Lokmat Sakhi >Social Viral > बाथरुमचे नळ गंजलेत, पाण्याचे डाग पडलेत? ४ ट्रिक्स- नळ चमकतील नव्यासारखे लख्ख

बाथरुमचे नळ गंजलेत, पाण्याचे डाग पडलेत? ४ ट्रिक्स- नळ चमकतील नव्यासारखे लख्ख

4 Quick Tips To Clean Bathroom Taps : घरात  उपलब्ध असलेले  काही पदार्थ वापरून नळ स्वच्छ केल्यास तुमचं अधिक सोपं होईल आणि खर्चही वाचेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 08:34 AM2023-06-26T08:34:00+5:302023-06-26T13:00:39+5:30

4 Quick Tips To Clean Bathroom Taps : घरात  उपलब्ध असलेले  काही पदार्थ वापरून नळ स्वच्छ केल्यास तुमचं अधिक सोपं होईल आणि खर्चही वाचेल.

4 Quick Tips To Clean Bathroom Taps : Cleaning Hacks how to clean water bathroom taps | बाथरुमचे नळ गंजलेत, पाण्याचे डाग पडलेत? ४ ट्रिक्स- नळ चमकतील नव्यासारखे लख्ख

बाथरुमचे नळ गंजलेत, पाण्याचे डाग पडलेत? ४ ट्रिक्स- नळ चमकतील नव्यासारखे लख्ख

घर, स्वच्छ आणि नीटनेटकं दिसण्यसासाठी घरातील कानाकोपऱ्यांची स्वच्छता करणं गरजेचं असतं.   बेसिन, बाथरूमध्ये नवीन नळ बसवल्यानंतर काही वेळानंतर नळ खराब व्हायला सुरूवात होते. अशा स्थितीत रोज साफ सफाई करण्यासाठी काही हॅक्स फायदेशीर ठरू शकतात. (Cleaning Hacks) यामुळे नळ स्वच्छ चमकदार दिसण्यास मदत होते. बाथरूमचे नळ खारट पाणी, गंज यांमुळे खऱाब होतात. (How to clean tap) घरात  उपलब्ध असलेले  काही पदार्थ वापरून नळ स्वच्छ केल्यास तुमचं अधिक सोपं होईल आणि खर्चही वाचेल. (4 Quick Tips To Clean Bathroom Taps)

व्हिनेगर

हट्टी डाग काढून टाकण्यासाठी व्हिनेगर एक उत्तम पर्याय आहे. यासाठी सगळ्यात आधी १ कप पाण्यात २ ते ३ चमचे व्हिनेगर, १ चमचा, बेकींग सोडा मिसळा. यानंतर लिक्वीड एका स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि घाणेरड्या नळांवर स्प्रे करा या ट्रिकनं स्वच्छता केल्यानंतर तुम्हाला नळ आधीपेक्षा चमकदार दिसेल.

फक्त साबणानं नळ स्वच्छ करू नका

बहुतेक लोक फक्त पाण्याने नळ धुतात, यामुळे त्यावर डाग निसतात आणि नळ जुना दिसतो, त्याचा रंग फिका पडतो. तुमच्यासोबतही असे काही असेल तर पाण्यात डिटर्जंट मिसळा आणि नळ स्वच्छ करा. यामुळे सर्व डाग नाहीसे होतात आणि नळ पुन्हा चमकदार होतो.

गरम पाणी

गरम पाण्याच्या मदतीने तुम्ही नळांसह अनेक गोष्टी स्वच्छ करू शकता. तुम्हाला फक्त कोमट पाण्यात १ चमचा लिंबाचा रस घालायचा आहे. या पाण्यात कापड ओले करून नळ स्वच्छ करा. नळ पटकन साफ ​​करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे.

बेकींग सोडा आणि चूना

बेकिंग सोडा विविध घरगुती कारणांसाठी वापरला जातो. त्याच्या मदतीने तुम्ही नळही स्वच्छ करू शकता. यासाठी 1 चमचा बेकिंग सोडा घ्या आणि त्यात 1/2 चमचा चुना घाला. आता याची पेस्ट तयार होईल. 3 ते 5 मिनिटे नळावर राहू द्या आणि नंतर स्क्रबच्या मदतीने घासून घ्या. असे केल्याने नळावरील गंज आणि डाग बर्‍याच प्रमाणात नाहीसे होतात.

Web Title: 4 Quick Tips To Clean Bathroom Taps : Cleaning Hacks how to clean water bathroom taps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.