Join us  

मायक्रोवेव्हची स्वच्छता आणि डोक्याला ताप? घ्या ५ सोप्या टिप्स, मायक्रोवेव्ह होईल स्वच्छ- नव्यासारखा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2023 1:20 PM

5 Best Ways To Clean A Microwave Oven At Home : मायक्रोवेव्हमध्ये काही सांडलं की ते स्वच्छ करणं मोठं काम होतं, अनेकदा दुर्गंधीही येते त्यावर सोपे उपाय.

स्वयंपाक घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या महत्वाच्या उपकरणांपैकी मायक्रोवेव्ह ओव्हन हे महत्वाचे उपकरण आहे. मायक्रोवेव्ह हा नवीन उपकरणाचा प्रकार गेल्या काही वर्षांत येऊनही खूपच लोकप्रिय झाला आहे. यात तुम्ही कोणताही पदार्थ फक्त गरमसुद्धा करू शकता, जसेच शिजवूही शकता. अवघ्या एका मिनिटांत पदार्थ गरम होऊ शकतो.ओव्हन हा प्रामुख्याने बेकिंगसाठी वापरला जातो. याला एक मोठे काचेचे झाकण असते. यात तापमान नियंत्रक व टायमर या सुविधा असतात. विजेवर चालणाऱ्या या उपकरणात एक जाळी व दोन ट्रे किंवा सलग दोन/तीन कप्पे असतात.

हल्ली बाजारात घरगुती छोटे ओव्हनसुद्धा मिळू लागले आहेत. छोटे, स्वस्त व अतिशय आकर्षक असे विविध कंपन्यांचे ओव्हन सहज उपलब्ध होतात. मायक्रोवेव्ह ओव्हनमुळे कमी श्रम घेऊन झटपट जेवण तयार करता येऊ शकते. मायक्रोवेव्ह ओव्हनमुळे जेवण बनवणे जितके सोपे झाले तितकेच मायक्रोवेव्ह ओव्हनची स्वच्छता ठेवणे तितकेच कठीण काम वाटते. कित्येक गृहिणींना मायक्रोवेव्ह ओव्हन स्वच्छ कसा करायचा याबद्दल फारशी माहिती नसते. मायक्रोवेव्ह ओव्हन स्वच्छ करण्यासाठी काही टीप्स लक्षात ठेवू(5 Best Ways To Clean A Microwave Oven At Home).

मायक्रोवेव्ह ओव्हन स्वच्छ करण्याचे काही खास उपाय:- 

१. व्हिनेगर आणि पाणी :- मायक्रोवेव्ह ओव्हन स्वच्छ करण्यासाठी आपण व्हिनेगर आणि पाण्याची मदत घेऊ शकतो. यासाठी व्हिनेगर आणि पाणी एका बॉटलमध्ये घेऊन त्या मिश्रणाचा स्प्रे तयार करा. हा स्प्रे मायक्रोवेव्हमध्ये आत फवारा त्यानंतर ५ मिनिटांनी टिश्यू पेपर किंवा स्वच्छ फडक्याने पुसून घ्यावे. त्याचप्रमाणे एका भांड्यात पाणी आणि व्हिनेगर घेऊन ते मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये ठेवून गरम करून घ्यावे. यामुळे मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये येणारा कुबट वास नाहीसा होईल. 

२. लिंबू आणि पाणी :- एका भांड्यात थोडे पाणी घेऊन त्यात लिंबाचा रस पिळून घ्या. आता टिश्यू पेपर किंवा स्वच्छ फडक्याच्या मदतीने या मिश्रणाचा वापर करून आपण मायक्रोवेव्ह ओव्हन स्वच्छ करू शकता. 

३. सोडा व पाणी वापरा :- मायक्रोवेव्ह स्वच्छ करण्यासाठी सोडा आणि पाण्याची पेस्ट बनवा. आता मायक्रोवेव्हमध्ये जिथे डाग किंवा घाण दिसेल तिथे ही पेस्ट लावा. त्यानंतर ५ ते १० मिनिटे तसेच राहू द्या. नंतर स्पंजच्या मदतीने मायक्रोवेव्हमधील डाग स्वच्छ करा. नंतर ओल्या पेपर टॉवेलने मायक्रोवेव्ह चांगले पुसून घ्या. फक्त बेकिंग सोडा आणि पाण्याची पेस्ट बनवा आणि ती तुमच्या मायक्रोवेव्हमध्ये अडकलेल्या कोणत्याही कठीण अन्नावर लावा. कमीत कमी ५ मिनिटे राहू द्या आणि नंतर ओल्या स्पंजने किंवा टॉवेलने पुसून टाका.

४. ओले पेपर टॉवेल्स - मायक्रोवेव्ह स्वच्छ करण्यासाठी ओल्या पेपर टॉवेलचा वापर करा. यासाठी आपल्या मायक्रोवेव्हमध्ये फक्त एक ओला पेपर टॉवेल ठेवा आणि सुमारे ५ मिनिटांसाठी मायक्रोवेव्ह सुरु करा. या ट्रिकमुळे वाफ तयार होईल ज्यामुळे तुमच्या मायक्रोवेव्हमधील घाण आणि दूषित पदार्थ काढून टाकण्यास मदत होईल. 

५. डिश सोप वापरा - ही पद्धत ओल्या पेपर टॉवेल पद्धतीप्रमाणेच कार्य करते. नॉन-मेटलिक मायक्रोवेव्ह-सेफ बाऊलमध्ये थोडे पाणी आणि डिश सोप भरा आणि मायक्रोवेव्हमध्ये ठेवा. उच्च तापमानावर फक्त १ मिनिट किंवा ते वाफ येईपर्यंत चालू द्या. आता बाउल बाहेर काढा आणि आता स्पंज वापरा आणि मायक्रोवेव्ह पुसून टाका.

टॅग्स :स्वच्छता टिप्सकिचन टिप्स