Join us  

गरबा अनवाणी खेळू नका, घालून पाहा ४ उत्तम फुटवेअर, रोज गरबा खेळला तरी पाय दुखणार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2023 12:50 PM

4 Gorgeous Juttis for Garba: Navratri 2023 : चप्पलांमुळे गरबा खेळायला जमत नाही? ट्राय करा ४ एथनिक फुटवेअर, व्हाल सेंटर ऑफ अट्रॅक्शन

नवरात्र (Navratri) म्हटलं की प्रत्येकाला गरब्याचे वेध लागते. नऊ दिवस नवदुर्गेची पूजा, उपवास, आरती आणि गरब्याचा गोंधळ असतो. मुख्य म्हणजे महिलावर्ग या नऊ दिवसांसाठी फार उत्सुक असतात. गरब्याला काय घालायचे, कोणता आउटफिट, कसा मेकअप आणि हेअरस्टाइल यावर तरूणी लक्ष देतात. पण त्यावर कोणते फुटवेअर घालायचे? याकडे विशेष लक्ष देत नाही. कारण काही महिला उपवासादरम्यान अनवाणी चालतात. तर काही महिला फुटवेअर घालतात.

गरबा खेळताना अनेकदा पायांना इजा होते. त्यामुळे गरबा खेळताना फुटवेअर घालणं गरजेचं आहे. गरबा नाईट्ससाठी महिला खास लेहेंगा-चोली घालतात. त्यामुळे त्यावर जुती किंवा मोजडीच घातली जाते. पण नऊ दिवस फक्त जुती किंवा मोजडीच घालू नका. इतरही ऑप्शन्स पाहा(4 Gorgeous Juttis for Garba: Navratri 2023).

मोजडी

मोजडी हे ट्रॅडिशनल फुटवेअर आहे. लेहेंगा-चोलीसोबत पायात मोजडी घातल्याने सुंदर एथनिक लूक मिळतो. मोजडी खूप आरामदायी असतात. त्यामुळे गरबा खेळताना आपल्या पायांना इजा होणार नाही. शिवाय गरबा खेळतानाही अडचण येणार नाही. मोजडीमध्ये देखील अनेक प्रकार आहेत. आपण आपल्या ट्रेडीशनल वेअरनुसार मोजडीची निवड करू शकता.

गरबा खेळायला जाताना मेकअप केल्यानंतर लिपस्टिकची शेड फिकट दिसते? ५ बेस्ट लिपस्टिक शेड्स, मिळेल सुंदर-रॉयल लूक

वेजेस हील्स फूटवेअर

नवरात्रीत गरबा खेळताना हिल्स घालणे टाळावे. पण जर आपली उंची कमी असेल तर, वेजेस हील्स फुटवेअर घालून आपल्या लूकला चारचांद लावा. लेहेंगा-चोलीसह वेजस हील्स फुटवेअर स्टाईल करा. पेन्सिल हील्स आणि इतर हिल्सपेक्षा ते अधिक आरामदायक आहेत.

स्नीकर्स

सध्या स्नीकर्सचा ट्रेण्ड खूप वाढला आहे. जर आपल्या फुटवेअरला ‘सेंटर ऑफ अट्रॅक्शन’ बनवायचे असेल तर, स्नीकर्स नक्की ट्राय करा. आता तुम्ही म्हणाल की, स्नीकर्स फक्त वेस्टर्न वेअरवर घातले जाते. पण आपण कोणत्याही लेहंग्यावर पांढऱ्या रंगाचे स्नीकर्स घालू शकता.

आलिया भटच्या ५ ब्यूटी टिप्स- नवरात्रात तुमच्याही चेहऱ्यावर झळकेल आलियासारखं तेज

फ्लिप-फ्लॉप

फ्लिप-फ्लॉप किंवा फ्लॅट्स फुटवेअर फक्त कॅज्युअल वापरासाठी असतात असे मानले जाते. पण तसे नसून, यातही अनेक प्रकार आहेत. लेहेंगा-चोलीवर घालता येतील असे फ्लॅट चपला बाजारात सहज उपलब्ध आहेत. या चपला आरामदायक असल्याने गरबा खेळताना आपल्या पायांना इजा होणार नाही.

टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव 2023गरबानवरात्री गरबा २०२३