Lokmat Sakhi >Social Viral > स्वयंपाक घरातले नळ - भाजी चिरण्याचा बोर्ड १ मिनिटांत चकाचक करण्याच्या ३ टिप्स...

स्वयंपाक घरातले नळ - भाजी चिरण्याचा बोर्ड १ मिनिटांत चकाचक करण्याच्या ३ टिप्स...

Kitchen Cleaning Tips : किचनमधील लहान - मोठ्या गोष्टी स्वच्छ करणे हे काम गृहिणींना किचकट वाटते... हे किचकट काम सोपे करण्यासाठी काही झटपट उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2023 08:53 PM2023-07-20T20:53:26+5:302023-07-21T12:08:49+5:30

Kitchen Cleaning Tips : किचनमधील लहान - मोठ्या गोष्टी स्वच्छ करणे हे काम गृहिणींना किचकट वाटते... हे किचकट काम सोपे करण्यासाठी काही झटपट उपाय...

4 Kitchen Cleaning Hacks That Save Time & Actually Work. | स्वयंपाक घरातले नळ - भाजी चिरण्याचा बोर्ड १ मिनिटांत चकाचक करण्याच्या ३ टिप्स...

स्वयंपाक घरातले नळ - भाजी चिरण्याचा बोर्ड १ मिनिटांत चकाचक करण्याच्या ३ टिप्स...

घर आणि किचन म्हटलं की ते टापटीप दिसण्यासाठी त्यांची स्वच्छता आलीच. जेव्हा घरातल्या स्वच्छतेचा प्रश्न येतो तेव्हा घरातील इतर खोल्या, किचन या सगळ्यांची स्वच्छता करणे आवश्यक असतेच. घराची आणि किचनची स्वच्छता तर आपण करतोच परंतु यासोबतच घर आणि किचनमधील अनेक छोट्या - छोट्या गोष्टींची देखील स्वच्छता करावी लागतेच. अस्वच्छ किचन कोणत्याही गृहिणीला आवडत नाही. यासाठी किचनमधील गॅस शेगडी, डबे, किचन टाईल्स, सिंक यांसारख्या अनेक लहान मोठ्या गोष्टी वेळीच स्वच्छ ठेवाव्या लागतात.

आपले घर आणि त्याचे किचन हे संपूर्ण घराचे महत्वपूर्ण भाग आहेत. गृहिणी घरातील जास्तीत जास्त वेळ हा किचनमध्येच घालवतात. त्याचबरोबर गृहिणींचा सर्वात जास्त वेळ हा किचनमधील पसारा आवरण्यात व वस्तूंची स्वच्छता करण्यातच जातो. जर किचन व किचनमधील वस्तू स्वच्छ असतील तर आपल्याला देखील किचनमध्ये फ्रेश वाटते. यासाठी किचनमधील काही छोट्या - छोट्या गोष्टी स्वच्छ करण्यासाठी गृहिणींसाठी काही खास टिप्स पाहूयात(4 Kitchen Cleaning Hacks That Save Time & Actually Work).

किचनमधील छोट्या - छोट्या गोष्टींची स्वच्छता राखण्यासाठी काही सोपे उपाय... 

१. किचन मधील सँडविच टोस्ट करायचा टोस्टर किंवा ज्याला आपण ग्रील म्हणतो तो आतून अगदीच खराब झाला असेल तर, एक पातळ टिश्यू पेपर घेऊन तो या टोस्टरच्या आतील बाजूस व्यवस्थित अंथरून घ्यावा. आता किंचितसे पाणी स्प्रे करुन हा संपूर्ण टिश्यू पेपर थोडासा ओला करुन घ्यावा. आता टोस्टरचे झाकण बंद करुन १० ते १५ मिनिटे तसेच ठेवून द्यावे. १५ मिनिटानंतर झाकण उघडून टिश्यू पेपर काढून घ्यावा. टोस्टरला चिकटलेला तेलकटपणा, चिकटपणा ओला टिश्यू पेपर खेचून घेतो. यामुळे अगदी सहज सोप्या पद्धतीने टोस्टर स्वच्छ करता येऊ शकतो. 

तव्यावर काळे डाग पडले, तेलकट-चिकट थर साचला ? ३ सोप्या ट्रिक्स, तवा दिसेल नवाकोरा चकचकीत...

२. बेसिन किंवा सिंकचे स्टीलचे नळ सतत वापरून खराब होतात. काहीवेळा या नळांना आपला तेलकट हात लागून ते चिकट होतात. असे झाल्याने हे नळ काही दिवसांनंतर जुने दिसू लागतात. असे स्टीलचे नळ स्वच्छ करण्यासाठी मेणबत्ती घेऊन या नळांवर घासावी. त्यानंतर सुक्या कापडाने हे नळ पुसून घ्यावे. यामुळे जुने दिसणारे नळ स्वच्छ होऊन चमकू लागतात. 

स्वयंपाक घरातील चिमणी तेलकट डागाने झाली काळीकुट्ट ? ४ सोपे उपाय... चिमणी चमकेल नव्यासारखी...

३. फळं, भाज्या कापण्याचा चॉपिंग बोर्ड आपण दररोज वापरतो. या चॉपिंग बोर्डवर फळं, भाज्या कापून तो बरोबर मध्यभागी खराब होतो. असा चॉपिंग बोर्ड स्वच्छ करण्यासाठी लिंबाची फोड घेऊन ती या चॉपिंग बोर्डवर घासावी. आपण लिंबाचा रस घालून त्याच्या सालीने हा चॉपिंग बोर्ड घासून स्वच्छ करुन घेऊ शकतो. यानंतर हा चॉपिंग बोर्ड स्वच्छ पाण्याने व सौम्य साबणाने धुवून घ्यावा. 

किचन कॅबिनेट- ट्रॉल्यांची दारं तेलकट-चिकट झाली? २ सोपे उपाय, कॅबिनेट चमकेल नव्यासारखं...

४. एका बाऊलमध्ये बेकिंग सोडा घेऊन त्यात लिक्विड डिश वॉश व गरजेनुसार पाणी घालावे. हे मिश्रण एकजीव करून त्याची पातळसर पेस्ट करून घ्यावी. ही पेस्ट एका स्क्वीझ बॉटलमध्ये भरून घ्यावी. हे मिश्रण आपण बेसिन, सिंक किंवा कमोड मध्ये ओतून मग घासून स्वच्छ करु शकता.

पावसाळ्यात किचनमध्ये कुबट वास येतो ? ६ टिप्स, स्वयंपाकघरात वाटेल फ्रेश...

Web Title: 4 Kitchen Cleaning Hacks That Save Time & Actually Work.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.