राज्यात मान्सूनने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी मुसळधार तर, काही ठिकाणी रिमझिम पावसाच्या सरी बरसत आहे. अनेक जण पावसाच्या पूर्व तयारीला लागले आहेत, छत्र्या, रेनकोट खरेदी करताना लोकं दिसून येत आहे. आपण पावसापासून स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. मात्र, या पावसात मोबाईल फोन हा भिजतोच.
पावसात भिजल्यामुळे मोबाईल लवकर खराब होते. मोबाईल खराब झाल्यानंतर, त्याच्या रिपेयरसाठी खूप पैसे मोजावे लागतात. त्यामुळे पैसे खर्च करण्यापेक्षा या काही टिप्स फॉलो करून पाहा. या टिप्समुळे मोबाईल सुरक्षित राहेल, भिजला तरी घरच्या घरी रिपेयर करता येईल(5 Tips to Safeguard Your Smartphone This Monsoon).
फोन ऑफ करा
बहुतांश जणांचा मोबाईल फोन हा पावसाच्या पाण्यात भिजतोच. जर मोबाईल भिजला तर सर्वात आधी, स्वीच ऑफ करा. ज्यामुळे शॉर्ट सर्किट होण्याचा धोका कमी होतो. अशा स्थितीत फोन पूर्णपणे खराब होण्याचा धोका वाढतो. फोन खराब होऊ नये, यासाठी स्वीच ऑफ करा. व पाणी एका कापडाने पुसून काढा.
पावसाळ्यात घरात ट्यूबभोवती पाकोळ्या-किडे भिरभिरतात? ५ उपाय, किड्यांना न मारता ठेवा घराबाहेर
अॅक्सेसरीज काढून सुकवण्यासाठी ठेवा
पावसात फोन भिजल्यानंतर मोबाईल फोन स्वीच ऑफ करा. व त्याची बॅटरी, मेमरी कार्ड आणि सिमकार्ड काढा आणि कापड किंवा टिश्यू पेपरने नीट पुसून काढा. व सुकण्यासाठी फॅन खाली ठेवा. फोन लवकर चालू करू नका.
तांदळाची मदत घ्या
जर फोन पाण्यात भिजला असेल तर, तो पुसून नीट कोरडा करा, व त्यानंतर तांदळाच्या डब्यात ठेवा. किमान २४ तास तरी फोन तांदळाच्या डब्यात ठेवा. तांदूळ फोनमधील ओलावा शोषून घेण्यास मदत करेल.
पावसाळा सुरु झाला की बाथरूममध्ये गांडूळ येतात? ५ टिप्स, स्वच्छता राखा आणि आरोग्यही सांभाळा
सिलिका जेल मदत करेल
सिलिका जेल फोनमधील पाणी आणि आर्द्रता काढून टाकण्यास मदत करू शकते. यासाठी फोन बंद करून कोरड्या कपड्याने पुसून स्वच्छ करा. व कोरड्या काचेच्या डब्यात सिलिका जेल व फोन दिवसभर ठेवा. यामुळे फोनमधील पाणी सिलिका जेल शोषून घेईल.
यूएसबी आणि हेडफोन वापरू नका
जेव्हा पावसात भिजल्यामुळे फोन ओला होतो, तेव्हा त्यातून ओलावा लवकर निघून जात नाही. त्यामुळे यूएसबी केबल आणि हेडफोन अजिबात वापरू नका. कारण यामुळे फोन बिघडण्याची शक्यता अधिक वाढते.