Join us  

चष्म्याच्या काचेवर चरे पडतात, लवकर खराब होतो? ४ टिप्स, चष्मा राहील स्वच्छ- चकचकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2022 5:50 PM

How to Clean Glasses or Spectacles: काही जणांचा चष्मा खूप लवकर खराब होतो. कारण चष्मा स्वच्छ करताना नकळत काही चुका होतात. त्यासाठीच या बघा चष्मा स्वच्छ करण्याच्या काही खास टिप्स..

ठळक मुद्देवर्षानुवर्षे चष्मा वापरूनही नकळत काही चुका होऊन जातात आणि मग काचेवर चरे पडून चष्मा लवकरच खराब होऊन जातो.

चष्मा ही आजकाल प्रत्येक घरात अगदी सहजतेने आढळून येणारी एक गरजेची वस्तू झाली आहे. शिवाय लहान मुलांनाही कमी वयातच चष्मा लागण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रत्येक घरात चष्म्याचा नियमितपणे वापर करणारी एक तरी व्यक्ती नक्कीच आढळून येते. चष्मा स्वच्छ करणं हे अशा सगळ्या मंडळींचं एक नित्याचं काम. पण वर्षानुवर्षे चष्मा वापरूनही नकळत काही चुका होऊन जातात आणि मग काचेवर चरे पडून चष्मा लवकरच खराब होऊन जातो. असं होऊ नये म्हणून चष्मा स्वच्छ करण्यासाठी (Proper method of cleaning spectacles) या काही गोष्टी वापरून बघा..

चष्मा स्वच्छ करण्यासाठी...१. चष्मा स्वच्छ करण्यासाठी कधीही काेरडा कपडा वापरू नका. तसेच कॉटन किंवा होजियरी सोडून इतर कोणत्याही कपड्याने चष्मा स्वच्छ करू नका. अर्थातच हे दोन्ही कपडेही ओलसरच असावेत.

६ कारणांमुळे हिवाळ्यात वारंवार होते सर्दी... फिट राहण्यासाठी बघा नेमकं काय करायचं

२. बेबी वाईप्स किंवा चेहरा पुसण्यासाठी वापरण्यात येणारे वेट वाईप्स वापरूनही चष्मा खूप चांगल्याप्रकारे स्वच्छ करता येतो.

 

३. रोज रात्री झोपताना जेव्हा चष्मा काढाल तेव्हा तो १५ ते २० सेकंदासाठी नळाखाली धरा. त्यानंतर तो न पुसता तसाच उभा ठेवून द्या. सकाळी ओलसर कपड्याने चष्मा पुसून घ्या. काचा स्वच्छ- चकचकीत होईल.

केस गळणं कमी करणारे ३ जादुई पदार्थ! करून बघा तज्ज्ञांनी सांगितलेला खास उपाय

४. व्हाईट व्हिनेगर वापरूनही चष्मा स्वच्छ करता येतो. यासाठी एक वाटी पाणी घ्या. त्यात दोन टेबलस्पून व्हाईट व्हिनेगर टाका. हे मिश्रण व्यवस्थित हलवून एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. ते चष्म्यावर स्प्रे करून मग ओल्या कपड्याने पुसून घ्या. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्स