हा अनुभव प्रत्येकाने कधी ना कधी घेतलेलाच असतो. आपण मोठ्या हौशेने नविन चप्पल, बूट, सॅण्डल विकत घेतो. अगदी आनंदात ते घालतो. पण पुढच्या तासाभरातच ते पायाला कुठेतरी टोचू (etching due to tight footwear) लागतात. बूट आणि सॅण्डल असतील तर ते खासकरून पायाच्या मागच्या बाजूला म्हणजेच टाचेच्या वरच्या भागात चावतात (shoes, sandal rubbing on feet). सुरुवातीला एक- दोन दिवस आपण हा त्रास सहन करतो. पण नंतर मात्र त्या भागावर जखमा होऊ लागतात. महागडे बूट मग तसेच घरात पडून राहतात. म्हणूनच हे काही घरगुती उपाय (home remedies) करून बघा. चावरे, टोचणारे बूट, चप्पल, सॅण्डल होतील एकदम आरामदायी.
बूट, चप्पल, सॅण्डल चावत किंवा टोचत असल्यास...
१. बॅण्डेजचा वापर
ज्या ठिकाणी चप्पल, बूट किंवा सॅण्डल चावत असेल त्या ठिकाणी त्या बूटाला बॅण्डेज चिटकवून टाका. ३ ते ४ दिवस ते तसेच राहू द्या. त्यानंतर काढून टाकले तरी चालेल. या उपायानंतर बूट पुन्हा चावणार नाही.
फक्त एकच व्यायाम, चरबी वितळेल झटपट... कॅलरी बर्नसाठी मलायका अरोरा सांगतेय खास व्यायाम
२. बटाटा
हा उपाय ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल. पण बटाट्याचे तुकडे खरोखरच यासाठी खूप कामी येतील. जेव्हा बूट खूप घट्ट होतो, तेव्हा तो टोचू लागतो. अशा बुटांमध्ये रात्रीच्या वेळी बटाट्याचे काप करून ठेवा. रात्रभर तसेच राहू द्या आणि सकाळी काढून टाका. बटाट्यातलं मॉईश्चर बुटांना थोडं सैलसर करण्यास मदत करतं. त्यामुळे बूट टोचणं कमी होतं.
३. सॅनिटरी नॅपकीन
बूट ज्या भागात चावतो आहे, त्याच्या आतल्या बाजूने सॅनिटरी नॅपकीनचा एक तुकडा कापून लावा. यामुळे बूट तर टोचणार नाहीच, पण तुमच्या पायांनाही मऊ वाटेल.
image credit- google
४. सॅण्डलचा बेल्ट टोचत असल्यास
बऱ्याचदा सॅण्डलचा मागचा बेल्ट टाचेच्या वरच्या भागात खूप टोचतो. या बेल्टला त्याच रंगाशी मिळतीजुळती लोकर किंवा एखादा धागा गुंडाळला तर पायांना आराम मिळेल.