Lokmat Sakhi >Social Viral > करा 5 उपाय, टॉयलेट मध्ये कधीच येणार नाही दुर्गंधी, वाटेल फ्रेश...

करा 5 उपाय, टॉयलेट मध्ये कधीच येणार नाही दुर्गंधी, वाटेल फ्रेश...

5 Bathroom Smell Hacks to Get Rid of Odors : टॉयलेट बाथरूम मधून येणारी तीव्र दुर्गंधी नाहीशी करण्यासाठी काही महत्वाच्या टिप्सचा वापर करून पाहूयात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2023 05:30 PM2023-06-22T17:30:30+5:302023-06-22T17:55:32+5:30

5 Bathroom Smell Hacks to Get Rid of Odors : टॉयलेट बाथरूम मधून येणारी तीव्र दुर्गंधी नाहीशी करण्यासाठी काही महत्वाच्या टिप्सचा वापर करून पाहूयात...

5 Ways to remove Bad Odour in Bathroom & keep it Clean | करा 5 उपाय, टॉयलेट मध्ये कधीच येणार नाही दुर्गंधी, वाटेल फ्रेश...

करा 5 उपाय, टॉयलेट मध्ये कधीच येणार नाही दुर्गंधी, वाटेल फ्रेश...

सध्याच्या काळात टॉयलेट व बाथरूम हे आपल्या घरातच असतात. फारच क्वचित ठिकाणी असे असेल की टॉयलेट व बाथरूम घराच्या बाहेर आहे. टॉयलेट व बाथरूम हे दोन्ही घरातच असल्यामुळे त्याच्या स्वच्छतेची देखील तितकीच काळजी घ्यावी लागते. काहीवेळा टॉयलेट व बाथरूमचा जास्त वापर केला किंवा स्वच्छ ठेवले नाही तर त्याची दुर्गंधी संपूर्ण घरभर पसरते. वारंवार येणाऱ्या या दुर्गंधीचा आपल्यालाच त्रास होतो. ही दुर्गंधी घालवण्यासाठी आपण अनेक उपाय करून पाहतो. काहीवेळा तर आपण महागडे फिनाईल, एअर फ्रेशनर, वेगवेगळ्या प्रकारच्या सुगंधित गोळ्या किंवा लिक्विड यांचा वापर करून टॉयलेट व बाथरूम स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो. 

काहीवेळा तर या टॉयलेट व बाथरूमची इतकी घाण दुर्गंधी पसरते की आपल्यालाच टॉयलेटमध्ये जाण्याची इच्छा होत नाही. आपण टॉयलेट व बाथरूम मधील ही दुर्गंधी जाण्याची वाट बघतो. टॉयलेट व बाथरूम मधील दुर्गंधी घालवण्यासाठी महागडे क्लिनींग प्रॉडक्ट्स वापरण्यापेक्षा आपण काही घरगुती वस्तूंचा वापर करून  व काही छोट्या - छोट्या गोष्टींची काळजी घेऊन आपण टॉयलेट व बाथरूम मधील दुर्गंधी सहज घालवू शकतो(5 Ways to remove Bad Odour in Bathroom & keep it Clean).

टॉयलेट व बाथरूम मधील दुर्गंधी नाहीशी करण्यासाठी महत्वाच्या टिप्स :- 

१. टॉयलेट, बाथरूमची स्वच्छता :- आपल्यापैकी काहींच्या घरात टॉयलेट व बाथरूम वेगवेगळे नसून एकच असते. अशावेळी तर येणाऱ्या दुर्गंधीने जीव नकोसा होतो. जर आपल्या घरात टॉयलेट व बाथरूम एकच असेल तर त्यांची  स्वच्छता ठेवणे खूपच गरजेचे असते. टॉयलेट, बाथरूम एकत्र असल्यास ते वेळोवेळी स्वच्छ ठेवले नाही तर ते दिसताना देखील घाण दिसते व दुर्गंधीसुद्धा पसरते. बाथरूम वापरून झाल्यानंतर किमान पाणी ओतून स्वच्छ करावे, टॉयलेटला जाऊन आल्यानंतर पुरेसे पाणी ओतून फ्लश करायला विसरू नये. बाथरूममध्ये ओले कपडे तसेच ठेवू नये यामुळे बाथरूममध्ये कुबट वास पसरतो. 

