कोणत्या इलेक्ट्रॉनिक (Electronic Items) वस्तूंची वेळेनुसार सफाई करणं गरजेचं आहे. कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण दीर्घकाळ सर्व्हिसिंगशिवाय चालवू नये. यामुळे उपकरण कधीही बिघडू शकते. वॉशिंग मशिन असो, रेफ्रिजरेटर (Refrigerator) असो किंवा टीव्ही, त्यांची वेळोवेळी सर्व्हिसिंग यासह सफाई करणं गरजेचं आहे. जेणेकरून ते लवकर खराब होत नाही.
फ्रिजला देखील वेळोवेळी साफ करणं गरजेचं आहे. फ्रिजचा वापर दररोज होतो. त्यात बरेच जण खाण्याचे वस्तू साठवून ठेवतात. यात अन्न साठवून ठेवल्यास लवकर खराब होत नाही. पण अन्न-पदार्थांमुळे फ्रिज लवकर खराब होऊ शकते. प्रत्येक जण फ्रिजला हायजीन आणि मेन्टेन ठेवतात. पण फ्रिजची सफाई (Cleaning Tips) करताना अशा काही चुका घडतात, ज्यामुळे फ्रिज साफ होण्याऐवजी बिघडू शकते. फ्रिज साफ करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी पाहा(4 Steps to Clean your Refrigerator).
फ्रिजची सफाई करताना घ्या ४ गोष्टींची काळजी (Cleaning Tips of Refrigerator)
- फ्रिज नेहमी ओल्या कापडाने पुसून काढा. फ्रिजमधील आतील आणि बाहेरील बाजू स्वच्छ करण्यासाठी क्लीनर किंवा साबणाच्या पाण्याचा वापर करा.
मोहम्मद शमीवर बेताल आरोप करणारी हसीन जहाँ कोण? तिची शमीवर एवढी खुन्नस का आहे?
- फ्रिज नेहमी स्वच्छ करताना प्लग पॉवर सॉकेटमधून काढायला विसरू नका. यासह फ्रिजमधील साहित्य बाजूला काढून ठेवा. आपण फ्रिज डिशवॉशर लिक्विडने देखील पुसून काढू शकता.
- फ्रिजची आतील बाजू स्वच्छ करताना स्टीलच्या स्क्रबरचा वापर करू नका. नेहमी सॉफ्ट कापडाने फ्रिज साफ करा.
मला माफ करा, माझे निधन झाले! कॅन्सरशी लढली पण सोशल मिडियात पोस्ट केली आणि...
- फ्रिजच्या डोअरवर लावण्यात आलेला रबर साफ करणं गरजेचं आहे. जर तो अधिक घाण झाला असेल तर, फ्रिजचा दरवाजा लवकर बंद होऊ शकणार नाही. आपण फ्रिजच्या डोअरवर लावण्यात आलेला रबर ब्रशने साफ करू शकता. ब्रशने साफ केल्यास त्यातील साचलेली घाण मेहनत न घेता लवकर निघून जाईल.