Lokmat Sakhi >Social Viral > प्लास्टिक डिस्पोजेबल बॉक्स वापरून झाल्यानंतर फेकून देता? ४ भन्नाट वापर, किचन राहील स्वच्छ

प्लास्टिक डिस्पोजेबल बॉक्स वापरून झाल्यानंतर फेकून देता? ४ भन्नाट वापर, किचन राहील स्वच्छ

4 Genius ways to recycle waste plastic food containers किचन क्लिन - स्वच्छ ठेवण्यासाठी प्लास्टिक डिस्पोजेबलचा करा वापर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2023 04:12 PM2023-06-18T16:12:30+5:302023-06-18T16:13:11+5:30

4 Genius ways to recycle waste plastic food containers किचन क्लिन - स्वच्छ ठेवण्यासाठी प्लास्टिक डिस्पोजेबलचा करा वापर..

4 Genius ways to recycle waste plastic food containers | प्लास्टिक डिस्पोजेबल बॉक्स वापरून झाल्यानंतर फेकून देता? ४ भन्नाट वापर, किचन राहील स्वच्छ

प्लास्टिक डिस्पोजेबल बॉक्स वापरून झाल्यानंतर फेकून देता? ४ भन्नाट वापर, किचन राहील स्वच्छ

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात जेवण करायला वेळ नाही मिळाला तर आपण, ऑनलाईन ऑर्डर करतो. सध्या ऑनलाईन ऑर्डर देणं खूप सोप्पं झालं आहे. छोट्या स्टॉल्सपासून ते मोठ्या रेस्टॉरंट्सपर्यंत, डिस्पोजेबल बॉक्समधून जेवण पार्सल करून दिले जाते. डिस्पोजेबल बॉक्सचा वापर अनेक शॉप्समध्ये केला जातो.

भाज्यांपासून ते फ्रुट्सपर्यंत डिस्पोजेबल बॉक्समध्ये पॅक करून वस्तू दिले जातात. पण अशा स्थितीत घरात डिस्पोजेबल बॉक्स जास्त जमा होतात. बहुतांश लोकं हे बॉक्स फेकून देतात. पण हे बॉक्स फेकून देण्याऐवजी त्यांचा वापर घरगुती कामांसाठी करू शकता. डिस्पोजेबल बॉक्सचा वापर कुठे आणि कसा करावा हे पाहूयात(4 Genius ways to recycle waste plastic food containers).

फ्रिजमधील वस्तू व्यवस्थित ठेवण्यासाठी करा वापर

फ्रिजमधील वस्तू व्यवस्थित ठेवण्यासाठी आपण डिस्पोजेबल बॉक्सचा वापर करू शकता. कोथिंबीर, मिरची, सॉस आणि चटणी यांची पाकिटे अशीच ठेवली जातात. ज्यामुळे फ्रिज खराब दिसते. अशा वेळी या वस्तू डिस्पोजेबल बॉक्समध्ये ठेवा. यामुळे वस्तू शोधताना वेळ देखील वाया जाणार नाही. चटकन या वस्तू मिळतील. व फ्रिज देखील स्वच्छ दिसेल.

स्वयंपाकघरात कोळ्यांची जळमटं सतत लागतात? ५ टिप्स- जाळीजळमटं होतील गायब

डिटर्जंट ठेवण्यासाठी करा वापर

बहुतांश लोकं डिटर्जंट उघड्यावरच ठेवतात. असे न ठेवता डिस्पोजेबल बॉक्समध्ये ठेवा. डिटर्जंट बॉक्समध्ये ठेवल्याने ते जास्त ओले - खराब होणार नाही. व बाथरूम देखील क्लिन दिसेल.

स्वयंपाकघरातील विविध गोष्टी ठेवण्यासाठी

लोकं स्वयंपाकघरातील अनेक गोष्टी पॉलिथिनमध्ये ठेवतात. पॉलिथिनऐवजी डिस्पोजेबल बॉक्सचा वापर करा. त्यात आपण लसूण, सुक्या मिरच्या आणि मसाले ठेऊ शकता. यामुळे किचनमध्ये घाण पसरणार नाही, व स्वच्छ दिसेल.

फ्रिजमधून खूप वास येतो? घरभर दुर्गंधी पसरते? ४ उपाय, १० मिनिटात फ्रिज होईल स्वच्छ, दिसेल चकाचक

पॅकेटमधील शिल्लक राहिलेल्या वस्तू

स्वयंपाकघरात अश्या अनेक वस्तू असतात, जे आपण असच पॅकेटमध्ये साठवून ठेवतो. पॅकेटमध्ये न ठेवता, डिस्पोजेबल बॉक्समध्ये ठेवा. उदाहरणार्थ, आपण उरलेला पास्ता, मॅगी, वेफर्स, मसाले हे पदार्थ डिस्पोजल बॉक्समध्ये ठेवू शकता.

Web Title: 4 Genius ways to recycle waste plastic food containers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.