फ्रिज ही हल्ली इतकी सोयीची गोष्ट झाली आहे की अन्न शिळे होऊ नये म्हणून आपण सर्रास ते फ्रिजमध्ये ठेवतो आणि वापरतो. इतकेच नाही तर भाजीपाला, फळं, दुग्धजन्य पदार्थ, मसाले, सुकामेवा अशा बऱ्याच गोष्टी जास्त दिवस टिकण्यासाठी अगदी नियमितपणे आपण फ्रिजमध्ये ठेवतो. पदार्थ फ्रिजमध्ये किती दिवसांसाठी साठवावेत याचेही एक गणित असते ते समजून घ्यायला हवे. काही पदार्थांची फ्रिजमध्ये ठेवल्याने चव जाते आणि हे पदार्थ आरोग्यासाठीही घातक ठरु शकतात.फ्रिजमध्ये ठेवल्याने पदार्थाचे शेल्फ लाईफ वाढते हे खरे आहे. बऱ्याच पदार्थांच्या बाबतीत हे बरोबर असले तरी काही पदार्थ मात्र फ्रिजमध्ये ठेवल्याने टॉक्सिक होतात. आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. डिंपल जांगडा असे टॉक्सिक होतील असे पदार्थ कोणते ते सांगतात (4 foods that turn toxic when you refrigerate it)...
१. लसूण
घाईच्या वेळी झटपट वापरता यावा म्हणून आपण विकेंडला किंवा वेळ असेल तेव्हा जास्तीचा लसूण सोलतो आणि तो फ्रिजमध्ये ठेवतो. पण असे केल्याने त्यावर एकप्रकारची बुरशी तयार होते आणि त्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते. म्हणून स्वयंपाकाला लागेल तेव्हा ताजा लसूण सोलून घेणे केव्हाही जास्त चांगले.
२. कांदा
काहीवेळा आपण अर्धा कांदा वापरतो आणि उरलेला अर्धा कांदा खराब होऊ नये म्हणून तो फ्रिजमध्ये ठेवतो. पण कांद्याला सामान्य तापमानाची आवश्यकता असल्याने तो बाहेरच जास्त चांगला राहतो. कांदा फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यातील स्टार्चचे साखरेत रुपांतर होते. तसेच यामध्ये आरोग्याला अपायकारक असे बॅक्टेरीया तयार होतात. म्हणून कांदा फ्रिजमध्ये ठेवू नये.
३. आलं
आलं फ्रिजमध्ये ठेवण्याची बऱ्याच महिलांना सवय असते. आलं बाहेर लवकर खराब होत नाही आणि फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याची चव आणि पौष्टिक मूल्य कमी होते. यात तयार होणाऱ्या बॅक्टेरीयांमुळे किडणी आणि यकृताला त्रास होण्याची शक्यता असते.
४. भात
रात्री केलेला भात उरला की अनेक जण तो फ्रिजमध्ये ठेवतात. पण असे करणे आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. अशा भाताने शुगर आणि पण तुम्ही खूपच उष्ण प्रदेशात राहत असाल तर २४ तास फ्रिजमध्ये ठेवलेला भात तुम्ही खाऊ शकता. पण त्याहून जास्त ठेवू नये कारण त्याला फ्रिजमध्ये लवकर बुरशी येते.