किचन म्हटलं की भांडी आलीच. जेवण बनवण्यासाठी भांडी लागतातच. सध्या बाजारात विविध प्रकारचे भांडी मिळतात. जेवण बनवल्यानंतर भांडी अस्वच्छ होतात. जेवण बनवत असताना भांडी करपतात, तर काही भांड्यांमधून तेलकटपणा निघत नाही.
भांडी घासण्यासाठी आपण साबण आणि स्क्रबरचा वापर करतो. पण अनेकदा घरातील डिश वॉश किंवा साबण संपते. अशा वेळी भांडी कशाने घासावे हे सुचत नाही. घरात जर भांडी घासण्यासाठी साबण उपलब्ध नसेल तर, या गोष्टींचा वापर करून भांडी घासून पाहा. याच्या वापरामुळे भांडी चकाचक निघतील(5 tips to clean utensils without dishwashing soap).
साबणाऐवजी या गोष्टी वापरून पाहा
बेकिंग सोडा
प्रथम भांडी गरम पाण्याने धुवा व त्यावर बेकिंग सोडा शिंपडा. त्यानंतर स्क्रबरने भांडी घासून काढा. जर भांडं चिकट असेल तर, बेकिंग सोडा भांड्यात ५ ते ६ मिनिटांसाठी ठेवा. त्यानंतर स्क्रबरने भांडं नीट घासून घ्या. या उपायामुळे भांडं चमकू लागेल.
केमिकल कशाला, घरच्या घरी बनवा ऑरगॅनिक धूप, घर राहील फ्रेश - कायम सुगंधित
DIY क्लिनर
१ कप कोमट पाण्यात, २ चमचे मीठ आणि १ लिंबाचा रस मिसळा. हे सर्व साहित्य एका वाटीत घेऊन चमच्याने चांगले मिसळा. हे मिश्रण भांड्यात घालून स्क्रबरने घासा. मीठ भांडयामधून जमा झालेल्या अन्नाचे तुकडे काढते, तर लिंबू दुर्गंधी दूर करते.
लाकडाची राख
गावाखेड्यात अजूनही लाकडाच्या राखेचा वापर करून भांडी घासतात. याच्या वापराने भांड्यांवर जमा झालेली चिकटपणा सहजपणे निघून जाईल. व दुर्गंधी देखील कमी होते. यासाठी लाकडाची राख थेट भांड्यावर शिंपडा मग स्क्रबरने भांडी घासून काढा.
नळावरचे गंजलेले डाग काढण्यासाठी १ भन्नाट सोपी ट्रिक, नळ दिसतील नव्यासारखे चकचकीत
तांदूळ पाणी
तांदळाच्या पाण्यात स्टार्च आणि सायट्रिक ऍसिड असते, जे चिकटपणा दूर करण्यासाठी मदत करते. यासाठी फक्त तांदळाचे पाणी भांड्यात टाकून ३० मिनिटांसाठी ठेवा. त्यानंतर स्क्रबरने भांडी घासून काढा. यामुळे चिकटपणा दूर होईल व दुर्गंधीही निघून जाईल.
सोडा - लिंबू
एका वाटीत ३ चमचे बेकिंग सोडा घ्या. त्यात एक लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करा. आता यात स्क्रबर बुडवून भांडी घासून काढा. जर घरात भांडी घासायचं साबण संपला असेल तर, ही ट्रिक नक्की वापरून पाहा.