Lokmat Sakhi >Social Viral > केसांत उवा-लिखा झाल्या आहेत? ४ उपाय - उवांचा उपद्रव होईल कमी

केसांत उवा-लिखा झाल्या आहेत? ४ उपाय - उवांचा उपद्रव होईल कमी

4 Home Remedies For How To Get Rid of Head Lice केसांमध्ये उवा अनेक कारणांमुळे होतात, ते कमी करण्यासाठी काही टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2023 01:01 PM2023-03-29T13:01:22+5:302023-03-29T13:02:13+5:30

4 Home Remedies For How To Get Rid of Head Lice केसांमध्ये उवा अनेक कारणांमुळे होतात, ते कमी करण्यासाठी काही टिप्स

4 Home Remedies For How To Get Rid of Head Lice | केसांत उवा-लिखा झाल्या आहेत? ४ उपाय - उवांचा उपद्रव होईल कमी

केसांत उवा-लिखा झाल्या आहेत? ४ उपाय - उवांचा उपद्रव होईल कमी

आपले केस कितीही सुंदर किंवा घनदाट असो, उवांमुळे केसांची सुंदरता कमी होते. उवा लवकर केसांमधून निघत नाही. उवांमुळे केसांमध्ये प्रचंड खाज सुटते. ज्यामुळे हेअर फॉलची समस्याही वाढते. अस्वच्छता व अव्यस्थित राहणीमानामुळे केसांमध्ये उवा तयार होतात.

बऱ्याचदा शाळेत किंवा घरात एखाद्या व्यक्तीच्या डोक्यात उवा असतील तर, इतरांच्या केसांमध्येही होतात. ज्यामुळे केसांच्या निगडीत अनेक समस्या उद्भवतात. टाळूवर खाज सुटणे, स्काल्पवर आग होणे, केसांची गळती, या समस्येपासून त्रस्त असाल तर, काही टिप्स फॉलो करा. जेणेकरून केसांमधून उवा कमी होतील(4 Home Remedies For How To Get Rid of Head Lice).

कडूलिंब व तुळशीचे तेल

केसांमधील उवा कमी करण्यासाठी, एका प्लेटमध्ये कडूलिंब आणि तुळशीची पाने एकत्र करून पेस्ट करा. एका भांड्यात खोबरेल तेल घ्या, व लो फ्लेमवर गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात तुळशी व कडूलिंबाची पेस्ट घालून मिक्स करा. आता थोडा वेळ हे तेल थंड होण्यासाठी ठेवा. थोडे तेल हातावर घेऊन स्काल्पवर मसाज करा. या तेलामुळे केसांमधील उवा कमी होतील, व केसांच्या निगडीत समस्याही दूर होईल.

गोड न खाल्ल्याने खरंच मधुमेहाचा धोका टळतो? तज्ज्ञांनी सांगितले काय खरं - काय खोटं..

केसांवर लावा कांद्याचा रस

कांद्याचा रस केसांसाठी फायदेशीर आहे. यासह  उवा कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. कांद्याचा रस बनवण्यासाठी सर्वप्रथम, २ ते ३ कांद्यांना कापून त्याचा रस तयार करा. आता त्यात एक चमचा हळद घालून मिश्रण मिक्स करा. व हे मिश्रण केसांवर व स्काल्पवर लावा. काही वेळेनंतर  पाण्याने केस धुवा. यामुळे केसांमधील उवा कमी होतील.

वाढलेली शुगरच नाही तर स्ट्रेसदेखील ठरतो सर्वात मोठा शत्रू, डायबिटिस असेल तर सावधान..

लिंबाचा रस ठरेल फायदेशीर

लिंबाचा रस खूप फायदेशीर ठरेल. यासाठी ८ ते १० लिंबाचा रस काढून घ्या. हा रस स्काल्पवर लावा, काही वेळानंतर केस धुवून घ्या. या उपायामुळे उवा कमी होतील.

लिंबू व लसणाची पेस्ट

लसूण आणि लिंबाची पेस्ट करण्यासाठी लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या घ्या, त्यात लिंबाचा रस घालून बारीक पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांवर लावा, व अर्ध्या तासाने केस धुवून घ्या. केसांमधून उवा निघून जातील.

Web Title: 4 Home Remedies For How To Get Rid of Head Lice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.