Join us  

थर्टी फस्ट पार्टीसाठी ५ भन्नाट गेम आयडिया, पार्टी होईल यादगार - नव्या वर्षाचे स्वागत जोशात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2022 5:03 PM

5 Awesome Game Ideas For Thirty First Party : यंदाच्या थर्टीफस्ट पार्टीची रंगत वाढविण्यासाठी काही खास गेम्सची यादी देत आहोत, हे गेम्स खेळून तुम्ही तुमच्या थर्टीफस्ट पार्टीला धमाल करु शकता.

कुणाचा वाढदिवस असू दे, कुठला सण असू दे, कुणाकडे काही आनंदाची बातमी असली की, पार्टी तो बनती है बॉस...असं म्हणत आपण पार्टी देणाऱ्याच्या मागेच लागतो. आताच आपण सगळ्यांनी घरी किंवा ऑफिसमध्ये कुठे ना कुठे ख्रिसमस पार्टी अटेंड केली असेल. परंतु आता सगळ्यांनाच न्यू इयरच्या पार्टीचे वेध लागले आहेत. न्यू इयरला आपल्यापैकी बरेच लोक फुल-टू-धमाल करत असतात. न्यू इयरचा दंगा आपल्याकडे ३१ डिसेंबरपासूनच सुरू होतो. १२ वाजले की जोरात हॅप्पी न्यू इयर अशी घोषणा करून आपण नवीन वर्षाचे स्वागत करतो. जुन्या वर्षापासून आपण नवीन वर्षात प्रवेश करतो आणि नाच गाण्याने या नवीन वर्षाचे स्वागत करतो. मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण न्यू इयर खूप जोरात आणि धूमधडाक्यात साजरा करतात. यावेळी मोठमोठ्या पार्ट्यांचे आयोजन केले जाते. या पार्टीमध्ये नाच - गाणे, खाणे - पिणे होतेच. या पार्टीची मज्जा अधिक वाढविण्यासाठी तुमच्या मित्र - मैत्रिणी किंवा नातेवाईकांसोबत काही गेम्सदेखील खेळू शकता. यंदाच्या थर्टीफस्ट पार्टीची रंगत वाढविण्यासाठी काही खास गेम्सची यादी देत आहोत, हे गेम्स खेळून तुम्ही तुमच्या थर्टीफस्ट पार्टीला धमाल करु शकता(5 Awesome Game Ideas For Thirty First Party).

कोणते गेम्स खेळू शकतो ? 

१. एकमेकांचे संकल्प ओळखा (Guess the resolution) - नवीन वर्ष म्हटलं की त्यासोबतच येतात ते नवीन संकल्प. आपल्यापैकी काहीजण दरवर्षी काही ना काही करायचे असा  संकल्प मनी धरतात. मग या संदर्भातीलच एक गेम आपण खेळू शकतो. पार्टीमध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीला एका चिट्ठीत त्यांचे संकल्प लिहायला सांगा. मग सगळ्यांचे संकल्प लिहिलेल्या या चिठ्ठया एका जार मध्ये एकत्रित करून घ्या. मग प्रत्येक एका व्यक्तीला त्यातील एक चिट्ठी उचलायला लावा. चिट्ठीत आलेले रिझॉल्यूशन वाचून ते कोणत्या व्यक्तीचे रिझॉल्यूशन आहे याचा अंदाज बांधून नाव ओळखण्याचा प्रयत्न करा. गेस द रिझॉल्यूशन (Guess the resolution) असे आपण या गेमचे नाव ठेवू शकतो.

२. ओळखा पाहू कोण आहे ? (Guess who) - ओळखा पाहू कोण आहे ? हा देखील एक मनोरंजक खेळ असू शकतो. पार्टीमध्ये उपस्थित प्रत्येक व्यक्तीला स्वतः बद्दल एखादी मजेशीर गोष्ट किंवा आठवण लिहायला सांगा. त्यानंतर या सगळ्या चिट्ठ्या एका जारमध्ये एकत्रित करा. प्रत्येक व्यक्तीला एक चिट्ठी उचलायला लावा. त्या चिट्ठीत जी मजेशीर गोष्ट लिहिली आहे ती वाचून दाखवा आणि ती गोष्ट किंवा प्रसंग कोणासोबत घडला आहे त्या व्यक्तीचे नाव ओळखण्याचा प्रयत्न करा. 

३. सत्य असत्य (Truth & lie) - पार्टीमधील सगळ्यांनी गोलाकार आकारात बसून घ्यावे. सहभागी व्यक्तींपैकी एका व्यक्तीने स्वतः बद्दल २ खऱ्या आणि १ खोटी अशा एकूण ३ गोष्टी सांगाव्यात. ज्या व्यक्तीने स्वतःबद्दल या ३ गोष्टी सांगितल्या आहेत अनुक्रमे त्याच्या पुढे बसलेल्या व्यक्तीने त्यातील कोणती गोष्ट खरी व कोणती गोष्ट खोटी हे ओळखावे. आहे ना मज्जेशीर खेळ. 

४. कॉफी शॉट्स (Coffee shots)  - या खेळामध्ये तुम्ही तुमच्या किंवा पाहुण्यांच्या आवडीनुसार कॉफी किंवा इतर कोणतेही कोल्ड ड्रींक्सचे छोटे छोटे प्याले शॉर्ट्स ग्लासमध्ये भरून ठेवू शकता. हे शॉर्ट्स भरून तयार झाल्यावर तुम्हाला भरपूर चिठ्ठया बनवाव्या लागतील. या चिठ्ठयांमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी लिहाव्या लागतील. उदाहरणार्थ -  जर समजा एका व्यक्तीने उचलेल्या चिट्ठीमध्ये लिहीले असेल की, काळ्या रंगांचे कपडे परिधान केलेली व्यक्ती. तर पार्टीमध्ये जितक्या व्यक्तींनी काळ्या रंगांचे कपडे घातले असतील तर त्या सगळ्या व्यक्तींना शॉर्ट्स प्यावे लागतील. जर चिट्टीत लिहीले असेल की, ज्यांनी पार्टीपूर्वी १ तास आधी सेल्फी घेतला आहे. मग ज्या - ज्या व्यक्तींनी पार्टीपूर्वी एक तास आधी सेल्फी काढला आहे त्यांनी शॉर्ट्स प्यावे.  

५. कोल्डड्रींक सोबत खेळा मजेशीर गेम (Coke contest) - या खेळासाठी तुम्हाला एक कोल्डड्रींकची बाटली (त्यात कोल्डड्रींक भरलेले असावे), एक चमचा आणि एक रिकामी जार असं साहित्य लागेल. हा खेळ खेळण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला १ मिनिटांचा वेळ द्यावा. चमच्याच्या मदतीने कोल्डड्रींकच्या बाटलीतून कोल्डड्रींक काढा आणि रिकामी जारमध्ये ओता. जो सर्वात जास्त कोल्डड्रींक रिकामी जारमध्ये ओतेले तो जिंकेल.

टॅग्स :सोशल व्हायरल