आकाराने लहान पण झुरळांना अनेक जण घाबरतात. कॉकरोच दिसताच, तिथून पळ काढतात. पण झुरळांपासून पळ काढण्यापेक्षा घरातून झुरळांना पळवून लावा. घरात झुरळं झालीत की रोगराई पसरते. शिवाय एकदा का घरात झुरळांनी ताबा घेतला तर, घर लवकर झुरळमुक्त होत नाही. त्यामुळे झुरळांचा फौज वाढण्याआधी त्यांना घरातून पळवून लावा.
कॉकरोचांचं साम्राज्य घरात नको असेल तर, आपण अनेकदा केमिकल प्रॉडक्ट्सचा वापर करतो. पण या प्रॉडक्ट्समुळे आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे सोप्या घरगुती उपायांना फॉलो करून झुरळांना पळवून लावा(4 Simple Way to Get Rid of Cockroaches this Diwali).
बेकिंग सोडा
बेकिंग सोड्याचा वापर फक्त जेवणात होत असून इतर कारणांसाठीही होतो. बेकिंग सोड्याचा वापर आपण झुरळांना पळवून लावण्यासाठी करू शकता. यासाठी एका वाटीत एक चमचा बेकिंग सोडा घ्या, त्यात साखर किंवा पिठीसाखर मिक्स करा. ज्या ठिकाणी झुरळांचा वावर आहे, त्याठिकाणी तयार पावडर शिंपडा. यामुळे झुरळं घरातून पळून जातील.
कडुलिंबाची पाने
कडुलिंबात कीटकनाशक गुणधर्म आढळतात. त्याच्या उग्र वासामुळे घरातून झुरळं पळून जातील. यासाठी कडुलिंबाची पावडर किंवा तेल झुरळं झालेल्या ठिकाणी शिंपडा. याच्या वासाने झुरळं त्या ठिकाणी पुन्हा फिरकणार नाहीत.
तमालपत्र
तमालपत्र या मसाल्याचा वापर आपण विविध पदार्थांमध्ये केलाच असेल. याच्या वापराने आपण झुरळांना पळवून लावू शकता. यासाठी तमालपत्राची पावडर तयार करा. एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात तमालपत्राची पावडर घालून मिक्स करा. पाणी थंड झाल्यानंतर स्प्रे बॉटलमध्ये भरा, व ज्याठिकाणी झुरळं जास्त असतील त्याठिकाणी शिंपडा.
मळकट-चिकट टाईल्समुळे किचनची शोभा कमी झाली? लिंबाचे २ उपाय, मेहनत न घेता-टाईल्स होतील चकाचक
लवंग
लवंगाच्या उग्र वासामुळे झुरळंच नसून इतरही कीटक पळून जातात. झुरळांची दहशत कमी करण्यासाठी आपण लवंगाचा वापर करू शकता. यासाठी ज्याठिकाणी झुरळं जास्त आहेत, त्या ठिकाणी लवंग ठेवा.