Lokmat Sakhi >Social Viral > फ्रिजरमध्ये बर्फाचा डोंगर? पाणीही वारंवार गळतं? ४ जबरदस्त उपाय; मेकॅनिकशिवाय फ्रिजर होईल क्लिन

फ्रिजरमध्ये बर्फाचा डोंगर? पाणीही वारंवार गळतं? ४ जबरदस्त उपाय; मेकॅनिकशिवाय फ्रिजर होईल क्लिन

4 Ways to Remove Built‐Up Frost from Your Freezer : फ्रिज डीफ्रॉस्ट करण्याच्या ४ सोप्या पद्धती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2024 05:46 PM2024-07-07T17:46:26+5:302024-07-07T17:47:24+5:30

4 Ways to Remove Built‐Up Frost from Your Freezer : फ्रिज डीफ्रॉस्ट करण्याच्या ४ सोप्या पद्धती

4 Ways to Remove Built‐Up Frost from Your Freezer | फ्रिजरमध्ये बर्फाचा डोंगर? पाणीही वारंवार गळतं? ४ जबरदस्त उपाय; मेकॅनिकशिवाय फ्रिजर होईल क्लिन

फ्रिजरमध्ये बर्फाचा डोंगर? पाणीही वारंवार गळतं? ४ जबरदस्त उपाय; मेकॅनिकशिवाय फ्रिजर होईल क्लिन

फ्रिजचा वापर दररोज होतो. बहुतांश घरात फ्रिज असतोच (Freezer). फ्रिजमध्ये अन्न स्टोर करण्यापासून मसाले आणि इतर गोष्टी स्टोर केल्या जातात. फ्रिज हा आपल्या रोजच्या वापरासाठी कितीही उपयोगी पडला तरीही सारखा त्यात बर्फ साचतो (Homemade Tips). आठवड्याला किंवा पंधरा दिवसातून एकदा फ्रिजरमध्ये बर्फाचा डोंगर तयार होतो. पण हा बर्फाचा डोंगर तोडता - तोडता नाकी नऊ येते.

फ्रिजरमध्ये वारंवार बर्फ साचण्याला फ्रिजर फ्रॉस्ट होणे असे म्हटले जाते. कधी चुकून हा साचलेला बर्फ काढण्यास उशीर झालाच, तर बर्फाचं पाणी घरभर होतं. शिवाय फ्रिजही लवकर बिघडतो. फ्रिज लवकर बिघडू नये, शिवाय फ्रिजरमध्ये वारंवार बर्फाचा डोंगर तयार होऊ नये असे वाटत असेल तर, ४ गोष्टी करून पाहा. काही मिनिटात मेकॅनिकशिवाय फ्रिजर क्लिन होईल(4 Ways to Remove Built‐Up Frost from Your Freezer).

फ्रिज डीफ्रॉस्ट करण्याच्या सोप्या पद्धती

गरम पाण्याचा वापर

फ्रिजरमधला बर्फ मेहनत न घेता वितळवायचा असेल तर, एका भांड्यात गरम पाणी भरा. गरम पाण्याचं भांडं फ्रिजरमध्ये ठेवा. गरम पाण्याची वाफ बर्फ वितळण्यास मदत करेल आणि बर्फ काही वेळात वितळेल. पण यावेळी फ्रिज बंद आणि डीफ्रॉस्ट मोडमध्ये असल्याची खात्री करा.

आईबाबांची पावसाळ्यात घ्या जास्त काळजी, ३ गोष्टी खायला देणं टाळा! त्रासदायक आजारांचा धोका

रेफ्रिजरेटरचे दरवाजे उघडे ठेवा

रेफ्रिजरेटरचे दरवाजे उघडे ठेवा. यामुळे उष्णता रेफ्रिजरेटरमध्ये जाण्यास आणि बर्फ वितळण्यास मदत होईल. रेफ्रिजरेटरच्या खाली जाड कापड पसरवा जेणेकरून खोलीत पाणी जास्त पसरणार नाही.

हेअर ड्रायरचा वापर

जर तुमच्या घरात हेअर ड्रायर असेल तर तुम्ही त्याच्या मदतीने बर्फ वितळवण्यासाठी मदत घेऊ शकता. फ्रीजर उघडा आणि हीट मोडमध्ये हेअर ड्रायर चालू करा. गरम हवेमुळे बर्फ वितळेल.

थकवा येतो काम पूर्णच होत नाही? १ चमचा मधाचा करा ‘असा’ उपाय; सद्गुरू सांगतात वाढेल ताकद

हॉट स्पॅटुलाचा वापर

गॅसवर स्पॅटुला गरम करा आणि त्याच्या मदतीने बर्फ काढण्याचा प्रयत्न करा. यामुळे फ्रिजरमधला बर्फ सहज निघेल.

Web Title: 4 Ways to Remove Built‐Up Frost from Your Freezer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.