Lokmat Sakhi >Social Viral > दिवाळीच्या साफसफाईचे नियोजन करण्याच्या ५ सोप्या टिप्स; जास्त दमणूक न होता घर होईल चकाचक

दिवाळीच्या साफसफाईचे नियोजन करण्याच्या ५ सोप्या टिप्स; जास्त दमणूक न होता घर होईल चकाचक

5 Home Cleaning tips for Diwali 2023 : साफसफाई करता करता अनेकदा इतका पिट्ट्या पडतो की आपणच आजारी पडण्याची शक्यता असते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2023 12:46 PM2023-10-29T12:46:36+5:302023-11-02T12:21:35+5:30

5 Home Cleaning tips for Diwali 2023 : साफसफाई करता करता अनेकदा इतका पिट्ट्या पडतो की आपणच आजारी पडण्याची शक्यता असते.

5 Home Cleaning tips for Diwali 2023 : 5 Easy Tips for Planning Diwali Cleaning; The house will be shiny without much effort | दिवाळीच्या साफसफाईचे नियोजन करण्याच्या ५ सोप्या टिप्स; जास्त दमणूक न होता घर होईल चकाचक

दिवाळीच्या साफसफाईचे नियोजन करण्याच्या ५ सोप्या टिप्स; जास्त दमणूक न होता घर होईल चकाचक

दिवाळी जवळ आली की आपल्याला वेध लागतात ते फराळाच्या पदार्थांचे, नवीन कपड्यांचे, घर सजवण्याचे. पण या सगळ्याच्या आधी एक महत्त्वाचे काम असते ते म्हणजे घराच्या साफसफाईचे. एरवी आपण दररोज किंवा विकेंडला घराची साफसफाई करतच असतो पण दिवाळीच्या निमित्ताने आपण घराचे डीप क्लिनींग करतो. अशाप्रकारे घराचे कानेकोपरे स्वच्छ करण्याचे काम आपण वर्षातून एकदा आवर्जून करतो. ही साफसफाई करायची म्हणजे नीट वेळ हवा, आरण्याची आवड हवी आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अंगात ताकद हवी. नाहीतर साफसफाई करता करता अनेकदा इतका पिट्ट्या पडतो की आपणच आजारी पडण्याची शक्यता असते (5 Home Cleaning tips for Diwali 2023). 

सगळ्यात जास्त साफसफाईचे काम हे किचनमध्ये असते, स्वयंपाक करण्यासाठी, जेवणासाठी, खाण्या-पिण्याच्या वस्तू ठेवण्यासाठी घरातील महिला वर्गाचा या खोलीत सर्वात जास्त वावर असतो. त्यामुळेच किचन बरेचदा इतर खोल्यांपेक्षा जास्त खराब असते. टाईल्सवर पडलेले डाग, डब्यांवर साचलेली घाण, डाग पडलेले शेल्फ, रोजच्या वापराने खराब झालेले ओटा आणि सिंक, किचन ट्रॉलिजमध्ये साठलेला कचरा, माक्रोव्हेव, मिक्सर, गॅस शेगडी अशा सगळ्याच वस्तूंवर राप चढलेला असतो. तर दुसरीकडे माळ्यांवर किंवा अन्य ठिकाणी न लागणाऱ्या वस्तू वर्षानुवर्षे रचून ठेवलेल्या असतात. घराच्या भिंतींवर आलेली जळमटे, कानेकोपरे साफ करण्याचे काम सोपे व्हावे यासाठी काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायला हव्यात. 

१. साफसफाईला सुरुवात करताना आधी वरच्या बाजूची साफसफाई करावी, जेणेकरुन वर असलेली धूळ, जळमट खाली पडेल आणि खालचे साफ करताना ते निघून जाईल. साफसफाई करताना त्याठिकाणी आरसा, काचेच्या वस्तू, टिव्ही किंवा इतर मौल्यवान वस्तू असतील तर त्या आधीच योग्य पद्धतीने झाकून ठेवाव्यात. जेणेकरुन साफसफाई करताना कोणतेही नुकसान होणार नाही. 

२. साफसफाई ही हातानेच करायची गोष्ट आहे हा विचार डोक्यातून थोडा बाजूला करायला हवा. व्हॅक्युम क्लिनर, वेगवेगळ्या प्रकारचे सफाईचे ब्रश, कापड, साबण यांची आधीच तयारी करुन ठेवा जेणेकरुन ऐनवेळी साफसफाईचे सामान आणण्यासाठी बाजारात जावे लागणार नाही. बाजारात हल्ली काही खास ब्रश, मॉब उपलब्ध असतात, त्यामुळे तुमचे काम सोपे होऊ शकते. तेव्हा साफसफाई करण्याआधी एकदा बाजारात जाऊन आपल्याला सोयीच्या असलेल्या वस्तू आणा आणि त्यांच्या मदतीने साफसफाई करण्याचा प्रयत्न करा. 

३. घरात न लागणाऱ्या आणि अनेक वर्षे जपून ठेवलेल्या अशा असंख्य वस्तू असतात,. यामध्ये आपल्या आठवणी, भावना असतात हे ठिक असले तरीही त्यांचा उपयोग नसेल तर त्याने विनाकारण जागा अडून राहण्याशिवाय काहीही होत नाही. शक्य असेल तर त्या वस्तूंचा पुर्नवापर होतो का ते पाहावे, इतर कोणाला त्या उपयुक्त असतील तर वापरायला द्याव्यात. नाहीतर न लागणाऱ्या या वस्तू भंगारमध्ये टाकायला हव्यात. नाहीतर फक्त पसारा होत राहतो. 

(Image : Google )
(Image : Google )

४. कंबरेचा, पाठीचा किंवा इतर कोणताही आरोग्याचा त्रास असेल तर अनावश्यक जड उचलणे, वाकून साफसफाई करणे टाळायला हवे. शक्य त्या ठिकाणी  घरातील पुरुष मंडळींची किंवा मदतनीसांची मदत घ्यावी. कारण आपण गडबड करत काम केल्याने ते पूर्ण होईल पण ऐन सणाचा आनंद लुटण्याला आपण मुकण्याची शक्यता नाकारता येणार नाही. 

५. गॅस शेगडी, मिक्सर, फ्रिज, ओव्हन यांसारख्या गोष्टी आपण किचनमध्ये नियमितपणे वापरत असतो. पण हे सगळे एकदम साफ न करता एक एक करुन साफ करा. योग्य ते नियोजन केले आणि चांगल्या उपकरणांचा वापर केला तर हे सगळे अगदी १० ते १५ मिनीटांत साफ होते. त्यामुळे किचन साफ करण्याचा ताण न घेता योग्य ते नियोजन करणे महत्त्वाचे आहे.  

Web Title: 5 Home Cleaning tips for Diwali 2023 : 5 Easy Tips for Planning Diwali Cleaning; The house will be shiny without much effort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.