सोशल मीडियावर गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचे अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. अलिकडेच व्हायरल झालेला व्हिडिओ एका जत्रेमधला आहे. बॉयफ्रेंडमुळे जवळपास ५ मुलींमध्ये मारामारी झाली आहे. त्याला बघताच तरूणींनी चोप दिला. खोटं बोलून दुसऱ्या गर्लफ्रेंडसोबत फिरताना दिसल्यानंतर मुलीला संताप अनावर झाला आणि तिनं मारामारी करायला सुरूवात केली. (5 girls beaten one girl for boyfriend in sonpur mela bihar)
बिहराच्या सोनपूरमधील जत्रेतला हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ कधीचा आहे याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. व्हिडियोला कोणताच ऑडिओसुद्धा नाहीये. जत्रेत फिरण्यासाठी आलेल्या मुलींनं बॉयफ्रेंडला दुसऱ्या मुलीसोबत पाहिल्यानं मारामारीचा प्रकार घडला.
या पाच मुलींमधली एक या मुलाची एक्स गर्लफ्रेंड होती. त्यांची भेट एका जत्रेत झाली त्यावेळी तो एका वेगळ्या मुलीसोबत फिरत होता. या मारामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या युट्यूबवर या व्हिडिओनं धुमाकूळ घातला आहे.