Join us  

कधीच जाणार नाही सिल्कच्या साडीची चमक, ५ गोष्टी करा साडी वर्षानूवर्षे दिसेल नवीकोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2023 12:47 PM

5 Important Tips To Maintain Silk Saree Over The Years: सिल्कची साडी वापरताना या काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमची साडी वर्षांनुवर्षे अगदी नव्यासारखी दिसेल. (how to take care of silk saree)

ठळक मुद्देया काही गोष्टींची काळजी घेतली तर तुमची सिल्कची साडी वर्षांनुवर्षे अगदी नवी कोरी दिसेल.

सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे सिल्कच्या साड्यांचा वापर भरपूर प्रमाणात होतो आहे. म्हणूनच साडी वापरताना आणि नेसून झाली की पुन्हा ठेवून देताना या काही गोष्टींची काळजी घेतली तर तुमची सिल्कची साडी वर्षांनुवर्षे अगदी नवी कोरी दिसेल. कित्येक वर्षे वापरल्यानंतरही साडी जुनी झाली आहे असं मुळीच वाटणार नाही (5 tips- your silk saree will never look old). कारण साडीची चमक कायम असेल (What to do to maintain the shine of silk saree). त्यासाठी साडीच्या बाबतीत फक्त या ५ गोष्टींची काळजी घ्या.(how to take care of silk saree)

सिल्कच्या साडीची काळजी कशी घ्यायची?

 

१. सिल्कची साडी ठेवण्याची पद्धत

सिल्कची साडी कधीही प्लास्टिकच्या बॅगमध्ये ठेवायची नाही.

कोणतं कॉस्मेटिक्स किती दिवस वापरायचं? तुम्हीही प्रॉडक्टची Expiry Date आणि Shelf Life यात गल्लत करता का?

सिल्कच्या साड्या ठेवण्यासाठी बाजारात मिळणारे कॉटन कव्हर आणा किंवा मग एखाद्या सुती ओढणीमध्ये साडी गुंडाळून ठेवा. त्या ओढणीचा रंग निघणार नाही ना, याची खबरदारी मात्र नक्की घ्या.

 

२. घड्या बदलत राहा

सिल्कच्या साड्यांची घडी अधून मधून बदलत जा. कारण एकाच घडीमध्ये साडी महिनोंमहिने राहात असेल तर त्या साडीला तसेच वळ पडत जातात आणि कालांतराने ती साडी तशीच घडीवर चिरत जाते. त्यामुळे अधूनमधून साडीच्या घड्या बदलत जा.

 

३. वारंवार ड्रायक्लिन नको

गरज नसताना सिल्कची साडी वारंवार ड्रायक्लिन करून आणू नये.

झाडं खूपच सुकली- फ्रेश टवटवीत दिसेना? घ्या १ चमचा बेकिंग सोडा- बघा कसं पालटून जाईल झाडांचं रूप

जेव्हा साडी नेसायची असेल त्याच्या आधीच ती ड्रायक्लिन करून आणा. वारंवार जर ड्रायक्लिनिंगची ट्रीटमेंट केली तर साडी खराब होऊ शकते.

 

४. या गोष्टींपासून साडी दूर ठेवा

कपड्यांना कुबट वास येऊ नये म्हणून बऱ्याचजणी कप्प्यांमध्ये डांबर गोळी, उदबत्तीच्या पुड्याची रिकामी पाकिटे ठेवतात. पण सिल्कच्या साड्यांच्या कप्प्यात या गोष्टी ठेवू नका. तसेच परफ्यूम, अत्तर या गोष्टीही थेट साडीवर शिंपडू नका. साडीला डाग पडू शकतात.

 

५. साडीला मोकळी हवा द्यासिल्क साडीच्या प्रत्येक घडीमध्ये ॲसिड फ्री पेपर नॅपकिन ठेवा. यामुळे साडी खराब होत नाही.

२.५ लाखांची सुंदर साडी नेसूनही आलिया भट होतीये ट्रोल, तिची वेणी पाहून नेटिझन्स म्हणाले...... 

वर्तमानपत्रात साडी गुंडाळणे टाळा. तसेच प्रत्येक सिल्क साडीला वर्षातून एकदा तरी घरात सावलीत पसरवून ठेवा. साडीचा कुबट वास निघून जातो. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्ससाडी नेसणे