प्रत्येकाच्या घरात वेगवेगळ्या प्रकारच्या बाटल्या असतात. उन्हाळा सुरु झाला की, बाटल्या भरून ठेवणे हे मुख्य काम मानले जाते. कारण या दिवसात शरीर लवकर डीहायड्रेट होते, व सतत तहान लागत असते. पाण्याने भरलेली बाटली जेवढी बाहेरून स्वच्छ दिसते, तेवढीच आतून देखील स्वच्छ असते का?
बाटल्या अधिक काळ असेच वापरल्यास, त्याच्या आतमध्ये पिवळट डाग दिसू लागतात. त्या बाटल्यांमध्ये अनेक प्रकारच्या जीवाणू निर्माण होतात, ज्या पाण्यासोबत थेट पोटात जातात. अशा परिस्थितीत आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे बाटल्या स्वच्छ करण्यासाठी काही टिप्स फॉलो करा. या टिप्समुळे बाटल्या लवकर स्वच्छ - चकचकीत नव्यासारख्या दिसतील(4 Ways to Clean the Inside of a Bottle).
कोमट पाणी व साबण
रोजच्या वापरण्यात येणारी बाटली, साबण आणि गरम पाण्याने धुवा. जर बाटलीचे तोंड रुंद असेल तर, स्पंजच्या मदतीने आतून स्वच्छ करा. किंवा बाटलीमध्ये गरम पाणी व साबणाचे मिश्रण घालून तसेच ठेवा. काही मिनिटांनी हे पाणी काढून सामान्य पाण्याने स्वच्छ करा. या ट्रिकमुळे त्यात असलेले बॅक्टेरिया कमी होतील.
पठ्ठ्याने वर्षभरात फस्त केली ६ लाख रुपयांची इडली, हा ‘इडली दिवाना’ नक्की आहे कुठला?
व्हिनेगर आणि गरम पाणी
साबणाच्या पाण्याने बाटली धुतल्यानंतर, बाटलीमध्ये अर्धा छोटा कप व्हिनेगर घाला, व त्यात गरम पाणी घालून बाटली तशीच ठेवा. २० मिनिटानंतर बाटलीतील पाणी काढा, व साध्या पाण्याने बाटली स्वच्छ धुवा.
बेकिंग सोडा व गरम पाणी
बाटलीमध्ये दोन चमचे बेकिंग सोडा घाला, त्यानंतर कोमट पाण्याने बाटली भरा. आता बाटली कॅपने बंद करा व बाटली वर - खाली हलवा. यानंतर झाकण काढा आणि काही तास असेच राहू द्या. काही वेळानंतर बाटली रिकामी करा आणि स्वच्छ पाण्याने धुवा.
कंबर - नितंबावरील चरबी वाढली? ३ सोपी योगासने नियमित, बेढव शरीर होईल सुडौल
ब्लीच आणि थंड पाणी
पाण्याच्या बाटलीतून येणारा दुर्गंध दूर करण्यासाठी, ब्लीच आणि थंड पाणी मदत करेल. यासाठी बाटलीमध्ये एक चमचा बेकिंग सोडा आणि थंड पाणी घाला, व हे मिश्रण रात्रभर असेच ठेवा. सकाळी बाटली रिकामी करा, व साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवा.