Lokmat Sakhi >Social Viral > आजीच्या बटव्यातील ५ किचन टिप्स, ग्रेवीपासून ते चपातीपर्यंत, जेवणाला येईल लज्जतदार चव..

आजीच्या बटव्यातील ५ किचन टिप्स, ग्रेवीपासून ते चपातीपर्यंत, जेवणाला येईल लज्जतदार चव..

Kitchen Tips आजीच्या बटव्यात अनेक टिप्स असतात. जे आपल्याला कुकिंग करताना उपयुक्त ठरतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2022 06:28 PM2022-11-30T18:28:15+5:302022-11-30T18:30:04+5:30

Kitchen Tips आजीच्या बटव्यात अनेक टिप्स असतात. जे आपल्याला कुकिंग करताना उपयुक्त ठरतात..

5 kitchen tips from grandma's bag, from gravy to chapati, food will taste delicious.. | आजीच्या बटव्यातील ५ किचन टिप्स, ग्रेवीपासून ते चपातीपर्यंत, जेवणाला येईल लज्जतदार चव..

आजीच्या बटव्यातील ५ किचन टिप्स, ग्रेवीपासून ते चपातीपर्यंत, जेवणाला येईल लज्जतदार चव..

सध्या आधुनिक तंत्रज्ञानाचं विश्व आहे. मशिनशिवाय व्यक्तीची कोणतेही गोष्ट होत नाही. पदार्थ झटपट बनवण्यासाठी महिला मशीनचा वापर करतात. मात्र, हाताची चव या आजकालच्या मशीन्समधून येणार नाही एवढं मात्र नक्की. जेवण बनवणे आपण आपल्या आईकडून शिकतो, आणि आपली आई आजीकडून शिकते. चव जरी तिच असली, तरी  देखील बनवण्याची पद्धत बदलत चालली आहे. कुकिंग करताना कोणतेही गोष्ट चुकीची घडली अथवा ती चूक सुधारावी कशी ? याचे टिप्स आणि ट्रिक्स आपण आपल्या आई अथवा आजीकडून घेत असतो. आजीच्या बटव्यात अनेक टिप्स असतात. जे आपल्याला कुकिंग करताना उपयुक्त ठरतात. चला तर मग असेच काहीसे छोटे परंतु महत्वाचे टिप्ससंदर्भात माहिती घेऊयात.

ग्रेवी घट्ट बनवण्यासाठी टिप्स

आपण कांदा, टोमॅटो आणि लसणाचा वापर करून ग्रेवी बनवतो. तरी देखील ग्रेवीला घट्टपणा येत नसेल तर, त्यात थोडं बेसन पीठ पाण्यात मिसळून टाका. बेसनाचा सुगंध येऊपर्यंत ग्रेवी चांगली ढवळत राहा. असे केल्याने ग्रेवी घट्ट बनेल आणि चविलाही उत्तम लागेल.

इडली मऊ बनेल फक्त हे करा

बहुतांशवेळा इडली खूप कडक बनते. कोणतंतरी साहित्य अधिक किंवा कमी पडले तर असं घडतं. त्यामुळे इडली बनवताना प्रमाणावर साहित्य टाका. याशिवाय इडली जर कडक बनत असतील तर, नारळाच्या पाण्यात ब्रेडचे काप टाका, थोडी साखर टाका आणि मिक्सरमधून हे मिश्रण चांगले वाटून घ्या. हे मिश्रण इडलीच्या बॅटरमध्ये टाका आणि मिक्स करा. अश्याने इडली मऊ आणि लुसलुशीत बनतील.

भात चिकट होतो ?

बहुतांश जणींचा भात हा रंगाने पिवळा होतो. जर आपल्यला भात हा रंगाने पांढरा आणि सुटसुटीत बनवायचा असेल. तर भात शिजवत असताना त्यात लिंबूचा रस टाका. याने भात पांढरा दिसेल, यासह सुटसुटीत होईल.

राजमा-डाळ शिजवताना हे लक्षात ठेवा

राजमा किंवा उडीद डाळ उकळवत ठेवताना त्यात मीठ घालू नका. असे केल्याने राजमा किंवा उडीद डाळ लवकर शिजते. राजमा किंवा उडीद शिजल्यावर मीठ घाला.

नान चपाती मऊ बनवण्याची ट्रिक

नान चपाती मऊ होण्यासाठी पीठ मळताना थोडे दही घाला. त्यानंतर कोमट पाण्याने मळून घ्या. याने चपाती मऊ आणि कुरकुरीत होईल.

Web Title: 5 kitchen tips from grandma's bag, from gravy to chapati, food will taste delicious..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.