Join us  

धुळीने माखलेला कुलर स्वच्छ कसा करावा? ५ जबरदस्त ट्रिक्स; मिनिटात होईल क्लिन-दिसेल चकचकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2024 1:28 PM

5 Easy Steps To Clean Your Cooler And Make It Bacteria-Free : मेहनत न घेता कुलर होईल मिनिटात स्वच्छ; फक्त साफ करताना ५ गोष्टी लक्षात ठेवा..

आला आला उन्हाळा आला - शरीरातून वाहू लागल्या घामाच्या धारा (Summer Special). उन्हाळा सुरु होताच शरीराची लाही-लाही होते. पण उन्हाळ्यात शरीरासह आरोग्याची विशेष काळजी घ्यायला हवी (Cooler Clean). शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आपण पाणी आणि पाणीदार फळांचे सेवन दररोज करतो. शिवाय उन्हाच्या झळा बसल्यानंतर, आपण पंखा, एसी किंवा कुलर जवळ येऊन बसतो. पण सतत कुलरचा वापर केल्याने त्यावर धूळ जमा होते (Cleaning Tips). धुळीने माखलेला कुलर थंड हवा देत नाही. शिवाय या धुळीमुळे आपल्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. म्हणूनच कुलर साफ करणं गरजेचं आहे.

पण कुलर साफ करणं किचकट काम वाटते. जर आपल्याला कुलरच्या जाळ्या एकंदरीत संपूर्ण कुलर साफ करणं अवघड काम वाटत असेल तर, या ट्रिकने कुलर साफ करून पाहा. मिनिटात क्लिन होईल, शिवाय योग्यरित्या कामही करेल(5 Easy Steps To Clean Your Cooler And Make It Bacteria-Free).

अशा प्रकारे स्वच्छ करा धुळीने माखलेला कुलर

- कुलर मोकळ्या जागेवर ठेवा. धुताना पाणी सहज बाहेर पडू शकेल अशा ठिकाणी ठेवा. आता तिन्ही बाजूच्या विंडो उघडा, आणि झाडूच्या मदतीने धूळ झाडून काढा.

तळल्यावर पुऱ्या तेलकट होतात? पीठ भिजवताना घाला १ पांढरा पदार्थ, पुऱ्या तेलकट होणारच नाहीत

- आता कुलरच्या विंडोमध्ये आपल्याला मधमाश्यांच्या पोळ्यासारखे पॅड दिसतील, ते काळजीपूर्वक काढा. साबणाचे पाणी किंवा क्लीनरने पॅड स्वच्छ घासून धुवून काढा. यामुळे धूळ काही मिनिटात निघून जाईल.

- एका मोठ्या टबमध्ये पाणी भरा. त्यात २ कप व्हिनेगर घाला. या पाण्यात हे पॅड स्वच्छ धुवून घ्या. धुतल्यानंतर पॅड उन्हात सुकवण्यासाठी ठेवा. अशा प्रकारे पॅड बॅक्टेरिया मुक्त होतील.

बॅड कोलेस्टेरॉल ते वेट लॉस : 'ही' दाक्षिणात्य पांढरी चटणी खाल्ल्याने शरीराला मिळतील ५ फायदे

- आता साबणाचे पाणी तयार करा, त्यात स्क्रबर बुडवून कुलरची टाकी स्वच्छ करा, आणि वाहत्या पाण्याने धुवून घ्या. नंतर उन्हात सुकवण्यासाठी ठेवा.

- आता पंखे आणि मोटर कोरड्या कापडाने स्वच्छ करा. मशीनचे जॉइंट्स, स्क्रू इत्यादींना ल्युब्रिकंट ऑइल किंवा खोबरेल तेल लावा. यामुळे गंज निघून जाईल. शिवाय पंखा आवाज न करता फिरेल. अशा प्रकारे कुलर काही मिनिटात स्वच्छ होईल.

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल व्हायरलसोशल मीडियासमर स्पेशल