जिथे पूजा होते तिथे दिवा आणि अगरबत्ती असतेच. घरात किंवा देवळात अगरबत्ती लावल्याने मन प्रसन्न राहते. बाजारात विविध प्रकारचे अगरबत्ती मिळतात. प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार सुगंधित अगरबत्तीची निवड करतात. परंतु, अगरबत्तीच्या राखेचा म्हणजेच अंगाऱ्याचा वापर कसा करायचा असा प्रश्न पडतो.
अंगाऱ्याचा वापर कशातच होत नाही, म्हणून काही जण फेकून देतात. परंतु, अंगाऱ्याचा वापर आपण ४ गोष्टींसाठी करू शकता. अगरबत्ती ही खरंतर औषधी वनस्पती, लाकूड, सुगंधीत तेलाच्या मिश्रणापासून तयार करण्यात येते. अगरबत्ती लावल्यानंतर शेवटी त्याची राख उरते. ती राख फेकून देण्यापेक्षा आपण ४ घरगुती कामांसाठी याचा वापर करू शकता(4 Interesting Ways to Use Incense Ash and SAVE).
नैसर्गिक कीटकनाशक
अंगाऱ्याचा वापर नैसर्गिक कीटकनाशक म्हणून केला जाऊ शकतो. यासाठी एक बाऊलमध्ये पाणी घ्या, त्यात अंगारा मिक्स करा. त्यानंतर त्यात निलगिरी किंवा पेपरमिंट एसेंशियल ऑइल मिसळून स्प्रे तयार करा. तयार स्प्रे एका स्प्रे बॉटलमध्ये भरून, त्या जागी शिंपडा ज्या ठिकाणी कीटक जास्त आहेत. केमिकल प्रॉडक्ट्सचा वापर करण्यापेक्षा, आपण नैसर्गिक कीटकनाशकचा वापर करू शकता.
काय सांगता! एकाच दिवशी संपूर्ण फॅमिलीचा बर्थ डे, आईबाबा आणि जुळ्या मुलांचा एकाच दिवशी वाढदिवस...
त्वचा एक्सफोलिएट करा
अंगाऱ्याचा वापर आपण त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी करू शकता. यासाठी पाण्यात अंगारा मिक्स करा, त्यात आपल्या आवडीच्या तेलाचे काही थेंब मिक्स करून चेहऱ्यावर लावा. व हाताने चेहरा स्क्रब करा. यामुळे पोर्समधील साचलेली घाण निघून जाईल. व चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येईल. मात्र, हा स्क्रब वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.
खतामध्ये मिक्स करा
अंगारा खनिजांनी समृद्ध असते. आपण याचा वापर नैसर्गिक खत म्हणून करू शकता. अंगारा थेट मातीत मिसळण्यापेक्षा कंपोस्टमध्ये मिक्स करून मातीत मिसळा. यामुळे झाडांना हानी पोहोचणार नाही.
स्क्रॅच पडल्याने कार खराब दिसते? खोबरेल तेलाचा १ खास उपाय, ओरखडे होतील गायब
भांडी चमकवण्यासाठी करा वापर
जर घरातील स्टेनलेस स्टीलची भांडी काळपट पडली असेल तर, अंगाराचा वापर करून भांडी स्वच्छ करा. थेट अंगारा हातावर घ्या, व याने भांडी घासून काढा. त्यानंतर लगेच पाण्याने धुवा. यामुळे जास्त मेहनत न घेता, स्टेनलेस स्टीलची भांडी चमकतील.