Lokmat Sakhi >Social Viral > स्वयंपाकघर कधीच घाण होणार नाही; आठवड्यातून एकदा ५ कामं करा- किचन नेहमीच राहील टापटीप

स्वयंपाकघर कधीच घाण होणार नाही; आठवड्यातून एकदा ५ कामं करा- किचन नेहमीच राहील टापटीप

5 Important Kitchen Tips For Every House: तुमचं स्वयंपाक घर नेहमी आवरलेले, टापटीप आणि स्वच्छ राहावे, असे वाटत असेल तर स्वतःला या ५ सवयी लावून घ्या... (5 important tips to keep your kitchen always neat and clean)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2024 04:30 PM2024-09-28T16:30:09+5:302024-09-28T16:31:33+5:30

5 Important Kitchen Tips For Every House: तुमचं स्वयंपाक घर नेहमी आवरलेले, टापटीप आणि स्वच्छ राहावे, असे वाटत असेल तर स्वतःला या ५ सवयी लावून घ्या... (5 important tips to keep your kitchen always neat and clean)

5 important tips to keep your kitchen always neat and clean, 5 important kitchen tips for every house | स्वयंपाकघर कधीच घाण होणार नाही; आठवड्यातून एकदा ५ कामं करा- किचन नेहमीच राहील टापटीप

स्वयंपाकघर कधीच घाण होणार नाही; आठवड्यातून एकदा ५ कामं करा- किचन नेहमीच राहील टापटीप

Highlightsतिथल्या अस्वच्छतेचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होत असतो. त्यामुळे किचन स्वच्छ ठेवण्यासाठी पुढील काही सवयी तुम्हाला नक्की उपयोगी ठरू शकतात. 

आपल्या घरातली सगळ्यात जास्त आवरावी लागणारी खोली म्हणजे आपलं स्वयंपाक घर. कारण स्वयंपाक घरात आपण बरीच चिरणे, भिजवणे, फोडणी घालणे, सोलणे, वाटणे अशी बरीच ओली कामं करत असतो. त्यामुळे तिथे नेहमीच पसारा होतो. त्यामुळे ओटा, फरशा, गॅस खराब होतात. म्हणूनच इतर खोल्यांपेक्षा स्वयंपाक घरात झुरळं, मुंग्या, चिलटं जरा जास्त दिसतात (important kitchen tips for every house). त्यासाठीच या काही सवयी स्वतःला लावून घ्या. यामुळे तुम्हाला तुमचं स्वयंपाक घर नेहमीच स्वच्छ- चकचकीत दिसेल. (5 important tips to keep your kitchen always neat and clean)

 

स्वयंपाक घर नेहमीच स्वच्छ ठेवण्यासाठी ५ टिप्स 

स्वयंपाक घर अस्वच्छ दिसलं की आपल्यालाच खूप त्रास होतो. शिवाय तिथल्या अस्वच्छतेचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होत असतो. त्यामुळे किचन स्वच्छ ठेवण्यासाठी पुढील काही सवयी तुम्हाला नक्की उपयोगी ठरू शकतात. 

सासू असावी तर अशी! आलिया- रणबीरला सुखी संसारासाठी काय सल्ला द्याल? नीतू कपूर म्हणाल्या....

१. सगळ्यात पहिलं म्हणजे आठवड्यातून एकदा ओट्याच्या वरच्या भागात लावलेल्या टाईल्स साबणाने घासून स्वच्छ करा. आपण रोज गॅस पुसतो. ओटा पुसतो. पण वरच्या टाईल्स पुसायला विसरून जातो. किंवा वेळेअभावी ते रोजच्यारोज जमत नाही. त्यामुळे मग त्या मेणचट, तेलकट होतात. 

प्रियांका चोप्रासारखी सुंदर चमकदार त्वचा-दाट केस हवेत? करा तिच्या आईने सांगितलेला उपाय

२. आपण रोज गॅस पुसला तरी गॅसच्या बटणांच्याभोवती अडकून बसलेली घाण स्वच्छ होत नाही. म्हणून आठवड्यातून एकदा गॅसची बटणं काढून गॅस स्वच्छ धुवा.

 

३. आठवड्यातून एकदा स्वयंपाक घरातल्या सगळ्या ट्रॉली बाहेरच्या बाजूने स्वच्छ पुसून घ्या. बऱ्याचदा काम करताना त्यांना खरकटे हात लागतात आणि त्या खराब होतात. म्हणून आठवड्यातून एकदा ही स्वच्छता गरजेची आहे. 

किचनमधल्या ट्यूब-बल्ब तेलकट आणि पिवळे झाले? ५ मिनिटांतच होतील स्वच्छ- ३ सोपे उपाय

४. स्वयंपाक घरातला पंखा, लाईट आठवड्यातून एकदा डिशवॉश लिक्विड लावून घासून काढा. कारण त्यावर  चिकट थर साचत जातो. तो वाढत गेला तर मग ते स्वच्छ करणे कठीण आणि वेळखाऊ होते.

५. स्वयंपाक घरातल्या फरशा आपण रोजच पुसतो. पण अगदी कोपरा न् कोपरा रविवारच्या दिवशी घासून पुसून स्वच्छ करा. छताचे कोपरेही घासून घ्या. यामुळे स्वयंपाकघरात जाळे होणार नाही.


 

Web Title: 5 important tips to keep your kitchen always neat and clean, 5 important kitchen tips for every house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.