आपल्यापैकी बऱ्याचजणांच्या किचनमध्ये अॅल्युमिनियम फॉईलचा रोल हा कायम असतोच. चपात्या, पराठे, भाकऱ्या किंवा इतर काही पदार्थ यात रॅप करुन कॅरी करणे सोपे जाते. यात ठेवलेला पदार्थ हा दीर्घकाळासाठी गरम आणि फ्रेश ठेवला जातो, हीच याची खासियत आहे. शक्यतो ऑफिस किंवा मुलांना शाळेत डबा देताना याचा अधिक वापर केला जातो. अॅल्युमिनियम फॉईल ( 5 Aluminum Foil Hacks You’ll Wish You Knew Sooner) ही एक बहुउपयोगी वस्तू आहे. किचनमध्ये तर या फॉईलचा रोज वापर केला जातो. पण किचन मधील वापराशिवाय आपण या अॅल्युमिनियम फॉईलचा घरातील इतर गोष्टींसाठी देखील वापर करु शकतो(What is the use of aluminium foil at home?).
अॅल्युमिनियम फॉईलचा वापर फक्त जेवण पॅक करण्यासाठी किंवा गरम ठेवण्यासाठीच (5 Brilliant Uses For Aluminum Foil Around The House) केला जात नाही. याव्यतिरिक्त अनेक कामात याचा वापर केला जाऊ शकतो. अॅल्युमिनियम फॉईल कुकिंग, वॉशिंग आणि क्लीनिंगच्या अनेक समस्या अगदी चुटकीसरशी (unexpected uses for aluminum foil) सोडवू शकतात. अनेकदा असे दिसून येते की बहुतेक घरांमध्ये या फॉइलचा वापर एकदाच केला जातो आणि नंतर तो फेकून दिला जातो. आपणही असे करत (Unusual Uses for Aluminum Foil) असाल तर ते करणे बंद करा. कारण तुम्ही अॅल्युमिनियम फॉइलचा एकदा नव्हे तर अनेक वेळा वापर करू शकता. अॅल्युमिनियम फॉईलचा पुनर्वापर करण्याचे वेगवेगळे पर्याय नेमके कोणते आहेत, ते पाहूयात(5 Surprising Uses for Aluminum Foil).
अॅल्युमिनियम फॉईलचा घरातील इतर कोणत्या कामांसाठी वापर केला जाऊ शकतो ?
१. स्क्रबरप्रमाणे वापर करा :- घरातील गॅस ओटा घाणेरडा, गंजलेला असेल किंवा त्यात अन्न अडकले असेल तर या सर्व गोष्टी साफ करण्यासाठी अॅल्युमिनिअम फॉईल उपयोगी पडेल. आपल्याला फक्त जुन्या अॅल्युमिनिअम फॉइल आणि बेकिंग सोडा लागेल. बेकिंग सोड्यामध्ये थोडे पाणी मिसळा आणि नंतर गॅस साफ करण्यासाठी वापरा.
२. कात्रीला धारदार करण्यासाठी :- कात्रीचा सतत वापर करुन कालांतराने कात्रीची धार कमी होऊ लागते, ज्यामुळे काहीही कापणे कठीण होते. अशा परिस्थितीत, जर अॅल्युमिनियम फॉईल असेल, तर आपण लगेच कात्रीला धारदार करू शकता. यासाठी आपल्याला फक्त १० ते १५ वेळा कात्रीने फॉईल कापावे लागेल. धार गेलेल्या कात्रीने अॅल्युमिनियम फॉईल कापल्याने त्याची गेलेली धार परत येऊन कात्री पुन्हा पहिल्यासारखी तीक्ष्ण होते.
३. फनेलची गरज भासणार नाही :- जर आपल्याला निमुळत्या किंवा लहान तोंडाच्या बाटलीत काही द्रव पदार्थ भरायचा असेल तर अॅल्युमिनियम फॉईलचा वापर करु शकता. द्रव पदार्थ लहान तोंडाच्या बाटलीत ओतताना ते बाहेर सांडू नये यासाठी आपण अॅल्युमिनियम फॉईलचा वापर करु शकता. यासाठी अॅल्युमिनियम फॉईलचा एक लहानसा तुकडा देखील पुरेसा होतो. या लहान तुकड्याची सुरनळी किंवा फनेलचा आकार देऊन बाटलीच्या तोंडाशी धरून यात द्रव पदार्थ ओतावा म्हणजे तो न सांडता अतिशय सोप्या पद्धतीने बाटलीत भरला जातो.
४. चुरगळलेल्या कपड्यांना इस्त्री करताना :- जर आपले कपडे फारच चुरगळलेले असतील तर त्यावर कडक इस्त्री करण्यासाठी अॅल्युमिनिअम फॉईलचा वापर करु शकतात. कमी वेळात कपड्यांना झटपट इस्त्री करण्यासाठी, अॅल्युमिनिअम फॉईल सपाट पृष्ठभागावर अंथरुन त्यावर कापड ठेवून इस्त्री करावी. असे केल्याने एकाच वेळी कपड्यांना दोन्ही बाजुंनी इस्त्री केली जाते. यामुळे अतिशय कमी वेळात चुरगळलेले कपडे पटकन इस्त्री करुन होतात.
रोजच्या वापरातला चपातीचा तवा झाला खराब ? १ सोपी ट्रिक, तवा होईल पुन्हा नव्यासारखा चकाचक...
५. जळकी इस्त्री स्वच्छ करण्यासाठी :- काहीवेळा इस्त्रीचा खालचा पृष्ठभाग हा जळून काळा होतो. अशावेळी तो पुष्ठभाग स्वच्छ करण्यासाठी अॅल्युमिनियम फॉईलचा वापर करु शकता. यासाठी अॅल्युमिनियम फॉईलचा एक गोळा करून तो इस्त्रीच्या जळक्या भागावर घासून घ्यावा यामुळे जळक्या इस्त्रीचा पृष्ठभाग हा झटकन स्वच्छ होतो.
फरशी पुसायचा मॉप काळाकुट्ट होऊन कुबट वास येतो ? ३ सोप्या टिप्स, मॉप होईल नव्यासारखा पांढराशुभ्र...