कॉटनचे कपडे उन्हाळ्याच्या दिवसात अतिशय आरामदायक ठरतात. उन्हाळ्यात वाढती उष्णता व गर्मी, सतत येणारा घाम या सगळ्यांमुळे आपल्याला हलके व घाम शोषून घेणारे सुती कपडे घालणे योग्य वाटते. उन्हाळ्यात कॉटनचे कपडे घातल्याने घाम शोषून शरीराला थंडावा मिळतो. तसे पहायला गेले तर उन्हाळ्यातच नाही तर सगळ्याच ऋतूंमध्ये कॉटनचे कपडे वापरणे सोयीचे ठरते. यासाठी उन्हाळा जवळ आला किंवा शॉपिंग करताना आपण बरेचदा कॉटनचे कपडे खरेदी करतो.
कॉटनचे कपडे वापरणे हे सोयीचे आणि योग्य असले तरीही काहीवेळा ते रंग सोडू लागतात. कॉटनचे कपडे पहिल्यांदा धुवायचे म्हटले तर ते धुताना फारच काळजी घ्यावी लागते. काहीवेळा काही कॉटनच्या कपड्यांचा रंग पहिल्या २ ते ३ धुण्यात जातो. याचबरोबर अनेकदा आपल्या शरीराला आलेला घाम यामुळे कापड भिजून स्वतःचा रंग सोडू लागते. कित्येकवेळा तर हा कॉटनचा कपडा आपला रंग सोडतो व तो रंग आपल्या शरीराला लागतो. असे झाल्यास या कपड्यांचा रंग उतरून ते जुने दिसू लागतात. असे होऊ नये म्हणून कॉटनचे नवीन कपडे पहिल्यांदा धुताना योग्य ती काळजी घेतली पाहिजे, असे केल्याने कपड्यांचा रंग आहे तसाच टिकून राहून कपडे नव्यासारखे दिसण्यास मदत होते(4 Ways You Can Prevent Your Clothes From Running Color When Washing Them).
कॉटनच्या कपड्यांचा रंग निघू नये म्हणून सोपा उपाय :-
१. कॉटनचे नवीन कपडे पहिल्यांदा धूत असाल किंवा त्यांचा रंग जात असेल तर ते इतरांपेक्षा वेगळे धुवावेत, जेणेकरुन त्यांचा निघालेला रंग इतर कपड्यांना लागणार नाही. एका मोठ्या टबमध्ये पुरेसे पाणी घेऊन त्यात एक मूठभर तुरटीचा चुरा व दोन मूठभरून जाडे मीठ घालावे. हे त्या टबमधील पाण्यांत संपूर्णपणे विरघळू द्यावेत. पाणी घेताना ते अगदी गरम किंवा संपूर्ण थंड असू नये, साध्या पाण्यांत तुरटीचा चुरा व जाडे मीठ घालून मिश्रण तयार करावे. या पाण्याच्या मिश्रणात कॉटनचे कपडे किमान २ तासांसाठी भिजत ठेवावेत. २ तासांनंतर या पाण्यातून कॉटनचा एक एक कपडा काढून स्वच्छ पाण्यात धुवून घ्यावा. यापैकी काही कपडे होऊ शकते यावेळी रंग सोडू शकतील, परंतु या नंतरच्या धुण्यात ते रंग सोडणार नाहीत.
मळके सॉफ्ट टॉईज धुण्याच्या सोप्या ४ पद्धती, सॉफ्ट टॉईज होतील स्वच्छ, चमकदार...
२. आपण बरेच वेळ कपडे धुताना सर्व प्रकारचे कपडे एकदम भिजवतो मग ज्या कपड्याचा रंग जात असेल तो रंग दुसऱ्या कपड्याला लागतो.कॉटनच्या रंगीत कपड्याचा रंग बऱ्याच वेळा जातो. म्हणून नवीन कॉटनचे कपडे धुताना प्रथम मिठाच्या पाण्यात 2-3 मिनिट भिजवावे मग धुवावे. म्हणजे त्याचा रंग पक्का होतो व कपडेपण चमकदार राहतात.
खूप आंबट झाले म्हणून दही टाकून देता? १ सोपा उपाय, दही संपेल आणि किचनही होईल चकाचक...
३. कॉटनचे कपडे धुतल्यावर वाळत घालताना एकदम उन्हात वाळत न घालतात ते उलटे करून सावलीत वाळवावे म्हणजे त्याचा रंग जात नाही व बरेच दिवस कपडे नव्या सारखे दिसतात. तसेच कॉटनच्या कपड्याना इस्त्री करताना कपडा उलट करून मग इस्त्री करावी त्यामुळे सुद्धा कपडे बरेच दिवस नव्या सारखे दिसतात.
करा 5 उपाय, टॉयलेट मध्ये कधीच येणार नाही दुर्गंधी, वाटेल फ्रेश...
कॉटनचे कपडे सॉफ्ट राहण्यासाठी एक सोपा उपाय :-
कॉटनचे कपडे धुतले की त्यावर खूप सुरकुत्या पडतात. इस्त्री करणं आलंच. त्यासाठीच हा खास उपाय. एका टबमध्ये थोडे पाणी घेऊन त्यात व्हिनेगर घाला. त्यात कपडे भिजवून २ - ३ मिनिटं हलक्या हातांनी चोळून घ्या. लगेच वाळत घाला. यामुळे सुरकुत्या न पडता कपडे सॉफ्ट राहतात.