बहुतांश घरात स्वयंपाक करण्यासाठी मिक्सरचा वापर होतो. मिक्सरच्या (Mixer Grinder) वापरामुळे पेस्ट-पावडर तयार करणं सोपे होते. पूर्वीच्या काळी लोकं वाटण करण्यासाठी पाट आणि वरवंट्याचा वापर करत असत. खरंतर मिक्सरमुळे अनेक काम सोपी झाली आहेत. शिवाय कमी वेळात झटपट जेवण तयार होते. पण मिक्सरचं भांडं बिघडलं किंवा मिक्सरच्या भांड्याच्या पानांमधील धार कमी झाली तर, वाटण व्यवस्थित बारीक होत नाही.
ब्लेंडरची धार अनेक कारणांमुळे कमी होते (Cooking tips). त्यात कोणती गोष्ट घालून वाटू नये, ब्लेंडरची धार कमी होऊ नये यासाठी काय करावे? पाहा(5 Things Not to Put In A Mixer Grinder).
फ्रोजन फुड्स
काही लोकं ज्यूस किंवा भाज्या तयार करण्यासाठी मिक्सरचा वापर करतात. बहुतांश लोकं भाज्या आणि फळे फ्रिजमध्ये स्टोर करून ठेवतात. फ्रोजन फ्रुट्स मिक्सरमध्ये बारीक केल्याने ब्लेंडरची धार कमी होते. शिवाय पानं देखील तुटतात. जर आपल्याला फळे ब्लेंडरमध्ये घालून ज्यूस तयार करायचा असेल तर, १० ते १५ मिनिटांसाठी बाहेर काढून ठेवा. फळे डिफ्रॉस्ट केल्यानंतरच त्याचा ज्यूस तयार करा.
संक्रातीला केलेले तिळाचे लाडू महिनाभर टिकतील, घ्या कपभर तिळाची सोपी रेसिपी-कडकही होणार नाहीत
गरम पदार्थ
बरेच जण ब्लेंडरमध्ये गरम पदार्थ घालून वाटण तयार करतात. पण गरम पदार्थ वाटत असताना ब्लेंडरमध्ये त्वरित दाब निर्माण होते. यामुळे ब्लेंडरचे झाकण फुटू शकते, किंवा ब्लेंडरची पानं खराब होऊ शकतात.
स्टार्चयुक्त पदार्थ
स्टार्चयुक्त पदार्थ जसे की बटाटे ब्लेंडरमध्ये वाटल्याने त्याची पानं तुटू शकतात, किंवा त्यातील धार कमी होऊ शकते. बटाट्यामध्ये भरपूर स्टार्च असते. शिवाय ते चिकट असतात. ज्यामुळे ते नीट ब्लेंड होत नाही. त्यामुळे बटाटे कधीही ब्लेंडरमध्ये घालून बारीक करू नका.
ना गॅस-ना तेल, ५ मिनिटात धुराचा कांदा करण्याची सोपी कृती, तोंडी लावण्यासाठी ताटात हवीच
आलं-लसूण
अनेक वाटणामध्ये आलं-लसूण असते. शिवाय बरेच जण आलं-लसणाची पेस्ट तयार करतात. पण आलं-लसणामुळे ब्लेंडरची पानं खराब होऊ शकतात. शिवाय ब्लेंडरमध्ये आलं-लसूण अडकतात. ज्यामुळे ब्लेंडर जार साफ करणे कठीण होऊन जाते. शिवाय त्यातून आलं-लसणाचा गंधही लवकर निघत नाही.
उडीद डाळ
इडली व डोश्याचं पीठ तयार करताना आपण तांदुळासोबत उडीद डाळही भिजत घालतो. पण उडीद डाळीमुळे ब्लेंडरची पानं खराब होऊ शकतात. उडीद डाळ चिकट असते. ज्यामुळे ते व्यवस्थित ब्लेंड होत नाही. शिवाय पानांची धारही कमी होते.