Lokmat Sakhi >Social Viral > उन्हाळा सुरु होताच डास सळो की पळो करतात? ५ घरगुती गोष्टी; डास घरात फिरकणार नाहीत

उन्हाळा सुरु होताच डास सळो की पळो करतात? ५ घरगुती गोष्टी; डास घरात फिरकणार नाहीत

5 tips to keep you mosquito free this summer : स्वयंपाकघरातल्या ५ गोष्टींचा वापर करून पाहा, डासांपासून मिळवा मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2024 04:19 PM2024-03-18T16:19:59+5:302024-03-18T16:20:53+5:30

5 tips to keep you mosquito free this summer : स्वयंपाकघरातल्या ५ गोष्टींचा वापर करून पाहा, डासांपासून मिळवा मुक्त

5 tips to keep you mosquito free this summer | उन्हाळा सुरु होताच डास सळो की पळो करतात? ५ घरगुती गोष्टी; डास घरात फिरकणार नाहीत

उन्हाळा सुरु होताच डास सळो की पळो करतात? ५ घरगुती गोष्टी; डास घरात फिरकणार नाहीत

उन्हाळा (Summer) सुरु झाल्यानंतर घरात डासांचा प्रादुर्भाव वाढत जातो. आधीच उकाडा त्यात मच्छरांच्या त्रासामुळे आपली आणखीन चिडचिड होते. डास मारण्यासाठी आपण कॉइल किंवा स्प्रेचा वापर करतो (Cleaning Tips). पण वारंवार रसायनयुक्त उत्पादनांचा वापर केल्याने आरोग्यास हानिकारक ठरते. परंतु, डासांचा वावर घरात वाढला की, मलेरिया आणि डेंग्यू सारखे आजार पसरण्याची भीतीही असते (Mosquito Free Home).

डासांपासून सुटका हवी असेल, शिवाय रसायनयुक्त गोष्टींचा वापर करायचा नसेल तर, पाचपैकी एक गोष्टीचा वापर करून पाहा. या घरगुती उपायामुळे डास दूर राहतील. शिवाय नैसर्गिक उपायामुळे आरोग्याला त्रासही होणार नाही(5 tips to keep you mosquito free this summer).

कडूलिंबाची पानं

कडूलिंबाची पानं फक्त आरोग्यासाठी नसून, डासांना पळवून लावण्यासही मदत करतात. यासाठी मातीचे भांडे घ्या आणि त्यात कोरडी कडुलिंबाची पाने टाका. त्यात कापूर आणि तमालपत्राची पानं घाला. घराबाहेर किंवा घराच्या एका कोपऱ्यात मातीचे भांडं ठेवा. त्यात एक माचिसची काडी लावून आग लावा. याच्या धुराने घरातून डास पळून जातील. शिवाय पुन्हा घरात शिरणार नाही.

१०१ वर्षांच्या आजीबाई सांगतात भरपूर आणि आनंदी जगायचं तर फक्त ३ सोप्या गोष्टी करा..

ऍपल सायडर व्हिनेगर

बरेच जण ऍपल सायडर व्हिनेगरचा वापर जेवणासाठी करतात. पण आपण याच्या वापराने डासांना नायनाट करू शकता. यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये पाणी आणि ऍपल सायडर व्हिनेगर घालून मिक्स करा. तयार स्प्रे कपड्यांवर शिंपडा. याच्या उग्र गंधामुळे शरीराजवळ डास फिरकणारही नाही.

लिंबू

डासांना घरापासून दूर ठेवण्यासाठी लिंबू गुणकारी आहे. यासाठी लिंबाचे तुकडे करून त्यात लवंगा खोचा. आता हे लिंबू घरात त्या ठिकाणी ठेवा जिथे डास जास्त येतात. या उपायामुळे घराजवळ डास येणार नाही.

'शैतान' फेम ज्योतिकाचं साधं सोपं फिटनेस सिक्रेट; तिचे वय किती? विश्वास नाही बसणार..

तुळशी

तुळशीमध्ये आयुर्वेदिक गुणधर्म असतात. जे डासांपासून दूर ठेवण्यासाठी प्रभावी ठरते. यासाठी वाळलेल्या तुळशीची पाने गोळा करा. संध्याकाळी घराच्या एका कोपऱ्यावर जाळून टाका. धुरामुळे डास पळून जातील.

निलगिरी तेल

निलगिरी तेलात लिंबाच्या रसाचे काही थेंब मिसळा आणि हे मिश्रण शरीरावर लावा. याच्या उग्र गंधामुळे डास आपल्या आजूबाजूला फिरकणार नाही. 

Web Title: 5 tips to keep you mosquito free this summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.