Join us  

युज ॲण्ड थ्रोवाले प्लास्टिक कप फेकू नका; ४ स्मार्ट उपयोग-प्लास्टिक कचराही होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2023 1:53 PM

4 Things to Do with Plastic Cups प्लास्टिकच्या वस्तू वापरुन फेकल्यानं कचरा वाढतो, त्याचा योग्य वापर हीच स्मार्ट गोष्ट

आपण भारतीय लोकं टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्यात माहीर असतो. अनेकांमध्ये तर क्रिएटिव्हिटी ठासून भरलेली असते. अनेक जण बॉक्स,  प्लास्टिक बॉटल्स, जुने कपड्यांना नवा टच देऊन विविध गोष्टी तयार करतात. पण प्लास्टिक ग्लासेसचं काय? याचा वापर फक्त पाणी आणि ज्यूस पिण्यासाठी होतो.

अनेक सभारंभ किंवा कार्यक्रमात, लोकांना पाणी पिण्यासाठी प्लास्टिक ग्लास दिला जातो. प्लास्टिक ग्लास वन - युज असतो. एकदा वापरल्यानंतर तो फेकून दिला जातो. पण प्लास्टिक ग्लास फेकून देण्यापेक्षा, त्याचा वापर आपण अनेक घरगुती गोष्टींसाठी करू शकतो. ते कसे पाहूयात(4 Things to Do with Plastic Cups).

प्लास्टिक ग्लासचा वापर कुंडी म्हणून करा

प्रत्येकाला घरात रोपे लावायला आवडतात. परंतु, कुंड्यांचा खर्च वाचवायचा असेल तर, प्लास्टिक ग्लासचा वापर करा. रोपे लहान असतील तर, आपण प्लास्टिक ग्लासचा वापर करू शकता. प्लास्टिकच्या ग्लासमध्ये माती टाकून छोटी रोपे लावा. प्लास्टिक ग्लासला सुंदर लूक देण्यासाठी आपण त्यावर पेंटही करू शकता.

छोटी भूक भागवण्यासाठी चिप्स - कुरकुरे खाणं टाळा, घरीच करा कुरकुरीत मसाला काजू

पेंटिंगसाठी प्लास्टिक ग्लासचा वापर करा

अनेकांना रंगाच्या छोट्या बाटलीमध्ये पेंटिंग करायला जमत नाही. अशावेळी आपण प्लास्टिक ग्लासचा वापर करू शकता. त्यात रंग तयार करून पेंटिंग करू शकता. यामुळे इतरत्र रंगाचे डाग पडणार नाही.

प्लास्टिक ग्लासचे बनवा बॉक्स

आपण प्लास्टिक ग्लासचा वापर त्याचा बॉक्स बनवून करू शकता. हॉटेल्समध्ये मिळणाऱ्या छोट्या डब्यांची झाकणे ग्लासवर सहज बसतात. किचनमधील लहान वस्तू ठेवण्यासाठी आपण याचा वापर करू शकता.

१० वर्षांची लेक म्हणाली मला लग्न करायचंय, तिची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी आईबाबांनी केलं धाडस

स्टडी टेबलवर प्लास्टिकचे ग्लास ठेवा

अनेक मुलं स्टडी टेबलवर लहान डस्टबिन ठेवतात. जर आपला डस्टबिन घाण किंवा खराब झाला असेल तर, आपण प्लास्टिक ग्लासचा वापर करू शकता. त्यात स्टडीच्या संबंधित नको असलेल्या गोष्टी टाकू शकता. 

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरल