Lokmat Sakhi >Social Viral > मिक्सरच्या भांड्यात ५ गोष्टी बारीक करणे तातडीने थांबवा, म्हणून पाती होतात खराब

मिक्सरच्या भांड्यात ५ गोष्टी बारीक करणे तातडीने थांबवा, म्हणून पाती होतात खराब

5 Things you should Never Put in a Grinder and Blender मिक्सरच्या भांड्यात ५ गोष्टी बारीक करणं टाळा, नाहीतर होऊ शकेल मिक्सर खराब..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2023 01:35 PM2023-06-07T13:35:13+5:302023-06-07T13:36:46+5:30

5 Things you should Never Put in a Grinder and Blender मिक्सरच्या भांड्यात ५ गोष्टी बारीक करणं टाळा, नाहीतर होऊ शकेल मिक्सर खराब..

5 Things you should Never Put in a Grinder and Blender | मिक्सरच्या भांड्यात ५ गोष्टी बारीक करणे तातडीने थांबवा, म्हणून पाती होतात खराब

मिक्सरच्या भांड्यात ५ गोष्टी बारीक करणे तातडीने थांबवा, म्हणून पाती होतात खराब

स्वयंपाक घरात अनेक उपकरणांचा वापर होतो. या मशीनच्या वापरामुळे इतर कामं सोपे होतात. व जेवण देखील झटपट तयार होते. मायक्रोवेव्ह ओव्हन, मिक्सर, फ्रिज, या सर्व उपकरणांमुळे आपले काम झटक्यात पूर्ण होते. पण कधी हेच मशीन बिघडल्यानं आपले काम अर्धवट राहते.

कधी - कधी मिक्सरचं भांडं खराब होते. त्याच्या पानांमधील धार कमी होते, किंवा तुटते. मिक्सरच्या भांड्यांमधील ब्लेंडरची धार अनेक कारणांमुळे कमी होते. त्यात असे काही पदार्थ बारीक करणे टाळा, ज्यामुळे ब्लेंडरची धार कमी होऊ शकते. अशा परिस्थितीत बाकीचे पदार्थ व्यवस्थित बारीक होत नाही(5 Things you should Never Put in a Grinder and Blender).

बटाटा

उकडलेले किंवा कच्चे बटाटे मिक्सरच्या भांड्यात कधीही बारीक करू नका. बटाट्यांमध्ये भरपूर स्टार्च असल्याने ते जारच्या ब्लेडला नुकसान पोहोचवू शकतात. याशिवाय, उकडलेले बटाटे खूप चिकट असतात, ज्यामुळे ते नीट ब्लेंड होत नाही. त्यामुळे बटाटे कधीही मिक्सरच्या भांड्यात ब्लेंड करू नका.

रव्यात अळ्या झाल्या? ४ उपाय, रव्यात अळ्या होणारच नाहीत, झालेल्या जातील पळून

उडीद डाळ

इडली व डोश्याचं पीठ यासह उडीद डाळ मिक्सरमध्ये ब्लेंड करू नका. उडीद डाळीचे पेस्ट खूप चिकट असते. ज्यामुळे ते व्यवस्थित ब्लेंड होत नाही. ज्यामुळे पानांची धार कमी होते.

फ्रोझन फ्रुट व भाज्या

फ्रोझन फ्रुट व भाज्या मिक्सरच्या भांड्यात बारीक केल्याने पानांची धार कमी होते. ते व्यवस्थित बारीक होत नाही, अशा परिस्थितीत पाने देखील तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ना डाळी भिजत घालण्याची झंझट, ना वाटण्याचं टेन्शन, २ कप रव्यामध्ये घरीच करा - क्रिस्पी रव्याचे मेदू वडे..

कणिक

मिक्सरच्या भांड्यात कधीही कणिक मळण्याचा प्रयत्न करू नका. त्यात कणिक मळल्याने मिक्सरच्या भांड्यावर व पानांवर भार पडतो. ज्यामुळे ब्लेंडर तुटण्याची शक्यता निर्माण होते. 

खडा मसाला

खडा मसाला हे फार कडक असतात. मिक्सरच्या भांड्यात खडा मसाला बारीक केल्याने ब्लेंडर तुटण्याची शक्यता निर्माण होते. किंवा पानांची धार कमी होते. त्यामुळे कधीही मिक्सरच्या भांड्यात खडा मसाला बारीक करू नका.

Web Title: 5 Things you should Never Put in a Grinder and Blender

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.