दिवाळी सरली आणि आता थंडीची चांगलीच चाहूल लागली आहे. दिवसभर जाणवत नसली तरी रात्री मात्र थंडी पडायला लागली आहे. एवढे दिवस अगदी फुल स्पीडमध्ये चालणारे पंखेही आता कमी स्पीडवर आले आहेत. त्यामुळे थंडीतल्या उबदार कपड्यांची आठवण होऊन ते आता कपाटातून बाहेर यायला लागले आहेत. पण एवढे दिवस ते कपडे आपण ठेवून दिलेले असतात. त्यामुळे वापरण्याच्या आधी एकदा पाण्यातून काढणं गरजेचं असतं. त्यामुळे जर लोकरीचे कपडे, जॅकेट धुवायला बाहेर काढले असतील तर ते धुताना काही गोष्टींची खबरदारी घ्यायला विसरू नका (how to clean woolen clothes?). कारण लोकरीचे कपडे चुकीच्या पद्धतीने धुतले गेले तर त्याची फिटींग बिघडून ते सैलसर होतात.(avoid 4 mistakes while washing winter sweater and jacket)
लोकरीचे कपडे धुताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?
१. लोकरीचे कपडे वॉशिंग मशिनमध्ये लावणार असाल तर ते इतर दुसऱ्या कपड्यांसोबत कधीही धुवू नका. लाेकरीचे कपडे नेहमी स्वतंत्रपणे धुवा आणि त्यासाठी मशिनच्या वॉशिंग सेटींगचा मोड सॉफ्ट ठेवा. तसेच लोकरीचे कपडे इतर कपडे पिळतो, त्याप्रमाणे हाताने जोर लावून कधीही पिळू नका. यामुळे ते लवकर सैल होतात.
तुम्ही खाल्ली का वर्षातून एकदाच मिळणारी 'खजला' मिठाई? वाचा उत्तरप्रदेशच्या मिठाईची रंजक कहानी...
२. लोकरीचे कपडे धुण्यासाठी अनेकजणी गरम पाणी वापरतात. पण गरम पाण्याने लोकरीचे कपडे धुतल्यास ते खूप लवकर सैल पडतात. त्यामुळे स्वेटर, जॅकेट धुण्यासाठी नेहमी थंड पाणी वापरा.
३. लोकरीचे कपडे धुण्याच्याआधी ते इतर कपड्यांप्रमाणे भिजत ठेवण्याची गरज नसते. अधिककाळ पाण्यात राहिल्यामुळेही ते खराब होऊ शकतात. तसेच लोकरीचे कपडे धुण्यासाठी हार्ड डिटर्जंटचा वापर करू नका. त्याऐवजी वॉशिंग लिक्विड किंवा शाम्पूचा वापर केल्यास अधिक चांगले.
पालकांच्या 'या' गोष्टी वाढवतात मुलांवरचा ताण; म्हणूनच मुलं शाळेतून घरी आल्यावर त्यांना कधीच.....
४. लोकरीचे कपडे नेहमी उलटे करून धुवावे. तसेच ते कधीही जास्त घासू नयेत. लोकरीचे कपडे दोरीवर थेट वाळत घालण्यापेक्षा हँगरला लावावे आणि हँगर दोरीला लटकवून वाळू द्यावे. यामुळे कपड्यांचा आकार बिघडत नाहीत.