Lokmat Sakhi >Social Viral > हिवाळ्यात बिघडेल फ्रिज, होईल स्फोट! चुकुनही करू नका ५ चुका; महागडा फ्रिज होईल खराब

हिवाळ्यात बिघडेल फ्रिज, होईल स्फोट! चुकुनही करू नका ५ चुका; महागडा फ्रिज होईल खराब

5 Habits That Can Cause Refrigerator Damage : फ्रिजरमध्ये बर्फ गोठण्याचं कारण काय? वेळीच ५ चुका टाळा कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2024 06:58 PM2024-11-24T18:58:47+5:302024-11-24T18:59:38+5:30

5 Habits That Can Cause Refrigerator Damage : फ्रिजरमध्ये बर्फ गोठण्याचं कारण काय? वेळीच ५ चुका टाळा कारण..

5 Habits That Can Cause Refrigerator Damage | हिवाळ्यात बिघडेल फ्रिज, होईल स्फोट! चुकुनही करू नका ५ चुका; महागडा फ्रिज होईल खराब

हिवाळ्यात बिघडेल फ्रिज, होईल स्फोट! चुकुनही करू नका ५ चुका; महागडा फ्रिज होईल खराब

सध्या थंडीचे दिवस आहेत (Winter Care Tips). फ्रिजचा (Refrigerator) जास्त वापर होत नसला तरी, त्यात आपण अन्नपदार्थ स्टोअर करून ठेवतो (Fridge care). सध्या फ्रिजचा वापर घराघरांमध्ये वाढला आहे. त्यामुळे फ्रिजचा वापर करताना, छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घ्याला हवी. अन्यथा फ्रिजरमध्ये बर्फ गोठण्याची समस्या वाढते.

बर्फ गोठले की, ते लवकर काढूनही निघत नाही. शिवाय रेफ्रिजरेटरच्या कॉम्प्रेसरचाही स्फोट होण्याचाही धोका वाढतो. निष्काळजीपणामुळे बऱ्याचदा महागडे फ्रिज खराब होऊ शकतात. जर फ्रिज खराब होऊ नये असे वाटत असेल तर, काही चुका आत्तापासून करणं टाळा. अन्यथा फ्रिजचा स्फोट देखील होऊ शकतो(5 Habits That Can Cause Refrigerator Damage).

रेफ्रिजरेटर वापरताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

- रेफ्रिजरेटर वापरताना त्याच्या तापमानाकडे लक्ष द्यावे. याचे तापमान कधीही खालच्या पातळीवर आणू नये. यामुळे रेफ्रिजरेटरच्या कॉम्प्रेसरला आवश्यकतेपेक्षा जास्त दाब द्यावा लागतो. ज्यामुळे ते गरम होते आणि ते फुटण्याची शक्यता असते.

कांद्याच्या रसात मिसळा १ तेल; दाट- काळेभोर आणि लांबसडक सुंदर होतील केस फक्त काहीच दिवसांत

- रेफ्रिजरेटरमध्ये विशेषत: कॉम्प्रेसरच्या भागामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष असल्यास तो कंपनीच्याच सर्व्हिस सेंटरमध्ये न्यावा. जर आपण स्थानिक भाग वापरत असाल तर, कॉम्प्रेसरचा स्फोट होण्याची शक्यता असते.

- बऱ्याच वेळा असे होते की आपण रेफ्रिजरेटरमध्ये बर्फ गोठवतो. अशा परिस्थितीत आपण दर काही तासांनी रेफ्रिजरेटर उघडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामुळे बर्फ गोठण्याची प्रक्रिया फ्रिजरमध्ये कमी होते. शिवाय तापमान नियंत्रित करण्यासही मदत होते.

जेवणानंतर फक्त १ गोष्ट करा; वजन, बॅड कोलेस्टेरॉल आणि ब्लड प्रेशर राहील नियंत्रणात; दिसाल फिट

- फ्रिजमध्ये गरजेपेक्षा जास्त वस्तू भरू नका. यामुळे फ्रिज थंड ठेवणे कठीण होते. आणि कॉम्प्रेसरवर अधिक दाब पडतो, ज्यामुळे तो खराब होण्याची शक्यता असते.

- रेफ्रिजरेटर कधीही गरम ठिकाणी ठेवू नका. नेहमी थंड आणि हवेशीर ठिकाणी ठेवा. यासह फ्रिज नेहमी स्वच्छ करत राहा. घाणीमुळे फ्रिज खराब होण्याची शक्यता वाढते. 

Web Title: 5 Habits That Can Cause Refrigerator Damage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.