Lokmat Sakhi >Social Viral > पावसाळ्यात ओलसर कपड्यांना कुबट वास येतो? ५ सोपे उपाय, कपडे राहतील एकदम फ्रेश

पावसाळ्यात ओलसर कपड्यांना कुबट वास येतो? ५ सोपे उपाय, कपडे राहतील एकदम फ्रेश

5 Remedies to Get Rid from Bad Smell of Cloths in Monsoon : कुबट वास घालवण्यासाठी नेमके काय करायचे हे समजून घेऊया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2023 09:22 AM2023-06-29T09:22:17+5:302023-06-29T09:25:01+5:30

5 Remedies to Get Rid from Bad Smell of Cloths in Monsoon : कुबट वास घालवण्यासाठी नेमके काय करायचे हे समजून घेऊया.

5 Remedies to Get Rid from Bad Smell of Cloths in Monsoon : Do wet clothes smell musty in monsoons? 5 simple solutions, clothes will stay fresh | पावसाळ्यात ओलसर कपड्यांना कुबट वास येतो? ५ सोपे उपाय, कपडे राहतील एकदम फ्रेश

पावसाळ्यात ओलसर कपड्यांना कुबट वास येतो? ५ सोपे उपाय, कपडे राहतील एकदम फ्रेश

एकदा पाऊस सुरू झाला की ३-४ दिवस थांबायचे नाव घेत नाही. गेला महिनाभर पावसाची आतुरतेने वाट पाहणारे आपण आता पाऊस कधी थांबणार याची वाट पाहायला लागलो. मागील ४ दिवसांपासून सूर्याने दर्शनही न दिल्याने वातावरणात सतत ओलावा आहे. या काळात एक महत्वाची अडचण होते ती म्हणजे ओले कपडे कपडे वाळण्याची. काही वेळा हे कपडे पावसाने ओले झालेले असतात तर काही वेळा ऊन न पडल्याने धुतलेले ओले कपडे वाळलेलेच नसतात. इतकेच नाही तर कपाटात किंवा बाहेर असलेल्या कपड्यांनाही दमट हवामानामुळे कुबट वास यायला लागतो (5 Remedies to Get Rid from Bad Smell of Cloths in Monsoon) . 

एकदा कपड्यांना वास यायला लागला की तो कसा घालवायचा असा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. यामध्ये अगदी आतल्या कपड्यांपासून, टॉवेल, घरात वापरायचे कपडे, बाहेरचे कपडे अशा सगळ्याच प्रकारच्या कपड्यांचा समावेश असतो. कपड्यांचा हा वास सहज जाणारा नसतो, त्यामुळे असे कपडे वापरताना किंवा अंगात घातल्यावर अंगालाही त्याचा वास येतो आणि आपल्या आजुबाजूच्यांनाही अगदी सहज हा वास येऊ शकतो. असे वास असलेले कपडे अंगावर घालणे त्वचेच्या आरोग्याच्या दृष्टीनेही चांगले नसते. आता कपड्यांना येणारा हा कुबट वास घालवण्यासाठी नेमके काय करायचे हे समजून घेऊया. घरच्या घरी काही सोपे उपाय केल्यास हा वास निघून जाण्यास फायदा होतो, पाहूयात हे उपाय कोणते आणि ते कसे करायचे.  

१. मीठ

कपाटात एका कोपऱ्यात मिठानं भरलेली पिशवी ठेवावी. ही पिशवी कपड्यांचा ओलावा शोषून घेण्यास उपयुक्त असते. याशिवाय कपडे कोरडे ठेवण्यास याची चांगली मदत होते. एका सुती कापडाच्या पुरचुंडीत मीठ ठेवले तरी चालते. 

२. कडुनिंबाची पाने 

कडुनिंबाच्या पानांना आयुर्वेदात नैसर्गिक जंतुनाशक म्हणून महत्त्व आहे. ओलाव्यामुळे येणारी बुरशी किंवा जंतूंचा प्रसार टाळण्यासाठी वाळलेल्या कडुनिंबाच्या पानांचा चांगला उपयोग होतो. कपाटातील आणि कपड्यांचा ओलावा कमी करण्यासाठी हे उपयुक्त ठरते.

३. बेकिंग सोडा

बेकिंग सोडा वापरून पावसाळ्याच्या दिवसांत धुतलेल्या कपड्यांना येणारी दुर्गंध दूर करता येते. यासाठी कपडे धुताना एक बादली पाण्यात १ चमचा खाण्याचा सोडा टाकावा आणि त्यात कपडे भिजत घालावे यामुळे कपड्यांचा कुबट वास जाण्यास मदत होते. 

(Image : Google)
(Image : Google)

४. व्हिनेगर

स्वयंपाकात वापरण्यात येणारे व्हिनेगर कपड्यांचा वास जाण्यासाठी उपयुक्त असते. दुर्गंधीयुक्त बॅक्टेरिया मारण्यासाठी व्हिनेगर चांगले कार्य करते. यामुळे कपड्यांचा कुबट वास दूर होतो.

५. फॅब्रिक कंडीशनर

बाजारात कपड्यांना सुगंध यावा यासाठी फॅब्रिक कंडिशनर मिळतात. यामध्ये वेगवेगळ्या फुलांचे वास असणारे कंडीशनर असतात. कपडे खळबळताना हे कंडीशनर टाकले तर कपड्यांना अतिशय छान असा सुगंध येतो. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत हे कंडिशनर आवर्जून वापरायला हवेत. त्याचा कपड्यांचा कुबटपणा जाण्यासाठी निश्चितच फायदा होतो.  


 

Web Title: 5 Remedies to Get Rid from Bad Smell of Cloths in Monsoon : Do wet clothes smell musty in monsoons? 5 simple solutions, clothes will stay fresh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.