Join us

कॉटन पॅण्ट- जीन्स काही दिवसांतच फिक्या पडतात? ४ टिप्स, जुन्या झाल्या तरी रंग उडणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2024 14:26 IST

Tips And Tricks For Washing Jeans And Cotton Pants: जीन्स, कॉटन पॅण्ट धुताना काही गोष्टींची काळजी घेतली तर त्यांचा रंग उडत नाही.( why jeans and cotton pants get faded within few weeks?)

ठळक मुद्देदोन्ही पॅण्ट धुताना थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. कारण त्या जर चुकीच्या पद्धतीने धुतल्या गेल्या तर त्यांचा रंग लगेच फिका पडतो.

हल्ली बहुसंख्य तरुण मंडळींसाठी सगळ्यात जास्त आरामदायी कपडे जर कोणते असतील तर ते म्हणजे जीन्स.. अगदी तरुण मंडळींपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत स्त्री असाे किंवा पुरूष असो कित्येक जण अगदी धुमसून जीन्स वापरतात. प्रवासात जाताना तर अनेक जण एकच जीन्स सोबत घेतात कारण ती इतर बऱ्याच रंगाच्या शर्टवर, कुर्त्यांवर अगदी सहज चालून जाते. हल्ली कॉटन पॅण्टचाही ट्रेण्ड आला आहे. जे लोक कॉटन पॅण्ट वापरतात त्यांना तर त्या जीन्सपेक्षाही जास्त आरामदायी वाटतात (Tips And Tricks For Washing Jeans And Cotton Pants). पण या दोन्ही पॅण्ट धुताना थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. कारण त्या जर चुकीच्या पद्धतीने धुतल्या गेल्या तर त्यांचा रंग लगेच फिका पडतो ( why jeans and cotton pants get faded within few weeks?) आणि मग काही महिन्यांतच त्या जुन्या दिसू लागतात.(4 tips to save your new jeans and cotton pants from fading)

 

जीन्स, कॉटन पॅण्टचा रंग उडू नये म्हणून टिप्स.. 

१. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जीन्स किंवा कॉटन पॅण्ट धुण्यासाठी कधीही गरम किंवा कोमट पाणी वापरू नये. या पॅण्ट धुण्यासाठी नेहमीच थंड पाण्याचा वापर करावा. तसेच जीन्स किंवा कॉटन पॅण्ट धुण्यापुर्वी कधीही खूप जास्त वेळ भिजत ठेवू नका. अगदी १० ते १५ मिनिटे पाण्यात भिजत घातल्या तरी पुरेसे आहे.

AI-Mom देणार पालकत्वाचेही सल्ले, सोशल मीडियातली व्हायरल चर्चा-आईच्या मायेनं मशिन काम करेल?

२. जीन्स किंवा कॉटन पॅण्ट धुण्यासाठी कधीही हार्ड साबण किंवा डिटर्जंट वापरू नका. त्याऐवजी लिक्विड डिटर्जंट किंवा शाम्पूचा वापर करता आला तर अधिक चांगले.

 

३. जीन्स किंवा कॉटन पॅण्ट धुताना नेहमी त्यांची आतली बाजू बाहेर काढून मगच त्या धुवाव्या. त्यामुळे त्यांचा रंग उडून त्या फिक्या पडत नाहीत.

डाएट करूनही वजन थोडंसुद्धा कमी होत नाही? बघा काय चुकतं- डाएटिंगचा उपयोग होण्यासाठी.... 

४. जीन्स, कॉटन पॅण्ट, सिल्कचे कपडे किंवा इतर कोणतेही महागडे कपडे कधीही कडक उन्हात वाळू घालू नयेत. कडक उन्हाचा परिणाम कपड्यांच्या रंगावर होतो. कपड्यांचा रंग उडतो. असे कपडे नेहमी सावलीतच वाळवावे.

 

टॅग्स :सोशल व्हायरलहोम रेमेडीस्वच्छता टिप्स