Lokmat Sakhi >Social Viral > तळणीचे तेल फेकू नका, ४ गोष्टींसाठी करा वापर; तेलाची होणार नाही नासाडी-उपयोग होईल पुरेपूर

तळणीचे तेल फेकू नका, ४ गोष्टींसाठी करा वापर; तेलाची होणार नाही नासाडी-उपयोग होईल पुरेपूर

4 Ways Used Cooking Oil Can Be Repurposed : कीटकनाशक ते गंज काढण्यासाठी उपयुक्त; पाहा उरलेल्या तळणीच्या तेलाचे भन्नाट वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2024 06:53 PM2024-01-23T18:53:48+5:302024-01-23T18:55:44+5:30

4 Ways Used Cooking Oil Can Be Repurposed : कीटकनाशक ते गंज काढण्यासाठी उपयुक्त; पाहा उरलेल्या तळणीच्या तेलाचे भन्नाट वापर

4 Ways Used Cooking Oil Can Be Repurposed | तळणीचे तेल फेकू नका, ४ गोष्टींसाठी करा वापर; तेलाची होणार नाही नासाडी-उपयोग होईल पुरेपूर

तळणीचे तेल फेकू नका, ४ गोष्टींसाठी करा वापर; तेलाची होणार नाही नासाडी-उपयोग होईल पुरेपूर

भारतीय घरात आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा फ्राईड पदार्थ (Resuse of Oil) तयार करण्यात येते. सण असो किंवा इतर कोणताही खास प्रसंग, पुरी, भजे आणि तळलेले पदार्थ हमखास तयार केले जातात. बऱ्याच जणांना तळकट पदार्थ आवडतात. घरी बनत नसेल तर, आपण स्टॉलवर जाऊन खातो. तळकट पदार्थ केल्यानंतर बरेच जण त्याच तेलाचा वापर करतात. पण पुन्हा उरलेल्या तेलाचा वापर न करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. यामुळे हृदयविकार, ब्रेन स्ट्रोक, लिव्हर फेल, मधुमेह आणि कर्करोग होण्याचा धोका वाढतो (Cooking Tips).

पण मग तळणीसाठी वापरण्यात येणाऱ्या तेलाचा वापर नेमका कुठे आणि कसा करावा? असा प्रश्न निर्माण होतो. उरलेल्या तळणीच्या तेलाचा वापर इतर गोष्टींसाठी कशा पद्धतीने करता येईल? पाहा(4 Ways Used Cooking Oil Can Be Repurposed).

कीटकनाशक

उरलेले तेल फेकून देण्याऐवजी, आपण त्याचा वापर नैसर्गिक कीटकनाशक म्हणून करू शकता. शिवाय घरगुती लिक्विड तयार करून झाडांवर फवारणी करू शकता. यामुळे कीटक रोपट्यांना खराब करणार नाही. यासाठी डिश साबण आणि पाण्याच्या काही थेंबांमध्ये तेल मिसळा. तयार लिक्विड झाडांवर फवारा.

तेलकट खाल्लं तरी वजन वाढणार नाही, लक्षात ठेवा ३ मुख्य गोष्टी, वाढलेलं वजनही उतरेल चटकन

दिव्यांसाठी करा वापर

दिव्यांसाठी आपण तळणीसाठी वापरण्यात येणाऱ्या उरलेल्या तेलाचा वापर करू शकता. काही जण नेहमी कुंडीत किंवा दार आणि खिडक्यांबाहेर दिवे लावतात. त्या दिव्यांमध्ये आपण तळणीसाठी वापरण्यात आलेल्या तेलाचा वापर करू शकता.

लेदर वस्तूंना चमकवा

लेदरच्या वस्तू बऱ्याचदा खराब होतात, किंवा त्यावर धूळ जमा होते. ज्यामुळे त्याची चमक कमी होते. लेदरच्या वस्तू जसे की, चप्पल, शूज, किंवा फर्निचर उरलेल्या तेलाचा वापर करून चमकवू शकता. यासाठी कोरड्या कपड्यावर थोडे तेल घेऊन लेदरच्या वस्तू पुसून काढा.

एक कच्च्या बटाट्यात मिसळा २ पिवळ्या गोष्टी; डार्क सर्कल होतील गायब-डोळे दिसतील टवटवीत-सुंदर

गंज काढण्यासाठी उपयुक्त

स्वयंपाकात वापरण्यात येणाऱ्या तेलाचा वापर आपण वस्तूंवरील गंज काढण्यासाठीही करू शकता. यासाठी गंज चढलेल्या वस्तूंवर उरलेले तेल लावून ठेवून द्या. यामुळे तेलातील ओलावा आणि ऑक्सिडेशनमुळे धातूच्या पृष्ठभागाचे संरक्षण होईल. शिवाय पुन्हा गंज चढणार नाही.

Web Title: 4 Ways Used Cooking Oil Can Be Repurposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.