माठातले पाणी थंड आणि फ्रेश असते (Clay Pot). उन्हाळ्यात आपण फ्रिजऐवजी माठातले पाणी पितो. यामुळे शरीराला फायदेच मिळतात. शिवाय अनेक आजारांपासून आपले रक्षणही होते (Health Tips). मातीच्या माठातले पाणी नैसर्गिकरित्या थंड होते. जे प्यायल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइटची कमतरता दूर होते, शिवाय पचनक्रियाही सुधारते (Summer Special). पण उन्हाळ्यात माठातले पाणी पिताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.
काही नकळत घडणाऱ्या चुकांमुळे आरोग्याचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे माठातले पाणी पिताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? यामुळे आरोग्याला कोणते दुष्परिणाम सहन करावे लागतील? पाहूयात(4 Mistakes You May Be Making While Drinking Water from Clay Pot).
डोसा लोखंडी तव्याला चिकटतो, नेहमी तुटतो? चमचाभर मिठाचा सोपा उपाय-डोसा होईल परफेक्ट
माठातले पाणी पिताना कोणत्या चुका टाळावे?
- माठातले पाणी ताजे आणि फ्रेश असते. जे अनेक आजारांपासून सरंक्षण करते. शिवाय हायड्रेट ठेवण्यासही मदत करते. पण माठात पाणी साठवण्यापूर्वी मडके स्वच्छ धुवून घ्यावे. असे न केल्यास त्यात बॅक्टेरिया आणि बुरशी वाढतात. जे पाण्यात मिक्स होतात. जे पाणी पिण्यायोग्य नसते.
- लहान मुलांना किंवा काहींना मडक्यात ग्लास बुडवून पाणी काढण्याची सवय असते. असे करू नका. यामुळे हातातील आणि नखातील बॅक्टेरिया पाण्यात मिसळतात. जे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे मडके नेहमी झाकून ठेवावे. माठातून पाणी काढण्यासाठी एक लहान भांड्याचा वापर करा.
लालबुंद कलिंगड बिंधास्त खाताय? त्या कलिंगडाला इंजेक्शन तर टोचलेलं नाही? जीवावर बेतेल कारण..
- उन्हाळ्यात मडक्यात पाणी नेहमी थंड राहावे म्हणून, माठाभोवती एक सुती कापड ओला करून गुंडाळा. हे कापड रोज धुवा. जर आपण असे केले नाही तर, कपड्यावर फंगल आणि बॅक्टेरिया निर्माण होऊ शकतात.
- भांड्यातील पाणी रोज बदलावे. तेच पाणी जास्त वेळ पिणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. प्रत्येक वेळी माठ स्वच्छ केल्यानंतरच त्यात ताजे पाणी भरावे. शुद्ध पाणी न प्यायल्याने पोटाचा त्रास, इन्फेक्शन आणि टायफॉइडसारखे गंभीर आजार होऊ शकतात.