Lokmat Sakhi >Social Viral > फक्त ५ गोष्टी करा, मोबाइल वर्षानूवर्षे बिघडणार नाही आणि डेटाही राहील सेफ....

फक्त ५ गोष्टी करा, मोबाइल वर्षानूवर्षे बिघडणार नाही आणि डेटाही राहील सेफ....

5 Common Mistakes That Are Damaging Your Smartphone : हजारो रुपयांचे मोबाइल लवकर बिघडतात, पैसे वाया जातात. असं होऊ नये लक्षात ठेवा ५ गोष्ट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2023 09:05 AM2023-04-29T09:05:02+5:302023-04-29T09:10:01+5:30

5 Common Mistakes That Are Damaging Your Smartphone : हजारो रुपयांचे मोबाइल लवकर बिघडतात, पैसे वाया जातात. असं होऊ नये लक्षात ठेवा ५ गोष्ट...

5 Common Mistakes That Are Damaging Your Smartphone | फक्त ५ गोष्टी करा, मोबाइल वर्षानूवर्षे बिघडणार नाही आणि डेटाही राहील सेफ....

फक्त ५ गोष्टी करा, मोबाइल वर्षानूवर्षे बिघडणार नाही आणि डेटाही राहील सेफ....

स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. असा एकही दिवस जात नाही की आपण स्मार्टफोनचा वापर करत नाही. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण सतत स्मार्टफोनचा वापर करत असतो. मोबाइल फोन ही काळाची गरज बनलेली असतानाच, आजकाल घरातील लहानांपासून ते घरातील आजी - आजोबांपर्यंत सगळेच मोबाईल फोनचा वापर करताना दिसतात. स्मार्टफोनचा वापर केवळ संपर्क साधण्यासाठीच नाही तर फोटो काढण्यापासून गेम खेळण्यापर्यंत अनेक गोष्टींसाठी केला जातो. 

या डिव्हाइसमध्ये वेगवेगळे सेंसर्स देखील देण्यात आलेले असतात, ज्यामुळे फोन व्यवस्थित काम करतो. परंतु काहीवेळा आपल्याला हातून काही चुका होऊन हा मोबाईल फोन लवकर खराब होतो. मोबाईल फोन हे एक इलेक्ट्रिक डिव्हाइस आहे. याचा वापर व्यवस्थित योग्य पद्धतीने केल्यास मोबाईल फोन वर्षानुववर्षे न बिघडता व्यवस्थित चालतो. परंतु रोजच्या वापरात आपण जर मोबाईल फोन चुकीच्या पद्धतीने वापरला तर त्यात बिघाड होऊन तो लगेच खराब होऊ शकतो. त्यामुळे आपला मोबाईल फोन न बिघडता वर्षानुवर्षे तसाच व्यवस्थित सुरळीत चालण्यासाठी रोजच्या वापरात होणाऱ्या ५ चुका लक्षात घेऊयात(5 Common Mistakes That Are Damaging Your Smartphone).

मोबाईल फोन लवकर खराब होऊ नये यासाठी हमखास होणाऱ्या चुका टाळा.... 

१.मोबाईल फोनचे सॉफ्टवेअर नेहमी अपडेट ठेवा :- आपल्या मोबाईल फोनचे सॉफ्टवेअर नेहमी वेळोवेळी अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करावा. यामुळे फोन अपडेट करताना त्यात जर कोणता व्हायरस किंवा बग असेल तर ते डिटेक्ट होऊन व्हायरस मोबाईलमधून काढण्यासाठी मदत करतात. यामुळे मोबाईल फोनचे सॉफ्टवेअर नेहमी अपडेट ठेवावे त्यामुळे व्हायरसपासून मोबाईलचा बचाव करण्यास मदत होते. 

२. सेकंड-हँड किंवा अनधिकृत केबल्स आणि चार्जर्सचा वापर करु नका :- मोबाइलसोबत दिलेल्या मूळ चार्जरनेच मोबाईल नेहमी चार्ज करावा. इतरांचा मोबाईल चार्जर किंवा सेकंड-हँड ,अनधिकृत केबल्स व चार्जरने मोबाईल चार्ज करणे टाळावे. यामुळे मोबाईलची बॅटरी खराब होऊन मोबाईल लवकर खराब होऊ शकतो. 

फेशियल नेमके किती दिवसांनी करायला हवे? महिन्यातून एकदा केले तर त्वचेला खरंच फायदा होतो?

३. अ‍ॅप्स वारंवार विचारत असलेल्या परवानग्या व नोटिफिकेशन्स अमान्य करावे :- जेव्हा तुम्ही एखादे अ‍ॅप डाउनलोड करता तेव्हा त्यात अनेक परवानग्या व नोटिफिकेशन्स विचारले जातात. काही वेळा या परवानग्यांचा काही उपयोग होत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही प्रत्येक अ‍ॅपला परवानगी देऊ नये. कोणत्याही अ‍ॅपला तीच परवानगी दिली पाहिजे जी त्या अ‍ॅपला खरोखर आवश्यक आहे.   

४. वेळोवेळी डेटा बॅकअप घ्यावा :- तुमच्या मोबाईल फोनमधील महत्वाच्या गोष्टींचा वेळोवेळी बॅकअप घ्यायला विसरु नका. जर तुम्हांला तुमच्या फोनचा डेटा बॅकअप घ्यायची सवय नसल्यास आतापासूनच मोबाईमधील गोष्टींचा डेटा बॅकअप घ्यावा. तुमच्या फोनचा नेहमी बॅकअप घ्यावा जेणेकरुन कधीही डेटा डिलीट झाल्यास तुम्ही तो रिकव्हर करू शकता.

मुलांच्या हातातला मोबाइल कसा काढणार? ८ टिप्स - मोबाइलशिवाय मुले जेवत झोपत नाही ही तक्रार संपेल...

५. अधिकृत ॲप स्टोअर वगळता कुठूनही ॲप डाऊनलोड करु नका :-  जर तुम्ही कोणत्याही वेबसाईटवरून अ‍ॅप्स डाऊनलोड करत असाल तर असे करणे टाळा.  कोणत्याही थर्ड पार्टी वेबसाइटवरून तुमच्या फोनवर अ‍ॅप्स डाउनलोड करू नका. यामुळे फोनमध्ये मालवेअर किंवा स्पायवेअर यांसारखे व्हायरस येऊ शकतात.

Web Title: 5 Common Mistakes That Are Damaging Your Smartphone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.