खूप आंबट झाले म्हणून दही टाकून देता? १ सोपा उपाय, दही संपेल आणि किचनही होईल चकाचक...

२. नियमितपणे स्वच्छतेची काळजी घ्या :- जर आपण नियमितपणे टॉयलेट, बाथरूमची स्वच्छता केली तर घाण व दुर्गंधी पसरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. टॉयलेटमध्ये असलेले कमोड, टॉयलेट सीट, फरशी यांची नियमितपणे स्वच्छता ठेवली तर त्याचा फायदा आपल्यालाच होतो, तसेच दुर्गंधी येण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. टॉयलेट, बाथरूमची स्वच्छता करताना प्रत्येक कानाकोपऱ्याची स्वच्छता केली पाहिजे. 

मळके सॉफ्ट टॉईज धुण्याच्या सोप्या ४ पद्धती, सॉफ्ट टॉईज होतील स्वच्छ, चमकदार...

३. एक्झॉस्ट फॅन लावा :-  टॉयलेट, बाथरूमच्या खिडकीजवळ एक एक्झॉस्ट फॅन जरूर लावा. यामुळे टॉयलेट, बाथरूम मध्ये येणारी दुर्गंधी कमी होण्यास मदत होते. जेव्हा जेव्हा आपण टॉयलेटच्या वापर करू तेव्हा तेव्हा हा एक्झॉस्ट फॅन सुरु करावा, यामुळे टॉयलेटमधील घाणेरडी दुर्गंधी एक्झॉस्ट फॅनमुळे बाहेर फेकली जाईल व टॉयलेट दुर्गंधीमुक्त राहण्यास मदत होईल. 

४. बेकिंग सोड्याचा असा करा वापर :- टॉयलेट, बाथरूम स्वच्छ ठेवण्यासाठी आपण वेगवेगळे फिनाईल, एअर फ्रेशनर, सुगंधित गोळ्या किंवा लिक्विड यांचा वापर करतो. यासोबतच आपण टॉयलेट स्वच्छ ठेवण्यासाठी बेकिंग सोड्याचा देखील वापर करू शकतो. चमचाभर बेकिंग सोडा आपण फ्लश टॅंक मध्ये टाकून ठेवावा यामुळे प्रत्येक फ्लशच्या वेळी बेकिंग सोड्याच्या वापरामुळे येणारी घाणेरडी दुर्गंधी नाहीशी केली जाईल. बेकिंग सोड्या सोबतच आपण व्हिनेगर देखील वापरू शकता. व्हिनेगर आणि बेकिंग सोड्याची पेस्ट यांचा वापर करून आपण टॉयलेट व बाथरूम स्वच्छ करू शकतो. 

फ्रिजरमध्ये खूप बर्फ साचतो, फ्रिजमधून पाणी गळू लागते ? ७ सोपे उपाय, कुलिंगही होईल चांगले...

५. जळक्या माचिसचा वापर करावा :- हा उपाय आपल्याला इतर उपायांपेक्षा थोडा वेगळा वाटेल परंतु हा उपाय नक्कीच कामी येईल. माचीस पेटवून ती लगेच विझवून घ्यावी. विझलेली माचीस सिंक खाली किंवा कमोड खाली फिरवावी यामुळे विझलेल्या माचिसच्या धुरामुळे बाथरूम व टॉयलेटमधील घाणेरडी दुर्गंधी शोषली जाते. यामुळे टॉयलेट व बाथरूम दुर्गंधीमुक्त राहते.

Web Title: 5 Ways to remove Bad Odour in Bathroom & keep it Clean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.