नेहमीची झटपट काम करण्यासाठी आपण मशीन्सचा (Washing Machine) वापर करतो. मशीनच्या वापरामुळे कामे झटपट होतात. स्वयंपाक ते कपडे धुणे (Cleaning Tips). विविध मशीनच्या वापरामुळे मेहनत आणि वेळेची बचत होते. आजकाल बहुतांश घरात वॉशिंग मशीन असतेच. वॉशिंग मशीनमध्ये कपडे लवकर स्वच्छ होतात. पण काही कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुणे टाळावे. यामुळे वॉशिंग मशीन खराब होण्याची शक्यता असते.
वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना काही विशेष गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. यामुळे महागडे कपडे आणि वॉशिंग मशीन खराब होण्याची शक्यता असते. कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन वापरत असाल तर, कोणत्या गोष्टी टाळाव्या? वॉशिंग मशीनमध्ये कोणत्या प्रकारचे कपडे धुवू नये?(4 Things You Should Never Put in the Washing Machine).
लोकरीचे कपडे
वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना लोकरीचे कपडे त्यात घालू नये. यामुळे लोकरीचे कपडे खराब होऊ शकतात. यासह वॉशिंग मशीनचा ड्रम देखील खराब होऊ शकतो. लोकरीचे कपडे शक्यतो हाताने धुवावेत. शिवाय सौम्य डिटर्जंट वापरावे.
२ मिनिटांत प्रेशर कुकरमध्ये करा कुरकुरीत फुटाणे; वाळूची गरज भासणारच नाही..
डिझाईनर कपडे
वॉशिंग मशिनमध्ये ज्या कपड्यांवर मोती किंवा डिझाईन असेल, ते कपडे शक्यतो वॉशिंग मशिनमध्ये धुणे टाळावे. यामुळे डिझाईन तर खराब होतेच, यासह धागे कमकुवत होतात. त्यामुळे डिझाईनर कपडे शक्यतो हाताने किंवा लॉन्ड्रीमध्ये धुवायला द्यावे.
स्वयंपाकाचे तेल किंवा अल्कोहोलचे डाग
कपड्यांवर अनेक प्रकारचे डाग पडतात. परंतु, कपड्यांवर स्वयंपाकाचे तेल, अल्कोहोल किंवा मोटर ऑइलचे डाग पडेल असतील तर, मशीनमध्ये टाकू नये. यामुळे वॉशिंग मशीन खराब होण्याची शक्यता असते.
कडाक्याच्या थंडीमुळे त्रस्त? रोज ५ पैकी १ पालेभाजी खा; आजार राहतील लांब - तब्येत ठणठणीत
रेनकोट
रेनकोट वॉटरप्रूफ असतात आणि मशीनमध्ये धुण्यासाठी टाकल्यावर रेनकोट फुग्यासारखे पसरतात. त्यामुळे रेनकोट फाटण्याची आणि मशीन खराब होण्याची भीती असते.