पावसाळ्यात सर्वत्र ओलावा होतो. या ओलाव्यामुळे अनेक वस्तू खराब होतात, लोखंडी वस्तूंना गंज लागते. घराच्या खिडक्या व दारांचे पाण्यापासून सरंक्षण करणे अशक्य होते. त्यांच्यावर सतत पाण्याचे थेंब पडत असतात. ज्यामुळे खिडक्या - दारांना गंज लागते. गंजामुळे खिडक्या - दारांचे सौंदर्य तर बिघडतेच, यासह ते लवकर खराब देखील होतात. त्यामुळे वेळीच ते गंज काढून, खिडक्या - दारांना साफ करणे गरजेचं आहे.
पावसाळ्यात खिडक्या आणि दारे स्वच्छ करायच्या असतील तर, या टिप्स फॉलो करून पाहा. यामुळे जास्त मेहनत न घेता काही मिनिटात खिडक्या - दारे स्वच्छ होतील(4 Easy Ways to Remove Rust from Windows and Doors in Seconds!).
मीठ - लिंबू
गंज काढण्यासाठी आपण मीठ - लिंबूची मदत घेऊ शकता. यासाठी एका वाटीत दोन ते तीन चमचे मीठ घ्या, त्यात लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट गंजलेल्या भागावर लावा आणि काही वेळ तसेच ठेवा. त्यानंतर ब्रशने गंज काढा, व पाण्याने स्वच्छ करा.
कोल्ड ड्रिंक उरले तर फेकू नका? कळकट टाइल्स ते गंजलेले नळ होतील स्वच्छ, ३ ट्रिक्स
बेकिंग सोडा - लिंबू
लोखंडी वस्तूंवरील गंज काढण्यासाठी दोन कप पाणी गरम करा. त्यानंतर त्यात दोन चमचे बेकिंग सोडा, लिंबाचा रस मिक्स करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट गांजलेल्या जागेवर लावा. १५ मिनिटानंतर सॅण्ड पेपरच्या मदतीने गंज काढून टाका, यामुळे काही मिनिटांत गंज निघून जाईल.
कोल्ड ड्रिंक
गंज काढण्यासाठी आपण कोल्ड ड्रिंकची मदत घेऊ शकता. यासाठी कोल्ड ड्रिंक गंजलेल्या जागेवर लावा, १५ मिनिटानंतर ब्रशने गंज घासून काढा. यामुळे गंज काही मिनिटात निघून जाईल.
व्हिनेगर
लोखंडी दार आणि खिडक्या साफ करण्यासाठी आपण व्हाईट व्हिनेगरचा वापर करू शकता. व्हाईट व्हिनेगरमध्ये आम्लयुक्त गुणधर्म असल्याने, लोखंडावरील गंज लवकर निघते. यासाठी प्रथम एका स्प्रे बाटलीत व्हिनेगर भरा, त्यानंतर गंजलेल्या खिडक्या आणि दारांवर व्हिनेगर स्प्रे करा, काही वेळाने सॅण्ड पेपरने गंज घासून काढा. यामुळे गंज सहज निघून जाईल.