प्रत्येक घरातील गृहिणी आपल्या घरातील सदस्यांना 'आज जेवणासाठी काय बनवू' असा प्रश्न विचारते. पण या प्रश्नाचं उत्तर सरळ शब्दात कोणीच देत नाही. 'तुझ्या मनाला येईल ते बनव' असे म्हणून घरातील सदस्य हात वर करतात. पण महिलेला तासंतास उभं राहून जेवण तयार करायला लागते. शिवाय किचनची सावरासावर करायला लागते ती वेगळीच. अनेकदा जेवण तयार करताना एवढा वेळ लागत नाही, जेवढा किचन आवरण्यात वेळ जातो.
बऱ्याचदा वर्किंग वूमनला (Working women) किचन आवरण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही, त्यामुळे जेवण तयार करण्यात आणि किचन आवरण्यात बराच वेळ जातो. शिवाय खरकटी भांडी, कळकट झालेली भिंत-टाईल्स खूप खराब दिसतात. ज्यामुळे किचनची शोभा कमी होते. जर आपल्याला किचनमध्ये कमी पसारा करून कमी वेळात जेवण तयार करायचे असेल तर (Cooking Tips), दररोज ५ ट्रिक्स फॉलो करून पाहा. या काही ट्रिक्समुळे कमी वेळात किचनची कामं नक्कीच आवरतील(5 Tips for Saving Time in the Kitchen).
१. जेवण तयार करण्यापूर्वी किचन साफ करा
जेवण तयार करण्यापूर्वी नेहमी किचन साफ करा. स्वच्छ किचन पाहून बऱ्याच महिलांना काम करण्यास उर्जा मिळते. शिवाय अनेकदा किचनमध्ये झुरळं आणि पाली फिरतात, त्यामुळे किचन नेहमी साफ करूनच स्वयंपाक करायला घ्या. जेव्हा किचन कट्ट्यावर साहित्यांची गर्दी असते, तेव्हा जेवण तयार करताना गडबड होते. शिवाय वेळेवर साहित्य मिळतही नाही. त्यामुळे स्वयंपाक करण्यापूर्वी नेहमी किचन स्वच्छ करून घ्या.
कुकर की कढई, कोणत्या भांड्यात जेवण शिजवल्याने आरोग्याला जास्त फायदा होतो? शरीरासाठी काय फायद्याचं?
२. जवळ ठेवां कचरापेटी
बऱ्याचदा घाईत आपण किचन कट्ट्यावर भाजी किंवा कांदा चिरतो, कांद्याची टरफल तसेच कट्ट्यावर सोडून देतो. ज्यामुळे किचन अधिक अस्वच्छ दिसू लागते. शिवाय नंतर किचन आवरण्यात बराच वेळ जातो. त्यामुळे किचनमधील कचरा नेहमी कचरापेटीत वेळीच टाकून द्या. कारण कचरा टाकायला फार वेळ लागत नाही, शिवाय आपला पुढचा वेळही वाचतो.
३. डाळी-मसाले विविध डब्ब्यांमध्ये स्टोर करून ठेवा
अनेकांना स्वयंपाक करताना लवकर वस्तू मिळत नाही. ज्यामुळे जेवण तयार करताना बराच वेळ जातो. शिवाय वेळेवर पदार्थही तयार होत नाही. त्यामुळे स्वयंपाक करताना लागणाऱ्या वस्तू विविध डब्यांमध्ये साठवून ठेवा. शिवाय हे डबे किचनमधील जवळच्या शेल्फमध्ये ठेवा. जेणेकरून पदार्थ तयार करताना वारंवार शोधाशोध होणार नाही, व जेवण पटकन तयार होईल.
ऐन पंचविशीत खांद्यावर जबाबदारीचं ओझं पडलं, हाडं ठणकतात? रोज खा ५ पदार्थ, पन्नाशी-साठीतही राहाल फिट
४. किचन सिंकमध्ये भांडी साठवून ठेऊ नका
जेवण तयार करताना काही भांडी खराब-खरकटी होतातच. खराब झालेली भांडी आपण किचनच्या सिंकमध्ये साठवून ठेवतो. जेव्हा आपल्याला वेळ मिळते तेव्हा आपण भांडी घासतो, नाहीतर दिवसभर सिंकमध्ये भांडी पडूनच राहतात. त्यामुळे वेळीच भांडी घासून काढा. यामुळे आपली किचनमधील कामं लवकर पूर्ण होतील.
५. भाज्या आधीच शिजवून ठेवा
बऱ्याच भाज्या लवकर शिजत नाही. ज्यामुळे पदार्थ तयार करताना बराच वेळ लागतो. जर आपल्याला जेवण तयार करण्याचा वेळ वाचवायचा असेल तर, भाज्या आधीच अर्धे शिजवून घ्या. शिजलेल्या भाज्या हवाबंद डब्यात साठवून ठेवा. ज्यामुळे स्वयंपाक करताना आपल्याला जास्त वेळ लागणार नाही.