकतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2023 04:32 PM2023-07-30T16:32:43+5:302023-07-30T16:33:30+5:30

4 Easy Ways to Purify Muddy Water पिण्याचे पाणी उकळून घेतो, पण वापरायचे पाणी गढूळ असेल तरी त्रास होवू शकतो.

4 Easy Ways to Purify Muddy Water | पावसाळ्यात नळाला गढूळ पाणी येते? अस्वच्छ पाण्याने आंघोळ करू नका, ४ उपाय - पाणी होईल स्वच्छ

पावसाळ्यात नळाला गढूळ पाणी येते? अस्वच्छ पाण्याने आंघोळ करू नका, ४ उपाय - पाणी होईल स्वच्छ

पावसाळा जितका आनंदायी ऋतू आहे, तितकेच त्याचे तोटे देखील आहेत. पावसाळ्यात दरवर्षी नळावाटे घाणेरडे गढूळ पाणी येते. अशा वेळी हे पाणी स्वच्छ कसे करायचे असा प्रश्न पडतो. अनेकजण पिण्याचे पाणी फिल्टर करण्यासाठी प्युरिफायर वापरतात. परंतु, आंघोळीच्या पाण्यासाठी, यासह इतर कामांसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याचं काय? या नळावाटे येणाऱ्या पाण्याकडे आपण फारसे लक्ष देत नाही.

परंतु, या घाणेरड्या पाण्यामुळे त्वचा यासह आरोग्यावर हानिकारक परिणाम होऊ शकते. अशा स्थितीत आपण नळाचे पाणी वारंवार उकळवून तर वापरू शकत नाही. जर आपल्याला नळावाटे येणारे गढूळ पाणी मेहनत न घेता स्वच्छ करायचं असेल तर, या टिप्स फॉलो करून पाहा(4 Easy Ways to Purify Muddy Water).

नळावर कार्बन फिल्टर बसवा

कार्बन फिल्टर नळावर लावण्यात येते. ज्यामुळे पाणी फिल्टर होऊन येते. हे फिल्टर लावल्याने पाण्यातील घाण निघून जाते. कार्बन फिल्टर पाण्यात असलेले विविध प्रकारचे प्रदूषक, रेडॉन, क्लोरीन, बॅक्टेरिया आणि शिसे सारखे धातू स्वच्छ करतात.

जेवलीस का? J1 झाले का विचारणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी दिला रट्टा, पोस्ट व्हायरल

आंघोळीचे पाणी या पद्धतीने करा स्वच्छ

आंघोळीचे पाणी स्वच्छ करण्यासाठी आपण शॉवर फिल्टरचा वापर करू शकता. यासाठी शॉवर हेडमध्ये शॉवर फिल्टर लावा. जेणेकरून पाणी फिल्टर होऊन बाहेर येईल. यामुळे पाण्यातील क्लोरीन, क्लोरामाइन आणि इतर दूषित घटक काढून टाकण्यासाठी हे फिल्टर प्रभावी आहे.

नळावाटे येणारे पाणी या पद्धतीने करा स्वच्छ

नळावाटे येणारे पाणी स्वच्छ करण्यासाठी आपण सोडियम एस्कॉर्बेट पावडरचा वापर करू शकता. यासाठी बादलीत पाणी घ्या, त्यात ५ मिनिटापूर्वी एक चमचा सोडियम एस्कॉर्बेट घाला. यामुळे पाणी काही मिनिटात स्वच्छ होईल.

इस्त्री न करता ही कपडे दिसतील कडक, अगदी इस्त्री केल्यासारखे! करा 4 गोष्टी

असे स्वच्छ करा पिण्याचे पाणी

जर आपल्याकडे फिल्टर नसेल किंवा तो खराब झाला असेल तर, पाणी शुद्ध करण्यासाठी आपण तुरटीचा वापर करू शकता. तुरटी एका स्वच्छ सुती कपड्यात बांधून साठलेल्या पाण्यात टाका. पाणी पांढरे दिसायला लागल्यावर पाण्यातून तुरटी काढा. स्वच्छ पाणी २ ते ३ तास झाकून ठेवा. ३ तासानंतरच या पाण्याचा वापर करावा.

Web Title: 4 Easy Ways to Purify Muddy Water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.