Join us  

इस्त्री न करता ही कपडे दिसतील कडक, अगदी इस्त्री केल्यासारखे! करा 4 गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2023 2:06 PM

4 Ways to Unwrinkle Your Clothing Without an Iron इस्त्रीशिवाय कपडे प्रेस करण्यासाठी फॉलो करा ४ जुगाड

कडक इस्त्रीचे कपडे वापरणं हा आजकाल प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे. ऑफिस असो किंवा शाळेत जाणे, कपड्यांना इस्त्री करून घातले जातात. बऱ्याचदा कपडे धुतल्यानंतर इस्त्री करण्यासाठी लॉन्ड्रीत दिले जातात. किंवा काही लोकं घरीच कपड्यांना इस्त्री करतात. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. पावसाळ्यात सतत लाईट ये - जा करीत असते.

लाईट गेल्यानंतर कपड्यांना इस्त्री करायचे कसे असा प्रश्न पडतो. लाईट व इस्त्रीशिवाय जर कपड्यांना प्रेस करायचं असेल तर, या काही सोप्या टिप्सचा वापर करून पाहा. या टिप्समुळे काही मिनिटात, लाईटशिवाय कपड्यांना प्रेस करता येईल(4 Ways to Unwrinkle Your Clothing Without an Iron).

व्हिनेगर

लाईटशिवाय कपड्यांना प्रेस करण्यासाठी व्हिनेगरचा वापर करा. यासाठी एका स्प्रे बाटलीत अर्धी वाटी व्हिनेगर व अर्धी वाटी पाणी मिसळून, स्प्रे तयार करा. आता हँगरमध्ये कपडे लटकवून ठेवा. नंतर व्हिनेगरचा तयार स्प्रे कपड्यावर फवारून घ्या. त्यानंतर कपड्याला सुकवून घ्या. व्हिनेगरमुळे कपड्यावरील सुरकुत्या निघून जातील. व कपडे प्रेस केले आहेत असे वाटतील.

अजिबात न दमता २ मिनिटांत पंखा पुसण्याची १ सोपी ट्रिक, सिलिंग फॅन दिसेल चकाचक

टॉवेल

सर्वप्रथम, एका टेबलवर कपडे पसरवून ठेवा, टॉवेल ओला करून पिळून घ्या, व कपड्यावर ठेऊन दाबा. यामुळे कपड्यावरील सुरकुत्या निघून जाईल. कपडे सुकण्यासाठी हँगरमध्ये लटकवून ठेवा. यामुळे कपड्यांवरील सुरकुत्या कमी होतील.

किटली

किटलीमध्ये पाणी घालून गरम करण्यासाठी ठेवा. आता गरम किटली कपड्यांवर इस्त्रीप्रमाणे चालवा. किटली थंड झाल्यानंतर पुन्हा गरम करा. अशा प्रकारे कपडे काही मिनिटात प्रेस होतील.

ती म्हणते, मी वर्षभरापूर्वी भुताशी लग्न केले होते, पण आता घटस्फोट हवा! अजबच मामला..

उशी

वाळलेले कपडे नीट दुमडून घ्या. यानंतर, त्यांना उशीखाली चांगले ठेवा. कपड्यावर वर आणि खाली ४ ते ५ शर्ट किंवा पॅन्ट एकत्र ठेवा. यामुळे कपड्यांमधील चुरगळलेपणा काही मिनिटात निघून जाईल. 

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरल