शेविंग क्रीमचा (shaving cream uses) उपयोग काय? असा प्रश्न विचारला तर उत्तर साहजिकच शेविंगसाठी असंच असेल. पण शेविंग क्रीमचा इतकाच उपयोग नाही. घरातली स्वच्छतेशी निगडित बरीचशी कामं शेविंग क्रीमचा (shaving cream uses to clean house) उपयोग करुन करता येतात. घरातल्या वस्तू चमकवण्यासाठी शेविंग क्रीमचा उपयोग होतो. घरातल्या आरशापासून ते दागिन्यांपयंत अनेक गोष्टी शेविंग क्रीमनं चकाचक होतील .. त्या कशा?
Image: Google
1. घरातले कपाटाचे , बेसिनवरचे किंवा ड्रेसिंग टेबलचे आरसे धुरकट झाले असतील तर शेविंग क्रीम हा त्यावर उत्तम उपाय आहे. शेविंग क्रीम ॲण्टि फाॅग क्रीम सारखं काम करतं. शेविंग क्रीम आरशांना लावून कागदानं आरसे पुसले की आरसे स्वच्छ होतात आणि आरशांवर पुढे अनेक दिवस धुरकटपणा येत नाही. टिपाॅय, डायनिंग टेबलच्या काचही शेविंग क्रीमनं अशाच प्रकारे स्वच्छ करता येतात.
2. स्वयंपाकघरातील स्टीलच्या शेगड्या काळपट, पिवळट पडलेल्या असतात. त्या स्टीलच्या आहेत की नाही हे ओळखताही येऊ नये अशा झालेल्या असतात. या स्टीलच्या शेगड्या शेविंग क्रीमनं चकाचक करता येतात. स्टीलच्या शेगडीवर ओलं फडकं फिरवावं. मग शेविंग क्रीम शेगडीला लावून घासणीनं हळूवार घासल्यास शेगडीवर पिवळट-काळपट डाग, तेलकटपणा निघून जावून शेगडी चकाचक होते.
Image: Google
3. अंगावर घातले जाणारे वेगवेगळ्या धातूचे दागिने घामानं खराब होतात. काळपट पडतात. हे दागिने स्वच्छ करण्यासाठी शेविंग क्रीमचा उपयोग होतो. यासाठी दागिन्यांवर शेविंग क्रीम लावावं. बोटानं ते चोळून घ्यावं. नंतर कपडा ओला करुन दागिने स्वच्छ पुसून घेतल्यास ते स्वच्छ होतात, चमकतात.
4. लाकडी फर्निचरवर, कार्पेटवर पडलेले डाग कशानंच जात नसतील तर शेविंग क्रीमचा उपाय नक्कीच काम करतो. लाकडी फर्निचरवर किंवा वूडन फ्लोरवर, कार्पेटवर जिथे डाग असेल तिथे थोडं शेविंग क्रीम टाकून ठेवावं. थोड्यावेळानं कोरड्या कापड्यानं घासून ते स्वच्छ केल्यास डाग निघून जातात.
Image: Google
5. चित्र काढताना, रंगवताना हाताला रंग लागतात. हाताला लागलेले रंग निघत नसतील तर शेविंग क्रीम कामास येते. शिवाय इतरत्र लागलेले रंगाचे डागही शेविंग क्रीमच्या सहाय्यानं स्वच्छ करता येतात. जिथे रंगाचे डाग लागले आहेत तिथे शेविंग क्रीम लावून थोडं घासल्यास रंगाचे डाग निघून जातात.