Join us  

दारे-खिडक्यांमधून येणारा आवाज, कपड्यांवरील डाग, पाहा पेट्रोलियम जेलीचे ५ जबरदस्त फायदे..कामं होतील झटपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2023 12:26 PM

5 Clever Uses of Petroleum Jelly Around The House : थंडीत वापरल्या जाणाऱ्या पेट्रोलियम जेलीचे ५ असेही फायदे, फक्त स्किनसाठी नसून इतरही वापर पाहा..

गुलाबी हवा जाणवू लागली की थंडीची (Winter Season) चाहूल लागते. सध्या हिवाळा ऋतू सुरु आहे. हवेत गारवा जाणवू लागला की लोकं स्वेटर, गरम कपडे घालतात. पण स्वतःला कितीही गरम कपड्यांमागे झाकलं तरीही, स्किन कोरडी, रुक्ष होतेच. स्किन ड्राय पडली की आपण पेट्रोलियम जेलीचा वापर करतो.

पेट्रोलियम जेली (Petroleum Jelly) खनिज तेल आणि मेणाचा वापर करून तयार केली जाते. थंडीच्या दिवसात पेट्रोलियम जेलीचा वापर करताच स्किन मुलायम-कोमल होते. शिवाय टाचांच्या भेगांवरही असरदार ठरते. पण याचे इतरही वापर आपल्याला ठाऊक आहे का? पेट्रोलियम जेली फक्त स्किनसाठी नसून, इतर ५ कामांसाठीही याचा वापर केला जाऊ शकतो. याच्या वापराने आपण ५ घरगुती साहित्य स्वच्छ करू शकता(5 Clever Uses of Petroleum Jelly Around The House).

पेट्रोलियम जेलीचे ५ इतर भन्नाट वापर

लेदर शूज साफ करण्यासाठी उपयोग

पेट्रोलियम जेलीचा वापर लेदर शूज स्वच्छ शिवाय चमकवण्यासाठी केला जाऊ शकतो. यासाठी शूजवर पेट्रोलियम जेल लावा. त्यानंतर स्वच्छ कापडाने पुसून काढा. काही मिनिटात लेदर शूज नव्यासारखे दिसतील.

खिडक्या-कपाटासाठी उपयुक्त

बऱ्याचदा दारे, खिडक्या आणि कपाटातून कर-कर असा आवाज येतो. कपाट आणि दारे जुने झाले की बंद-चालू करताना आवाज येतो. जर हा आवाज येऊ नये असे वाटत असेल तर, त्यावर पेट्रोलियम जेलीचा वापर करा. यासाठी स्क्रूच्या भागावर जेली लावा आणि १ ते २ दिवस राहू द्या. यामुळे किडक्या-दारातून आवाज येणं कमी होईल.

कपड्यावरील डाग काढण्यासाठी बेस्ट

कपड्यांवर अनेकदा लिपस्टिक शिवाय अनेक मेकअपचे डाग पडतात. हे डाग काढण्यासाठी आपण पेट्रोलियम जेलीचा वापर करू शकता. पेट्रोलियम जेलीच्या वापराने मेकअपचे डाग सहज निघून जातील. यासाठी डागांवर पेट्रोलियम जेल लावा, काही मिनिटानंतर घासून काढा.

फर्निचरवरील डाग होईल साफ

फर्निचरवर अनकेदा नकळत विविध डाग पडतात. महागड्या फर्निचरवर अन्नाचे किंवा लहान मुलांनी केलेले स्केचेसचे डाग पडतात. ज्यामुळे फर्निचरची शोभा कमी होते. हे डाग साफ करण्यासाठी आपण पेट्रोलियम जेलचा वापर करू शकता. यासाठी फर्निचरच्या डागांवर पेट्रोलियम जेलचा लेप लावा. रात्रभर तसेच राहू द्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी स्वच्छ कपड्याने घासून स्वच्छ करा. या ट्रिकमुळे काही मिनिटात डाग निघतील, शिवाय फर्निचर नव्यासारखं दिसेल.

टॅग्स :सोशल मीडियाथंडीत त्वचेची काळजीसोशल व्हायरल