Join us  

बाथरुम-बेसिन-सिंकचे नळ जुने कळकट दिसतात? १ सोपी ट्रिक- नळ दिसतील नवेकोरे स्वच्छ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 1:35 PM

5 Quick Tips To Clean Bathroom Taps : घरातील नळ जुनाट, गंज लागल्यासारखे दिसत तर असतील तर खास उपाय करून काही मिनिटांत नळावर लागलेला गंज हटवू शकता.

लोखंडाच्या वस्तूंना गंज लागणं हे खूपच कॉमन आहे. याचं सगळ्यात मोठं कारण मॉईश्चर असू शकते. वारंवार पाणी लागल्यामुळे गंज येतो. बाथरूम, बेसिन आणि टॉयलेट्सचे नळ वारंवार पाण्याच्या संपर्कात येत असता. यामुळे कधी गंज लागतो तर कधी पांढरे पडतात अशाने नवीन नळ जुने, मळकट दिसतात. नळ कसे स्वच्छ करावेत असा प्रश्न अनेकांना पडतो. तुमच्याही घरातील नळ जुनाट, गंज लागल्यासारखे दिसत तर असतील तर खास उपाय करून काही मिनिटांत नळावर लागलेला गंज हटवू शकता. (How to clean dirty taps)

लिंबू आणि गरम पाणी वापरा

बाथरूमच्या नळांवर लागलेल्या गंज काढून टाकण्यासाठी हा उत्तम उपाय आहे. यासाठी सगळ्यात आधी लिंबू आणि गरम पाण्याचं मिश्रण तयार करा. स्प्रे बॉटलच्या साहाय्यानं हे मिश्रण नळावर शिंपडा आणि काहीवेळासाठी तसेच सोडा. यामुळे नळांवरील  हट्टी डाग निघून जातील. क्लिनिंग ब्रशनं नळावर जवळपास २ ते ४ मिनिटे रगडा यामुळे गंज दूर होण्यास मदत होईल.

बेकींग सोडा

खाण्याचा सोडा वापरून तुम्ही घरातील अनेक वस्तू चमकवू शकता. नळांवर साचलेला गंज काढून टाकायचा असेल तर बेकींग सोडा हा उत्तम पर्याय आहे. सगळ्यात आधी एका भांड्यात ३ चमचे बेकींग सोडा, २ चमचे लिंबाचा रस आणि १ कप पाणी घ्या आणि मिश्रण तयार करा.  गंज लागलेल्या ठिकाणी हे मिश्रण लावा आणि १० मिनिटांसाठी तसेच सोडून द्या.  १० मिनिटांनी क्लिनिंग ब्रशने नळ  रगडून स्वच्छ करा.

व्हिनेगर आणि बेकींग सोडा

गंज काढून टाकण्यासाठी व्हिनेगर आणि बेकींग सोडा एक उत्तम पर्याय आहे. सगळ्यात आधी हे दोन्ही पदार्थ एकत्र करून मिश्रण तयार करा. क्लिनिंग ब्रशवर हे मिश्रण लावून व्यवस्थित रगडा आणि १० मिनिटं तसेच ठेवा नंतर पाण्याने स्वच्छ करा.

मीठ

मीठाचं पाणी हट्टी डाग काढण्यासाठी प्रभावी मानले जाते. गंज किंवा डाग लागलेल्या भागावर मीठ लावून ३ ते ४ तासांसाठी तसेच ठेवून द्या. नंतर स्पंज किंवा स्क्रब बॅडने घासा. मग गरम पाण्याने नळ स्वच्छ करा. 

टॅग्स :स्वच्छता टिप्सकिचन टिप्स