Lokmat Sakhi >Social Viral > फ्रिजरमध्ये सतत बर्फचा थर तयार होतो? 5 गोष्टी करा, लाईटबील कमी येईल-फ्रिज खराब होणार नाही

फ्रिजरमध्ये सतत बर्फचा थर तयार होतो? 5 गोष्टी करा, लाईटबील कमी येईल-फ्रिज खराब होणार नाही

5 Ways To Remove Built Up Frost From Your Freezer : तुमच्याही फ्रिजमध्ये वारंवार बर्फ तयार  होत असेल तर हा बर्फ काढून टाकण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 06:27 PM2023-12-31T18:27:42+5:302023-12-31T23:13:21+5:30

5 Ways To Remove Built Up Frost From Your Freezer : तुमच्याही फ्रिजमध्ये वारंवार बर्फ तयार  होत असेल तर हा बर्फ काढून टाकण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता.

5 Ways To Remove Built Up Frost From Your Freezer : Easy Way to Remove Ice From Frozen Freezer | फ्रिजरमध्ये सतत बर्फचा थर तयार होतो? 5 गोष्टी करा, लाईटबील कमी येईल-फ्रिज खराब होणार नाही

फ्रिजरमध्ये सतत बर्फचा थर तयार होतो? 5 गोष्टी करा, लाईटबील कमी येईल-फ्रिज खराब होणार नाही

फ्रिज या उपकरणाची गरज ऊन्हाळ्यात सर्वात जास्त असते पण वर्षाचे बारा महिने अन्नपदार्थ ठेवण्यासाठी फ्रिजरचा वापर केला जातो. भाज्या, फळं ताजे राहावेत. त्यातील शिजवलेले अन्नपदार्थ खराब होऊ नयेत म्हणून फ्रिज नेहमीच थंड ठेवावे लागते. (Home Cleaning Tips) फ्रिजरमध्ये लवकर बर्फ तयार होऊ लागतो. (How to Remove Ice From Your Freezer Without Defrosting) अशावेळी रेफ्रिजरेटर लवकर खराब होण्याची शक्यता असते. फ्रिजमध्ये बर्फ जमा झाला की तो काढणं कठीण होतं. तुमच्याही फ्रिजमध्ये वारंवार बर्फ तयार  होत असेल तर हा बर्फ काढून टाकण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. (5 Ways To Remove Built Up Frost From Your Freezer)

1) फ्रिजचा दरवाजा कमीत कमी वेळा उघडा (How to Quickly Defrost Your Freezer)

 क्लिन पिडिया.कॉमच्या माहितीनुसार अनेकांना सवय असते की कारण नसताना फ्रिजचा  दरवाजा उघडत असतात. जर तुमच्याही घरात असं कोणी करत असेल त्यांना वेळीच थांबवा. सतत दरवाजा उघडल्यामुळे गरम हवा आत जाते आणि  थंड आणि गरम हवा मिळून जास्तीत जास्त बर्फ तयार होतो. फ्रिजच्या तळाशी पाणी साचू नये यासाठी एक टॉवेल लावून ठेवा. जेणेकरून गंज लागणार नाही आणि फरशी खराब होण्यापासून रोखता येईल.

2) दरवाज्याचे रबर घट्ट असावे (How to Clean Freezer)

नेहमी फ्रिजची स्थिती तपासत राहा. जर रबर सैल झालं असेल किंवा कुठूनही ते चिरलेले असेल तर  गरम हवा आत जाऊ शकते. अशावेळी नवीन रबर लावून घ्या. दरवाजा घट्ट लावला जाईल याची खात्री करा.

गुडघे ठणकतात-हाडं खिळखिळी झाली? व्हिटामीन B-12 देणारे ८ व्हेज पदार्थ नियमित खा; फिट राहाल

3) हवामानानुसार तापमान तपासत राहा (How to Prevent Ice Buildup in Your Freezer)

फ्रिजरमध्ये बर्फ जमा होण्याची समस्या उद्भवत असेल तर फ्रिजचे तापमान तपासत राहा बाहेरील वातावरणानुसार फ्रिजचं तापमान सेट करणं गरजेचं आहे. जर बाहेर थंड वातावरण असेल आणि फ्रिजर कोल्डेस्टवर सेट करा त्यात बर्फ सहज तयार होईल.

4) फ्रिजची-साफसफाई करणं गरजेचं आहे (How to Clean a Freezer Properly)

फ्रिजरमध्ये जास्त बर्फ तयार होत असेल तर नियमित साफ-सफाई करत राहा. यामुळे थोड्या थोड्या दिवसांनी बर्फ तयार होणार नाही. जर फ्रिजमध्ये बर्फ जमा होत असेल तर लगेच  क्लिन करा. 

पोट कमी करायचंय? नवीन वर्षाच्या सुरूवातीपासूनच घ्या 'हा' एकदम साधा आहार-स्लिम होईल पोट

5) असे करा डिफ्रॉस्ट  (How to Defrost Fridge)

प्रत्येक फ्रिजमध्ये डिफ्रॉस्टचे बटन असते. पण तुमच्या फ्रिजमध्ये हे बटन नसेल तर फ्रिजमधील सर्व पदार्थ बाहेर काढून एका आईसबॉक्समध्ये ठेवा. नंतर एक तासासाठी फ्रिज बंद करून ठेवा आणि साफ केल्यानंतर सर्व साहित्य ठेवा. मग फ्रिजच बटन ऑन करा.

Web Title: 5 Ways To Remove Built Up Frost From Your Freezer : Easy Way to Remove Ice From Frozen Freezer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.